' एअर हॉस्टेसच्या 'स्टायलिश' लाईफस्टाइल मागचं कधीच समोर न येणारं 'वास्तव'!

एअर हॉस्टेसच्या ‘स्टायलिश’ लाईफस्टाइल मागचं कधीच समोर न येणारं ‘वास्तव’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

एयर होस्टेसच्या सुंदर चेहऱ्यामागील सत्य हे सहसा कोणाला माहित नसतं. वरून वरून अगदी सुंदर आणि स्वप्नवत दिसणारं ह्यांचं हे जग खरंच एवढं सुंदर असतं का? की ह्यामागे देखील कुठलं विकृत जीवन ते जगत असतात.

हाच प्रश्न क्वोरा ह्या साईट वर विचारला गेला. आणि त्यावर जे उत्तर मिळालं ते खरंच धक्कादायक आहे. आणि त्या हवाईसुंदरीचं जीवन जेवढं सुंदर आणि स्वप्नवत दिसतं पण त्या मागील अंधारमय जग हे फक्त त्यांनाच सहन करावं लागतं.

 

Air hostes-inmarathi

एकटेपणा :

एयर होस्टेस ह्या संपूर्ण जगभर भ्रमंती करत असतात. कंपनीच्या पैश्यांवर त्या नवीन-नवीन जागी फिरतात, त्या वेगवेगळ्या लोकांना भेटतात. पण कोणीही आपल्या मनातली गोष्ट कुठल्या अनोखळी व्यक्तीला नाही सांगू शकत.

त्यासाठी कोणीतरी आपलं हवं असतं. कारण आपण संपूर्ण जग फिरलो तरी आपण गप्पा ह्या आपल्या मित्रांसोबतच करतो. ह्या भलेही संपूर्ण जग फिरत असतील पण तरी कुटुंब आणि मित्रांशिवाय त्या एकट्याच पडतात.

आरोग्य :

एयर होस्टेस ज्या परिस्थितीत राहतात काम करतात त्या परिस्थितीत काम करणे हे मानवी शरीरासाठी अनुकूल नाही. एवढ्या उंचीवर काम केल्याने ह्याचा विपरीत परिणाम मेंदूवर होतो. स्मरणशक्ती कमी होते.

काम करत असताना त्या पाणी देखील कमी पितात त्याचा परिणाम त्यांच्या किडनीवर होतो.

 

Air-hostes-InMarathi

 

शोषण :

विमानात प्रवास करणारे काही प्रवासी हे किती निर्लज्ज असतात हे तर आपणा सर्वांनाच माहित आहे. त्यांच्या चुकीच्या वागणुकीचे अनेक उदाहरण आपल्या समोर आहेत. पण एअर होस्टेस ना प्रवाश्यांच्या अश्या छोट्या-मोठ्या व्यवहारांकडे दुर्लक्ष करावे लागते. पण जर कुठली मोठी घटना घडली तेव्हा त्यावर कारवाई केली जाते.

नोकरी :

नेहेमी आपल्याला असं वाटत असतं की, एअर होस्टेसची नोकरी ही खूप दर्जेदार आहे. पण वेळ पडली तर त्यांना ओकाऱ्या देखील स्वच्छ कराव्या लागतात. कोणी कसंही वागलं तरी त्यांना हसूनच उत्तर द्यावं लागतं. हे आपल्याला वाटतं तेवढं सोप्प नाही.

 

Air hostes-inmarathi01

 

हे ही वाचा :

===

 

सुट्ट्या :

आपल्याला कुटुंबात काही कार्यक्रम असला किंवा सण असला तर आपल्याला हमखास सुट्ट्या मिळतात. पण एअर होस्टेसचे जीवन असे नसते. त्यांना खूप कमी सुट्ट्या मिळतात. सामान्य सुट्ट्या देखील त्यांना कमी असतात. म्हणून जास्तकरून एअर स्टाफ हा होमसिक असतो.

कामाची वेळ :

एअर होस्टेस ह्यांच्या कामाचे कुठले रुटीन नसते. त्यांच्या कामाची वेळ ही विमानाच्या वेळेनुसार बदलत असतो. त्यांना १०-११ तास काम करावे लागते. त्यामुळे त्यांना स्वतःच्या घरी घालवायला खूप वेळ मिळतो.

 

Air hostes-inmarathi02

नेहमी आकर्षक दिसणे :

त्यांना कितीही त्रास होत असला तरी त्यांना नेहेमी रिप्रेझेंटेटिव राहावं लागतं. काहीही झालं तरी त्यांच्या चेहऱ्यावरील मेकअप हा कमी होता कामा नये. दिवसातून ७-८ तास एवढा सारा मेकअप लावून ठेवणं काही सोप्प नाही. ह्याचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच होतो.

 

Flight launch of Air Asia fiight

एअर होस्टेस ह्यांना आपण हवाई सुंदरी असं म्हणतो कारण त्यांचं कामच तसं असतं. त्यांना नेहेमी सुंदर दिसावं लागतं. भलेही त्यांना त्यांच्या कामाचा बऱ्यापैकी मोबदला मिळत असतो, पण तरी त्यासाठी त्यांना तेवढं सहनही करावं लागतं हेही तेवढंच खरं आहे.

 

हे ही वाचा :

===

 

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?