पुरोगामी (?) महाराष्ट्रात, बामनाचं पोर मुख्यमंत्री?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
बऱ्याच दिवसापासुन काही जातीयवादी धसकट नीच पद्धतीच राजकारण करत आहेत …! याच संदर्भात मी राम सातपुते खुले पत्र लिहित आहे !
नमस्कार !
माय बाप जनता जनार्दन…
पत्रास कारण की, बऱ्याच दिवसापासुन एका विषयात आपल्या सर्वांशी बोलावं असा विचार करत होतो पण विषयाला वाचा फोडता येत नव्हती. थेट बोललो असतो तर मला जातीयवादी म्हणाला असता.
असो, पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि इथे लोकशाही आहे हे सगळं मान्यय.
पण बामणाचं पोरगं मुख्यमंत्री कसं झालं?
हा प्रश्न माझ्या मनात घर करून आहे.
भाजपा सरकार आल्यापासुन जीवाला घोर लागलाय. काल परवाचं खेळकर पोरगं आणि मुख्यमंत्री झालं! धन्य आहे हा पुरोगामी महाराष्ट्र!
हे कालचं पोरगं आमच्या समोर मुख्यमंत्री झालं, आमचे घोटाळे जनतेसमोर उधळले, एवढी हिंमत या छोकऱ्याची?
ब्राम्हण म्हणजे आमचं लग्न, सत्यनारायण आणि थेट देवाशी ओळख वगेरे असणारी जात. यांनी तेच करावं ना !
चार मंदिरं वाढवली तर चालेल पण आज राज्यच त्यांच्या हातात दिलंय. बामनाचं पोरगं मुख्यमंत्री झालं हे मला मुळातच पटलेलं नाही.
कसं पटेल तेही सांगा ना.. हा महाराष्ट्र काय भाजपच्या नावावर आहे का ? समस्त गोरगरिबांचा राजकीय सातबारा माझ्या नावावर लिहलाय!

ही लोकशाहीसुद्धा ना, थोडा घोळ करते. त्यात लिहीलंय लोकप्रतिनिधि व्हायला तो भारताचा नागरिक असावा. आरं, पण आमचा विचार करायचा ना जरा !
दुखः एवढंच नाही. मात्र हे पोरगं मुख्यमंत्री झालं तेव्हापासुन सात कुठं गेले कळेना. अन आमचे बारा वाजवून टाक़ले या पोरानं.
आमच्या काळात आम्ही विहिरी कागदावर खांदल्या आणि कागदावरच विहिरीला पाणी लागलं. आता हे पोरगं येड लागल्यासारखं खऱ्या विहिरीसाठी अनुदान देतंय.
अन तेवढं करून थांबावं नं, या पोरांनं!
विहिरी झाल्या का नाही म्हनून अधिकारी पाठवायला लागलं. या दुध खुळ्या पोराच्या लक्षातच येत नाही. सरकारी योजना कार्यकर्त्याचं खुराक असतात. बसलंय हे विहिरी खांदत.
हे पोरगं काही कामाचं नाही.
आम्ही हज़ारों एकर ज़मीनी शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या आणि आम्ही त्याच जागेवर पवनचक्की, लवासा असे उद्योग सुरू केले.
शेतकऱ्याच्या खिशात पैसे झाले ना राव, भले कमी किमतीत असतील मात्र आम्ही जमिनी तरी खरेदी केल्या, त्याला लुबाडल्या म्हणतात. ज़मीनी बळकावल्यासुद्धा.
पण काय करावं हे पोरगं मुख्यमंत्री झाल्यापासुन शेतकऱ्यांची ज़मीन सोडा, मातीही नाही भेटत. इतकं व्हाईट कॉलर नसतंय चालत.
आम्ही सत्तेत असताना रस्ते केले आणि सोबत कार्यकर्ते पण मोठे केले. बरीच टक्केवारी असते त्यांना. भले बऱ्याच लोकांचे मणके कामातून गेले पण तेवढे तरी काम केले ना.
आम्ही काही ठिकाणी रस्त्यावर बऱ्याचदा पैसे उचलले पण रस्ते केले नाहीत.
===
हे पण वाचा:
..आणि पवारसाहेबांनी ‘Pseudo Secularism म्हणजे काय?’ हे दाखवून दिले
मराठा आरक्षण आंदोलन – खरी राजकीय खेळी काहीतरी वेगळीच आहे?
===
लोक मणक्याच्या आज़ाराने मेले. पण हे पोरगं मुख्यमंत्री झाल्यापासुन एकदा रस्ता खराब झाला की नीटच करतंय! बाक़ी नंतर…!
आमच्या काळात आम्ही खच्चून शिक्षण संस्था काढल्या. हज़ारों एकर महाराष्ट्रातील जागा आम्ही त्या संस्था ना फूकट देऊन टाकली. अहो, मोठं मन लागतं त्याला. यांच काम नाही हे.
आम्ही चण्या – फूटाण्या सारख्या जमिनी आणि सात बारे आमच्या नावावर करून घेतले. आणि हो तुम्हीं आमचं काहीच करू शकत नाही.
कारण कुठं कुठं ज़मीनी आहेत हे आम्हालाच माहित नाही अन तुम्हाला कधी सापडतील ?
आमच्या काळात पोलिस स्टेशन आम्ही चालवायचो आपल्या कार्यकर्त्यांना कधीच धाक नाही दाखवला. आता पोलिस चालवतात.
खोट्या केस करायला आमचेच कार्यकर्ते अन मिटवायला आमचेच. शेवटी कार्यकर्त्यांची दुकानदारी चालली पाहिजे ना!
आम्ही तर आमच्या काळात खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलंय. या पोराला कसं जमेल. हे तर बामनाचं पोरगं अन झालय मुख्यमंत्री.
आम्ही लै धरणं बांधायला काढ़ली लै पैसा खाल्ला. पाण्यासारखा म्हणा हवं तर.
पण राजकारण करायचं म्हटल्यावर, पक्ष चालवायचा म्हटल्यावर, पैसा तर लागतोच की…!
याला काय कळतंय हे गणित अन राजकारण?
काल परवाचं पोरगं. त्याला दक्षिणा माहिती फक्त. या बाकीच्या दक्षिणाची शिकवणी आमच्याकडेच लावावी लागेल….
आताचे बंदिस्त भुजबळ आहेत न त्यांना आम्हीच शिकवलं. नाशिकला तर या जाऊन. ते आमचेच शिष्य आहेत. असे चार – दोन तरी शिष्य दाखवा तूमचे?
कसे असतील?! त्याला मोकळीक सोडावी लागते! जशी आम्ही भूजबळांना सोडली होती…!
राजकारण तुमचं कामच नाही. राजकारण आम्हीच करू जाणं, खाता आलं पाहिजे अन जीरवता पण आलं पाहिजे. तुम्ही खातच नाही तर जिरवनार कसं?

आम्ही आजवर किती तरी सहकारी कारख़ाने भंगारा सकट विक़ुन खाल्ले पण झालं का आमच काही? नंतर आम्ही आमच्या खाज़गी कारख़ान्याला जोडून घेतले. पण डेरिंग लागते बॉस.
तुमचं कसं झालंय “ना खाऊँगा, ना खाने दूँगा”, असं कुठं राजकारण होत असतंय? अहो, हा काय समजतो स्वत:ला, मागेल त्याला शेततळे देतोय.
आम्ही शेतकऱ्यांसाठी पण पैसा ख़र्च केला पण आमच्या कार्यकर्त्यानी चार पैसे कमवले. आता हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकतंय.
आजवर तुम्ही आमची दुक़ानदारी नाही तर पैसे खायचा होलसेल धंदा बंद केलाय. आता तुम्हाला नीट करावं लागेल.
आमचे पैसे खायचे सगळे मार्ग बंद केले या बामनाच्या पोरानं. पूर्वी पेशवे अन आता हे वगेरे वगेरे…!
बस्स झालं….!
विचार करा… मी अजूनही प्रचंड आशावादी आहे.
विकासाचं राजकारण नसतं चालत, पैशाचा मेळ करता आला पाहिजे. चार पैसे वाटून खाता आले पाहिजे. थांबतो.
तुम्ही विचार करा…
पुन्हा महाराष्ट्रवादी…आशावादी होऊया का?
हा सवाल तुमच्यावर सोपवतो…!
धन्यवाद !
===
हे पण वाचा:
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची करामत; भर उन्हाळ्यात पेटवले का पाणी? : जोशींची तासिका
राष्ट्रवादीचे ‘संविधान बचाव’ : सौ चुहे खाके बिल्ली चली हज को !
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
तुम्ही म्हणताय त्या बामनाच्या पोरांनी महाराष्ट्रात कागदावरच जवळजवळ दीड लाख विहिरी बांधल्या आहेत चार लाख संडास बांधली आहेत… आणि ते ही फक्त ४वर्षात..
पण इतके आकडे सांगून काय उपयोग त्यात किती तथ्य आहे आणि किती गाजर सगळ्यांना माहीत आहे
4 varsha cha hishob pahije teva magil 60 varsha chya be-hishobavar paddhatshir pangharun ghalay che.
Good Article. No paid article, tumi reality expose keli aahe.
Cast baghun nahi tar Gunvatta baghun voting kele pahije.
True
It’s reality all will digest it slowly. Its true that Maharashtra is improving. Now it’s our moral responsibility to support them wholeheartedly. Let’s come to get her and support government.
Well said.
उगाच आरोप कशाला करताय राव?त्यापेक्षा तुम्हाला माहित असलेल्या पाच कागदावरच्या विहिरींची माहिती उत्तर म्हणून इथेच द्या.मी ती तक्रारदार म्हणून तुमचे नाव देऊन मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला देतो व चौकशी करण्याची विनंती करतो.मग कळेलच की खरं काय ते.
हे त्रिवार सत्य आहे,
ज्यांची नियत चांगली आहे त्याला चांगली फळेच येणार.
प्रत्येक जण आपल्या कर्माची फळे भोगतो.
जलयुक्त शिवार व पाणी फाउंडेशन ह्या विस्तृत अश्या योजना शासनाने आखल्या
राज्यात कोणताही व्यक्ती अंध राहू नये म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजनांनी प्रत्येक जिल्ह्यात नेत्र शिबिरे घेतली .
माझं तालुका चोपडा, जिल्हा जळगाव, येथे आज एकही हागणखडी नाही
म्याग्नेटिक महाराष्ट्र च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन महाराष्ट्रात येणार आहे.
धरणात मुतने भ्रष्टवादी वाल्यांचे संस्कार आहे
Chpdyajawal vele Aakhatwade village aahe.
Tethun chopda Amalner road. …dutarpha kay sthiti asate ,saheb?
Really true. I am Maratha by cast ,but really feel bad about bramhan community. Maratha people think that cm should only of Maratha cast,though he is corrupt. We should focus of quality of people instead of cast.
धन्यवाद संजय जाधव जी, मला वाटलेलं जातीय राजकारण मोठं होतंय महाराष्ट्रत. पण एक मराठा असून इतर जातीय आणि खास करून ब्राम्हण जातीय मुख्यमंत्री accept करण्याची तुमची तयारी (जर तो देशहितवादी असेल तर) हे एक द्योतक आहे समृद्ध महाराष्ट्रच
Khare ahe…apan saevani atta yvapak drushtikon theun vagle pahije….devendra fadanvis sarkhya mansanchi garaj ahe atta…jai maharashtra…jaihind
संजय जाधव,
तुम्ही खरे लाख मराठा!
Thanks Sanjay ji.
Best example of paid journalism
असले लेख पसराव्याच cm ऑफिस मधून काय रेट सुरू आहेत सांगता का?? म्हणजे आम्ही पण लाभार्थी होऊत…
Maharashtra challela jaatiyavaad tumhala manya aahe ka
Best example of a boot licker of पवार.
आता अख्ख गाव जो माणूस फक्त कागदावर दाखवून अनुदान खातो त्याला काय म्हणावे. आता मोदिजींनी नरड दाबल्यावर ढुंगणात दुखायला लागले आहे.
राहू द्या सरोदेसाहेब, तुम्हाला नाही परवडणार.
गरीब बामनाचं शेंबडं पोरगं काय देणार असल्या लेखासाठी?
तुम्हाला लाभार्थी व्हायचंच असेल तर शरदरावजींच्या हापिसात जा. चांगला रेट मिळेल. शप्पत!
Perfect answer
याची कल्पना तुम्हाल असेल कारण याच्या पहिले ऐसे लेख कढ़ी बघितले नसतिल,
तुम्ही फक्त paid news बघितल आसेल म्हणून तुमचा विचार असा आहे,
लेख अतिशय सत्य आहे
आनी प्रामाणिक पाने लिहिला आहे।।
Within 4 years he can not do anything , but doing something which is good for common people and farmers . if someone examine the last UPA loan waivers scheme , most of them from kolhapur , satara , sangli region politically correct people . But now in current loan waiver scheme right people and farmers getting benefited. Before criticising do self research.
I totally agree with you on this Sir
Best work done by any Ministers so fat.. Wish you all the best Sir
शरदराव वाटतात तेवढे वाईट नाहीत, खूप चांगले आहेत!
बरोबर
तुम्ही अंगापिंडाने म्हणाले का?
मांडीवर घेऊन त्यांचा मुका घ्या औ
मग त्यांना एकदा एका व्यक्तीने थोबाडीत का मारली?
सबका साथ सबका विकास … ना खाऊंगा ना खाने दुंगा … only CM is there no deputy CM to any state except UP … minimum govt maximum governence
जातीयवाद : ब्राह्मण- मराठा, मराठा- दलित हेच करत बसा. यातच महाराष्ट्राचा सत्यानाश झाला की सगळे बसा बोंबलत! तुमची तीच लायकी आहे.
बिलकुल बरोबर लिहीलेय.
BJP je karel te kuthala hi paksh karu shakt nahi baki sarv paise khanare aahet
2019 la pan maharashtra t BJP sarkarla ch matdan kra
Jay BJP
Aaj cha kalat Devendra padanvis kiva Prutvi Raj Chavan hech CM sathi layak ahet. Rastravadi cha Vichar hi karu shakat nahi
अगदी खरा लेख आहे.काही लोकांना अजूनही चांगल्यावाईटातला फरक कळत नाहीये आणि ते अशा लेखांना paid journalism म्हणून हिणवतात. ईश्वर त्यांना दृष्टी देवो.शरद पवार इतके वाईट नाहीत हे खरं! ते याहीपेक्षा खूप जास्त वाईट आहेत.शिवाजी महाराजांचा वारसा सांगणा-या मराठ्यांना त्यांनी आरक्षणाचा कटोरा घेऊन उभं केलय.
हा लेख प्रचारकी आणि एकांगी आहे..
महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनचा इतिहास जाणून घेतल्यास
ते लक्षात येईल..
तुम्ही खरा इतिहास लिहा, आम्ही डोळे झाकुन जाणून घेतो.
बोरगावकर, येवला
Devendra Phadanvis has delivered fantastically. Even though in minority. Support from ShivSena is well known to everybody
राजकारण हे विकासाचच असाव.
स्वविकासाच नसाव.
एकदम बरोबर लेख आहे…..
काय म्हणाव या मुख्यमंत्राला साधी गुरांची छावनी पण काढली नाही..कोणत्या नेत्याला शेण उचलून पण दिल नाही. आणि चाराची बिल पण बनवू दिले नाही यानी….
टॉकर पण साधा लावला नाही… कशी करायची गावातील तालुक्यातील पुढार्यानी जनतेची सेवा….
खरंय.
Asa hushar cm apnala bhetla he aple bhagya ahe
मी तर सगळीकडे विकास पहातोय ..
पण विरोधकांनाच कसा दिसत नाही ?
सणसणीत ! सगळे आपलेच आहेत,म्हणूनच तत्व ज्ञानाला ,कार्य पद्धतीला विरोध केला तर हरकत नाही,किंबहुना हे विरोधी पक्षाचे कामच आहे….
पण शाहू,आंबेडकरांचे नाव घेत हे जातीयवादी राजकारण अक्षम्य आहे….म्हणूनच, सणसणीत !
Changla Kam kelela aahe ya sarkar ni ..
Lokani accept karayla paije
फडणवीस ची बायको रांगेत उभे राहून driving लायसन्स घेते,हे आम्हाला आवडत नाही,पाचट नाही,आम्हाला पाई फिरवून स्वतः गाडीत हिंडणारे असले तरी आमच्याच जातीचे पुढारी पाहिजेत,बामन नकोच नको
It is true. It is not porogamai Vicharsarni only talking porogami but reality is Castwadi Politics and Vanshwadi Politics.
True
जातीचे राजकारण करण्यापेक्षा विकासाचे राजकारण करावे सध्या खरोखर विकास होताना दिसतो आहे, जातीच्या राजकारना मूळे मागील 15 वर्षांत किती विकास झाला, काहीच नाही , महाराष्ट्राच्या विकासासाठी विकासाचे राजकारण करा,
I’m firstly and lastly Indian man made great by work instead of birth
छान लेख
विचार करायला लावणारा लेख आहे. जातीवादाच्या पांघरूणाखाली गेली सत्तर वर्ष जनतेची झालेली लुबाडणूक उघडी केली आहे.
लेख अप्रतिम आहे गेल्या 60~65 वर्षातील परीस्थिती व 4 वर्षातील परिस्तिथि यात खुप फरक आहे शासकीय कुठलीही योजनेत भ्रस्टाचार होणार नाहि याची काळजी सरकारने योजना बनविताना घेतलेली आहे योजनेचा लाभ देन्यपुरवि टैगिंग करावे लागते त्यामुळे भ्रशत्रचरला वाव नाहि केंद्र व राज्य 100% गरीब व गरजवंतसठी योजना राबवित आहे अजुन 10 वर्ष सरकार राहिले तर जगात पहिल्या 5 मधे मानव निर्देशंकात (financially develop) नक्कीच स्थान मिलेंन
छान
अतिशय सडेतोड भाषेत गेल्या साडेतीन वर्षांची सत्य परीस्थिती मांडली आहे. कोणतेही जातीय राजकारण न करता केवळ संपूर्ण समाजाच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी एक सर्व सामान्य नागरिक म्हणून उभे राहाणे अत्यंत गरजेचे आहे.
1) Manohar Joshi was 1st brahmin CM.
2) You cannot judge people by cast.
3) Currupt people are equally present in each and every cast & political parties.
4) Rest all are individual views & perceptions.
क्षणभर लेखातील बामनाच पोर हा उल्लेख जरी टाळला तरी लेखातील तथ्य अजिबात कमी होत नाही। आत्ताच्या मुख्यमंत्रांसारखे काम करणारा माणूस कोणत्याही जातीचा किंवा पक्षाचा असला तरी चालेल। बाकी राष्ट्रवादी बद्दल न लिहिलेलंच बरं
खरंय पण त्यासाठी आपण येत्या काळात येणाऱ्या निवडणुकांना मध्ये कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही याची काळजी घ्यावी. आणि गेल्या 50-60 वर्षात काँग्रेस सरकारने जी घाण करून ठेवली आहे. ती साफ करण्यातच या सरकारचा वेळ गेला. तरी पुढची १० वर्ष हेच सरकार सत्तेत येण्या साठी आपण सगळ्यांनी याच सरकारला मतदान करूयात.आणि महाराष्ट्र चे नाव उंचावूया
बरोबर लिहिलंय.. ! मुख्यमंत्री कोणत्या जातीधर्माचा आहे यापेक्षा किती प्रामाणिक व स्वच्छ चारित्र्याचा आहे हे पाहणं आवश्यक आहे.
Write about Shivsena and Manase also if you find it appropriate
Ek maratha lakh maratha valyani sagale sagalya rajkiya pakshyana khadyasarakhe vagalun tyanchi jaga dakhavun dilich aahe yes
राष्ट्रवादी एक नंबर ची हरामखोर पक्ष आहे
ब्राम्हण आणि मराठा यात भांडणे लावतात.
जेम्स लेन ला या भाड्यानीच आणले होते महाराष्ट्रात
मुख्यमंत्री हा कुठल्या जातीचा नसतो तर सर्व जाती धर्माचा असतो हे या व्यक्तीकडून दिसते.
लोकांना त्यांच्या हुशारी व पात्रते प्रमाणेच नेमताना दिसतात. कोणालाहि न घाबरता निर्णय घेण्यात सक्षम आहेत.
तस त्यांना जवळून पाहण्यात आल्यासच लोकांनी टीका करा.
आपल्याला आपले घर नीट सांभाळता येत नाही हे पूर्ण महाराष्ट्र कसा सांभाळत असतील. शिवाय विशेष यांनी आधीच्या राजकारण्यांचे खायचे वांदे करून ठेवलेत म्हणुन हे वाईट झालेत बाकी काहीच विरोध करण्यासारखा ठोस मुद्दा नाही.
Maharashtra needs such upright C.M.,Phadnavis is result oriented and don’t tolerate nonsense.
We should not bring casteism,unfortunately all earlier politicians are curupt .How Pawar can be a role model when he himself is curupt.
In this state only Maratha community ruling & earned all govt benefits such as govt.land @Rs.1 for medical Engineering colleges.schools Sugar factory etc.but most of their poor Maratha farmers not earning more property as they deceived by their Rashtvadi party leaders.
ज्यांचं फुकट च खाणं बंद झालं आणि आता काम करावं लागतंय अश्यांचीच सरकार विरोधी बोंबाबोंब आहे .
लेख अतिशय सत्य आहे .
ज्यांनी महाराष्ट्र विकून खाल्ला ते आता चहाचा घोटाळ्याबाबत बोलताय . जे धरणात मुतायची भाषा करायचे ते आता शेतकाऱ्यांबदल बोलताय .
ज्यांनी शेतकऱ्यांच्या कर्ज माफीत स्वतःची कर्जे माफ केलीत,त्यांचं बंद झालं ना म्हणून आता ओरडताय
फक्त जातिवादाला पुढे करून निवडणुका जिंकायचा या पेक्षा काय जास्त केलं हो ह्यांनी .
आजपर्यंत ह्यांनी कधी विकासाच्या मुद्द्यावर राजकारण केलंच नाही . फक्त स्वतःचे खिशे भरले .
मित्रानो एकच सांगतो शिक्षित असाल तर इतिहास (खरा) जाणून घ्या आणि मगच आपले बहुमोल मत द्या .
भगवान ना करे अगर मोदी जी 2019 हार गये तो सारी दुनिया हस हस के थुकेगी भारतीय मतदार पर
लय खाल्लेराव यांनी… 15 वर्षात तिजोरीचा खडखडात केला भ्रष्टाचाराचे प्रकरण तर विचारुच नका यांना सत्ता नसेल तर जमत नाही ज्याप्रमाणे मासा पाण्याबाहेर काढल्यावर राहत नाही तसे असो….. ही लोकं सोंगाडी आहेत यांना महाराष्ट्राचा खरा विकास करायचा होता ना मग का जाती जाती समाजा समाजात भांडणे लावुन बघत बसला….
बामनाच पोर मुख्यमंत्री हा लेख आवडला.
आम्ही बहुजन असलो तरी बामनाच्या पोराच्या पाठीशी उभे आहोत, कारण बामनाच पोर राज्याला चांगले दिवस दाखवताय.
जय महाराष्ट्र
खरच चांगला लेख आहे …. सडेतोड आसेच पाहीजे….
Maratha community madhe 30-40% lokanchi doki Brahman dweshane pachaadli aahet. Specially shahraat rahnare, gawat rahnare manaane khup saral astaat..yaat shanka naahi..Pan he shahraat rahnare marathe n marathyanchi pora sarvanchi doki bhadkwat aahet ani ya sarvas kaaran to haramkhor sharad pawar ahe—-
तुम्ही खरा इतिहास लिहा, आम्ही डोळे झाकुन जाणून घेतो.
बोरगावकर, येवला
बामनच पोर, परफेक्ट
नशिबाने 1996 पासून जवळून बघतोय देवेंद्र ला, अभ्यास, वक्तृत्व, संयम, आणि इमानदार, ढवळा सदरा स्वच्छ आहे बेदाग आहे,
ज्यांना महाराष्ट्र कधी बारामती, पुणे, मुंबईच्या बाहेर का दिसला नाही ? हे पोर त्यांच्या तुलनेत बसत नाही, करण ह्याला महाराष्ट्र बरोबर देशाचं भान आहे,
ज्यांनी जिल्हा सहकारी बँका बुडावल्या परस्पर कर्जे वाटलीत, वाटण्यास भाग पाडले आणि बुडले, साखर कारखाने लिलावात अणे खरेदी केले ? हे पोर त्यांच्यात बसत नाही, कारण पारदर्शी पणा के असतो हे दाखवून दिलाय,
कामाशी गद्दारी नाही, महाराष्ट्राने थोडी कसर बहुमतात केली, देवेंद्र थोडा वेगळा दिसला असता जो आम्हाला माहीत आहे, स्थळ अर्थात नागपूर
काॅंग्रेसने सर्रास भ्रष्टाचार केला, शेतकऱ्यांना देशोधडीला लावले, म्हणुन तर भाजपला सत्ता दिली.
पण शेतीमालाला हमीभाव देण्यात येईल,हे महत्त्वाचे आश्र्वासन भाजपच्या सरकारने पाळले नाही.किंबहुना महागाई वाढु नये, म्हणुन शेतीमालाची आयात केली गेली,व शेतीमालाला भाव मिळाले नाहीत,भाव पडले. मराठा आंदोलनाला प्रंचड पाठींबा मिळण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे.मुख्यमंत्री ब्राह्मण आहे,म्हणुन आरक्षण मोर्चे काढले गेले, असे बर्याच लोकांना वाटते, हे खरे नाही.
फडणवीस ब्राह्मण मुख्यमंत्री चालणार नाही…..
पण …
राहुल गांधी ब्राह्मण प्रधानमंत्री चालेतो
कमाल करते हो पवार साहब !!
कस आहे हाती चले बजार कुत्ते भोके हजार