' उत्तर कोरियाचा किम जोंग "शहाणा" झालाय की चलाख खेळी खेळतोय?

उत्तर कोरियाचा किम जोंग “शहाणा” झालाय की चलाख खेळी खेळतोय?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखक : शशांक

===

जगाला महायुद्धाच्या खाईत लोटू पहाणाऱ्या उत्तर कोरियाच्या किम जोंग उनला काय उपरती झाली आणि त्यानो कसे आपले धोरण बदलत एकदमच नमते घेतले ह्याविषयी सर्वांना आश्चर्य वाटले! तर संपुर्ण उत्तर कोरिया-दक्षिण कोरिया महाभारत ह्या ट्विटमालिकेत!

१. पुर्वार्ध

कोरिया जगाच्या नकाशावर सर्वप्रथम झळकला जेव्हा रशियन आणि जॅपनीज राजवटींना कोरियावर हक्क प्रस्थापित करण्यासाठी १९०४-०५ मध्ये युद्ध केल. बलाढ्य जपान तेव्हा जिंकला आणि जवळजवळ १९४५ पर्यत त्यांनी कोरियावर राज्य करत अतोनात हाल केलेत.

१९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धात पराभव झालेल्या जपानने कोरियाला अमेरिका व सोव्हियत युनियन यांच्या ताब्यात देउन जणू काही आगीतून फुफाट्यातच नेल.

उत्तर कोरिया सो. युनिअनकडे तर दक्षिण अमेरिकेकडे. आणि येथून जन्म झाला दोन वेगळ्या देशांचा, दोन सत्तांचा, DPRK उत्तरेत आणि RK दक्षिणेत! दोन्हींची भाषा एकच, जनता एकच फक्त राज्य करणाऱ्यांची विचारसरणी वेगवेगळी आणि त्यामुळे भविष्यातले वैर.

उत्तरेत कम्युनिस्ट विचारसरणी तर दक्षिणेत कॅपिटलिस्ट! उत्तरेत आजच्या किम जोंग-उनचा आजोबा किम इल-संग हा राज्यकर्ता तर स्यांन्गमन ऱ्ही हा दक्षिणेचा!

पुढे १९५०-५३ मध्ये ह्या दोन कोरियन देशांमध्ये दुसरा आपल्या देशावर आक्रमण करेल अश्या समजातुन युद्ध झालेत आणि ह्यामध्येच उत्तर कोरियाची हरता हरता जित झाली कारण चीन आणि सोव्हिअत युनिअन हे दोन्हीही त्याच्या मदतीला वेळीच धावून आलेत.

 

kim-inmarathi
ultimahora.es

पुढे DMZ अशी ह्या दोन कोरियांमध्ये एक युद्धरेषा ठरवून ह्या देशांनी एकमेकांशी न भांडण्याचा निर्णय घेतला. पुढे उत्तर कोरियाने चांगली प्रगती करायला सुरूवात केली. जपानशीही त्यांनी मैत्री करून घेतली. चीन आणि सोव्हिअत युनिअन हे होतेच पाठीशी, म्हणून किम अल-संग च्या कारकिर्दीत उ. कोरियाने बरीच प्रगती देखील केली.

पण १९९१ साली सोव्हिअत युनिअनचे कोल्ड वॉरनंतर विघटन झाले आणि सुरू झाली…उ. कोरियाची दुरावस्था!

१९९२ साली हा किम अल-संगचा मृत्यू झाला आणि त्याच्या पोराने म्हणजे किम जोंग-इलने कारभार सांभाळला. आता ह्याच काळात उ. कोरियाने अणुशस्त्रांचा विकास संशोधनला सुरुवात केली आणि त्यावरून त्यांचं आणि अमेरिकेचं बिनसलं.

तसेच ह्या जोंग-इल ने “सर्वप्रथम लष्कर” ही प्रथा आणली. लष्कराला अनन्यसाधारण महत्तव दिले गेले. भरीस भर म्हणजे ह्याच काळात उ.कोरियामध्ये भिषण दुष्काळही पडला. त्यामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेला चांगलाच दणका बसला की त्यातुन सावरणे मुष्किलच!

पुढे २००१ मध्ये रिपब्लिकन बुशचं सरकार आलं आणि त्यांनी अणुशस्त्रांच्या वादातुन उ.कोरियाला एक धोकादायक देश म्हणून मान्यता दिली. असे केल्यामुळे जगासमोर उ. कोरियाची प्रतिमा अजूनच खालावली. पण जोंग-इलने मागे न हटता अणुशस्त्र निर्मितीत वेगाने संशोधनला मान्यता दिली.

ह्या अणुशस्त्र संशोधन कार्यक्रमाला सुरूवातच द.कोरियाला भिती घालण्यासाठी केली होती म्हणा! पण द. कोरिया हा अमेरिका आणि युरोपचा मित्रपक्ष. त्यामुळे त्याच्या विरूद्धची कारवाई म्हणजे आपल्यालाही धोका म्हणून अमेरिकेने उ. कोरियाकडे बारकाईने लक्ष घालू लागला.

२. उत्तरार्ध

आता येऊयात २०११ सालाकडे. कुख्यात किम जोंग-उन ह्याने आपल्या वडिलांकडून उत्तर कोरियाचा कारभार स्वीकारला. आता उ. कोरियाच्या अंतर्गत काराभाराबद्दल बोलायचं म्हणजे एखाद्या परीकथेतलं चक्रमादित्याच्या राज्याच्या वर्णन करण्यासारखं! सगळच अनाकलनीय. सगळंच आलबेल.

अमेरिकेने जसे मध्यपुर्वेतील हुकूमशहांचे जसे हाल केलेत तसे आपलेही होतील म्हणून त्याने आता अणुशस्त्रांचे परिक्षणही सुरू केले. ओबामा प्रशासनाने सावधरित्या कुठलीही चेतावणी न देता फक्त निरीक्षकाची भुमिका घेतली.

पण ट्रंप प्रशासन हे भरीस भर! त्यांनी किम जोंग-उन डिवचायला सुरूवात केली. आता ह्याने देखील अणुशस्त्रांचे परिक्षण करून जगाला आपली ताकद दाखवून दिली. गोष्टी २०१६-१७ मध्ये बऱ्याच बिघडल्यात आणि अमेरिकेने उ. कोरियाशी व्यवहार करण्यावर शंभर टक्के बंधन लागू केलीत.

आता आजपर्यत चीन आणि रशिया ह्यांची छुपी मदत उ. कोरियाला होतच होती म्हणून ठीक, पण अमेरिकेने चीनला देखील उघड केलं. आणि त्यांचाही मदत उ.कोरियाला मिळणे बंद झालं. आता ज्याप्रकारे आणि ज्याप्रमाणात अमेरिकेने उ. कोरियाची कोंडी केली त्यातुन त्यांचे जगणेच कठीण झाले.

म्हणून मग २०१८ सालच्या जानेवारीतच किम हा चीनच्या अध्यक्षांच्या भेटीस धावला. दोन-चार समजुतीच्या गोष्टी आणि डावपेच समजून घेऊन त्याने मग चर्चेला संमती दिली.

किमचे चर्चेला येण्याची कारण पुढीलप्रमाणे,

१. व्यवहारावरील बंधन उठवणे

२. शांततेच्या चर्चेत पुढाकार घेऊन जगासमोर स्वत:च चांगल चित्र निर्माण करून आपल्या राज्यावरच स्थान बळकट करणे.

३. अमेरिकेच कोरियन देशामधला हस्तक्षेप थांबवणे.

४. सगळे व्यवहार सुरळीत झाल्यानंतर, स्वत:च्या देशाची अर्थव्यवस्था पुर्नबांधणी करणे.

५. एकदा दोन-पाच वर्षात अर्थव्यवस्थेला चालणा मिळली की पुन्हा आहेच अणुशस्त्र सशोधन व निर्मिती पण सध्यातरी चांगल्या कामांसाठी चर्चेत राहणे.

 

korea-inmarathi
twitter.com

आता बघू ही शांततावार्ता, अमेरिकेचा दृष्टिकोणातून…

अमेरिकेला असा एकही विरोधी देशाचं अस्तित्वच नकोय ज्याच्याकडे आहेत अणुशस्त्र. म्हणून अमेरिकेचा ह्यावेळेस पुर्ण प्रयत्न असेल उ. कोरियालाच नामशेष करण्याचा. म्हणजे चर्चेतुन दोन्ही कोरियांच मनोमिलन आणि एकत्रीकरण. असे केल्यास अमेरिकाला रशिया व चीन वर कुरघोडी करण्यासाठी चांगली जागा मिळेल.

हा झाला खुप पुढचा, भविष्यातला दृष्टीकोन! पण स्ध्यातरी उ.कोरियाला माणसात आणणे, तिथल्या जवळजवळ लाखभर लोक जे राजकीय बंदी म्हणून तुरूंगात ठेवलेत त्यांना मोकळं करणे, तसेच एकूनच मानवहितवादी धोरण उ. कोरियात राबवणे, उ. कोरियाची संपुर्ण अणुशक्ति संपवणे जेणेकरून भविष्यात धोका राहणार नाही!

आता सध्यातरी सगळ चित्र अंधुक आहे, पण येत्या ऑगस्टपर्यत सर्व समोर येईल. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की उ. कोरिया नमते घेतो आणि अमेरिकेला हक्क दाखवायला अजून एक जागा मिळते की चीन पडद्याआड मुत्सुद्दी खेळ करत उ. कोरिया द्वारे जगाची महासत्ता खरा कोणता देश हे दाखवतो!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?