'भाजपवाले पोथ्या-पुराणांतून कधी बाहेर येणार?

भाजपवाले पोथ्या-पुराणांतून कधी बाहेर येणार?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखक : डॉ. सुनील सिंग राजपूत 

===

सध्या देशात कोण कधी काय बोलेले हे सांगता येत नाही.राजकीय नेत्यांनी जर बेताल वक्तव्य केले असेल तर प्रसारमाध्यमे अतिशयोक्ती करत विषय चघळत असतात व सामान्य जनतेवर थोपवत असतात. पण या प्रकाराने नेत्यांच्या वक्तव्याला विश्वासार्हता राहत नाही. जबाबदार व्यक्तिने जबाबदारीने बोलावयास हवे.

सामान्य जनता नेहमी अशा वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना वेळेवर जागा दाखवते हे आपण पाहिले आहे.

काल गुजरात चे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी असेच गुगल व नारद संदर्भात वक्तव्य केले.ते म्हणाले गुगल आज जशी माहिती ठेवते तसे नारद मूनी हे माहिती ठेवत . तसेच काही दिवसांपूर्वी त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी ही इंटरनेटचा संबंध थेट महाभारताशी जोडला आहे.महाभारताच्या वेळी तांत्रिक सुविधा उपलब्ध होत्या असे त्यांचे म्हणने आहे.

महाभारतचे युद्ध संजय लाईव पाहु शकला व धृतराष्ट्रला त्याचे वर्णन करु शकला याचा अर्थ त्यावेळी इंटरनेट व सॅटेलाईट उपलब्ध होते असे होते व हेच दिव्य दृष्टी होती .

तसेच सहा महिन्यापूर्वी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिक सर्जरी व गणपती बाप्पा यांचा संबंध लावला होता. तसेच कर्णाचा जन्म हा आईच्या पोटी न होता जुनक विज्ञान (जेनेटिक सायन्स) पद्धतीने झाला होता असे म्हणाले होते. तसेच अधुनमधुन पुष्पक विमान हे पहिले विमान होत, शंभर कौरव जन्म सरोगसी वा टेस्ट ट्युब द्वारे झाला, अणु बॉम्बच महाभारतात वापर, अभिमन्युने उदरातच चक्रव्यूह भेदणे शिकला म्हणजे गर्भसंस्कार, गणपती यांचे अवयव प्रत्यरोपण यांची फक्त चर्चा होते.

 

hindi.dynamitenews.com

अशा वरिल गोष्टी ऐकुन आपली छाती आनंदाने फुगुन जाते. अशा गोष्टी जर पुरातन काळी अस्तित्वात होत्या तर आपण खरच जगाच्या किती तरी पट पुढे होतो. पौराणिकहे कथा साहित्य हे या संदर्भात असलेले पुरावे आहे. आपल्या परंपरा , संस्कृती याचा ठेवा पुरातन काळापासुन जपत आल्यामुळे आपली संस्कृती आज टिकुन आहे असे आपण म्हणु शकतो.

आपल्याकडे ज्ञानार्जन पुरातन काळापासुन मौखिक स्वरुपात होत असे ,लिखित कलेचा मर्यादित वापर यासाठी कारणीभूत असावा.नातवाला गोष्टी सांगणारे आजी-आजोबा हे एक मौखिक ज्ञानार्जन चे उदाहरण असु शकते.

पण जर खरच प्लास्टिक सर्जरी वा जेनेटिक सायन्स अस्तित्वात होते तर आजच्या युगात यावर संशोधन का होत नाही ?

स्वतः पंतप्रधान, मुख्यमंत्री हे लोकशाहीत अति महत्वाचे एक जबाबदार पद भुषवत आहे.मग या बाबींचा उल्लेख करताना किती प्रमाणात त्यांनी संशोधन असलेले पुरावे उपलब्ध करुन दिले आहे? कारण भाबडी जनता वा अंध भक्त विश्वास ठेवेल पण जागतिक पातळीवर या बाबी कशा सिद्ध करणार ? आज पाश्चिमात्य राष्ट्रे नवनविन संशोधन करत जगाला पुराव्यानिशी उपलब्ध करुन देत आहे. पण आपण जुन्या गोष्टीतच अडकुन पडलो आहोत. त्याहीशो कोणताच ठोस पुरावा उपलब्ध न करता जाहिरपणे आपलीच पाठ थोपटून घेत आहोत. हे अनाकलनिय आहे.

 

satyapal-inmarathi
newindianexpress.com

पौराणिक घटना सिद्ध करणे सरकारला कठिण जाते .रामसेतु, रामजन्म भूमी , कुरुक्षेत्र युद्ध भूमी हे ठिकाणी संशोधन करावयास वाव आहे ते करुन यथोचित पुरावे सरकारने सादर करावयास हवे.

तसेच फालतु चर्चा बंद करावयास हवे. उलट पाश्चिमात्य देश पुरातन पेक्षा आधुनिक संशोधन करण्यावर भर देत आहे. जागतिक पातळीवर आपले संशोधन तकलादू पडते. सरकारने संशोधकाला प्रोत्साहन दिले पाहीजे. तसेच शालेय पातळीवारुन प्रात्यक्षिक परिक्षा फक्त गुण वाढवण्यासाठीच नाही तर उगवते संशोधक घडविण्यासाठी व्हायला पाहिजे. जेव्हा संशोधन हे उत्क्रुष्ट प्रकारे होईल तेव्हाच असे बेताल व्यक्तव्य करणारे ठिकाण्यावर येतील. आधुनिकीकरणच्या दुनियेत आपतेच मानसिकता पुरातनच आहे हे सिद्ध होते.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?