' यशस्वी लोक या ५ गोष्टी चुकूनही करत नाहीत – म्हणूनच यशस्वी होतात…! – InMarathi

यशस्वी लोक या ५ गोष्टी चुकूनही करत नाहीत – म्हणूनच यशस्वी होतात…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. स्पर्धा ही परस्परविरोधी भावनेला जन्म देत असते. स्पर्धेत पुढे येण्यासाठी अनेकदा शॉर्टकट्स शोधले जातात. अशावेळी नैतिकतेलाही सोडचिठ्ठी दिली जाते. यश मिळवण्यासाठी वाटेल त्या मार्गाचा वापर केला जातो.

चुकीच्या किंवा अनैतिक मार्गांनी यश मिळवण्यात काहीवेळा यशही मिळते. पण यशस्वी होऊनही आपल्याला समाधान मात्र मिळत नाही. आपल्याला मिळात असलेल्या यशाचा आपल्या विरोधकांनी सुद्धा सन्मान करावा, अशी इच्छा असणं चूक नाही. यशाची श्रृंखला अखंडित राहावी असं देखील आपल्याला वाटत असतं. यासाठी आपण काय करायला हवं, हे माहित असावं.

किंबहुना त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे, हे माहित असणं; की आपण काय करू नये… 

पुढे सांगितलेल्या गोष्टी यशस्वी माणसांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतात. नेमक्या कोणत्या गोष्टी यश मिळवण्यात अडथळा ठरू शकतात हे आता पाहू.

 

१. पूर्वग्रह

यशस्वी मनुष्य एखादी गोष्ट पूर्वग्रहदूषित मनाने पाहत नाही. ही माणसे सारासार विचार करणारी असतात. त्यामुळे इतर लोक दुर्लक्ष करतील अशा संधी ती माणसं सहजतेने हेरतात.

उदाहरणच द्यायचं झालं तर, आज भारताची हेल्थकेयर सेक्टरमधली प्रगती आणि उत्तम हेल्थ इंफ्रास्ट्रक्चरमुळे काही वर्षांपूर्वी भारतात नावालाही नसलेलं मेडिकल टूरिजम दिवसेंदिवस विकसित होत आहे.

 

preoccupiedness-inmarathi

 

इतर विकसित देशांच्या तुलनेत भारतात कमी खर्चात वैद्यकीय उपचार होतात. तसंच भारताचं वैशिष्ट्य असलेला आयुर्वेद, नॅचरल थेरपी यासोबतच भारतातील आधुनिक वैद्यकीय इलाज लोकांना भुरळ पाडत आहेत.

यामुळे प्रतिवर्षी सुमारे एक- दीड लाख मेडिकल टूरिस्ट भारतात येतात. भारतासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

 

२. उद्धटपणा :

यशस्वी लोकांनी उद्धट असून चालत नाही. किंबहुना यशस्वी लोक कधीही उद्धट नसतात. ती हुशार असतात. नम्र असतात. उच्चशिक्षित असतात. ती बहुभाषी असतात. त्यामुळे त्यांना जगात इतरत्र पसरलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर बोलायला कोणा दुभाषाची गरज पडत नाही.

 

rudeness-inmarathi

हे ही वाचा – श्रीमंत लोक अधिकाधिक श्रीमंत होण्यासाठी ‘या’ गोष्टींचं हमखास पालन करतात

त्यांना भरपूर छंद असतात. त्यांना विविध संस्कृतींचा अभ्यास करण्यासाठी भ्रमंती करायला आवडते. यशस्वी मंडळी जात्याच कलावंत प्रवृत्तीची असतात.

त्यामुळे प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य शोधण्याची त्यांना सवय असते.

 

३. भांडण-तंटा

लहानसहान गोष्टीवरून भांडण होणं हे व्यवसायासाठी वाईट ठरतं. यशस्वी लोकांना शांतता, खेळीमेळीचे वातावरण आवडतं. त्यासाठी तडजोडी करण्याची तयारी त्यांनी ठेवलेली असते.

काही न काही मधला मार्ग काढून ते परिस्थितीवर तोडगा काढतात. शेवटी काम यशस्वी तेव्हाच होतं जेव्हा तुमचा स्टाफ, तुमच्या हाताखाली काम करणारी माणसं खूष असतील.

त्यामुळे यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या माणसांना भांडणात रस नसतो. ते शक्यतोवर भांडणे टाळायचा प्रयत्न करतात.

 

rude people inmarathi

 

ही मंडळी सुसंवाद आणि शांततेला प्राधान्य देतात. ते त्यांच्या विरोधकांशी सुद्धा मैत्रीचे संबंध ठेवतात. भांडण, वाद यापासून दूर राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

खरंतर हुशार विरोधकांपासूनसुद्धा खूप काही शिकण्यासारखं असतं. कोणी विचारवंताने म्हटलेच आहे, की तुम्ही एखाद्याला जिंकू शकत नसाल तर त्याला तुमचा मित्र बनवा. तो तुमची ताकद बनू शकतो.

 

४. भीती

भित्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतात ते काही उगीच नाही. भीती ही विषासारखी असते. ती तुम्हाला आतून पोखरत जाते. तुम्हाला जखडून ठेवते.

तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर भीती हा शब्द तुम्ही तुमच्या शब्दकोशातून वगळायलाच हवा. कारण जो घाबरतो तो यशस्वी होत नाही.

मनातील भीती नाहीशी होण्यासाठी स्वयंप्रेरणा, उत्साही वृत्ती आणि मन खंबीर असण्याची गरज असते.

 

Fear-Man-inmarathi

 

यशस्वी माणसं जगाला दिशा देण्याचं काम करतात. त्यांना पुढे वाढून ठेवलेल्या परंतू माहीत नसलेल्या गोष्टींची भीती नसते. ते येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायला आणि त्यातून मार्ग काढायला सज्ज असतात.

जेव्हा इतर लोक संकटाच्या भीतीने थांबतात, तेव्हा ही माणसं त्या संकटाशी दोन हात करायला त्याच्या समोर उभी ठाकतात. म्हणूनच ते यशस्वी होऊ शकतात.

त्यांची हीच वृत्ती त्यांचातील नेतृत्व गुण वृद्धिंगत होण्यास कारणीभूत असते. ते उत्तम लीडर बनतात.

लोक त्यांचा आदर्श बाळगतात. आणि ह्यातूनच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. आव्हान स्वीकारायची वृत्ती तुम्हाला पुढे जायला बळ देते आणि तुम्हाला पुढच्या संधी शोधायला भाग पाडते.

 

५. वैयक्तिक आयुष्यातील प्रॉब्लेम्स :

आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील चढ-उतार आपल्याला आपल्या कामावर लक्ष पूर्णपणे एकाग्र करू देत नाहीत. पण यशस्वी माणसं आपल्या दुःखाचं भांडवल करत नाहीत. दुःखाला सुद्धा आपली ताकद बनवण्याची क्षमता त्यांच्याकडे असते.

कोणत्याही नकारात्मक घटनांना ते आपल्या आयुष्याचा ताबा घेऊ देत नाहीत. ते आपलं करिअर आणि कुटुंब यांचा योग्य तो मेळ साधतात. दोन्ही आघाड्यांवर यशस्वी होण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

 

problems-inmarathi

हे ही वाचा – उद्योजक बनायचंय? हे १० गुण आत्मसात केले तर यशाचं शिखर नक्की गाठू शकाल!!

अशा प्रकारे माणसांकडून घडणाऱ्या चुका माणसाचं यशस्वी होणं लांबणीवर टाकत असतात. म्हणून यशस्वी लोक चुका टाळायचा प्रयत्न अधिकाधिक प्रमाणात करतात. जास्तीत जास्त संधींचा लाभ घेतात.

संकटांकडेही, हे लोक संधी म्हणून बघतात. एखादी नवीन गोष्ट सुरु करत असताना तिच्याबद्दल यशस्वी लोकांचं मन पूर्वग्रहदूषित नसतं. तसंच ते सुसंवादी असतात. त्यांना आपण यशस्वी होऊ अगर नाही याची भीती नसते.

 

थोडक्यात सांगायचं झालं, तर कुठलाही नकारात्मक विचार न करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यशाच्या मार्गात येणारे अडथळे, योग्यरीतीने आणि शांत डोक्याने पार करण्याची क्षमता यशस्वी मंडळींमध्ये असते. ध्येय समोर ठेवलेलं असलं, तरीही ते गाठण्याचा ताण न घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

यशाची गुरुकिल्ली वगैरे असते का, हे माहिती नाही पण यशस्वी लोक राज्य करतात मनामनांवर…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?