इस्लामी धर्मगुरुंना विचारले गेलेले मनोरंजक प्रश्न आणि हास्यास्पद फतवे…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

भारतातील मुस्लिमांना मुलभूत इस्लामची शिकवण देणे या एका उद्देशाने स्थापन झालेलेल एक जगप्रसिध्द विद्यापीठ भारतात आहे. उत्तर प्रदेशातील देवबंद या ठिकाणी. दार-उल-उलुम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विद्यापीठाची स्थापना झाली १८६६ साली.

तेव्हा हे विद्यापीठ अतिशय लहान स्वरुपात होते, आज त्याचा व्याप अवाढव्य आहे.

जगभरात हे विद्यापीठ मुस्लीम पंडित निर्यात करते. कित्येक देशांतून येथे विद्यार्थी इस्लामी मुलतत्वांचे शिक्षण घेण्यासाठी येतात.

 

darul-uloom-deoband-inmarathi
islambestreligion.wordpress.com

हे विद्यापीठ त्यांच्या वेबसाईटवर शेकडो फतवे प्रसिध्द करत असते. फतवा म्हणजे एखादी शंका घेऊन जेव्हा इखेडी व्यक्ती इस्लामचे ज्ञान असणार्या मुफ्तीकडे जाते तेव्हा मुलभूत इस्लामचे त्यावरचे मुफ्तीने दिलेले मत असते. हा फतवा पाळणे इस्लाममध्ये आवश्यक समजले जाते. शंका घेऊन जाणारी व्यक्ती जी शंका विचारेल त्या शंकेचे समाधान तेथे केले जाते.

या मुफ्तींना अनेकदा अत्यंत हास्यास्पद असे प्रश्न काही वेळा विचारले जातात. आणि या प्रश्नांना उत्तरेही अत्यंत गांभीर्याने दिली जातात. असेच काही हास्यास्पद प्रश्न आणि त्यावर काढलेले विनोदी फतवे पाहूया..

===

१. एका व्यक्तीने असा प्रश्न विचारला की “मी दिवसातून पाच वेळा नमाज पढतो. पण लघवी केल्यानंतर तासाभरापेक्षा जास्त वेळ लघवीचे थेंब चालू राहतात. त्यासाठी मी बऱ्याचदा टिश्यू पेपरचा वापर करतो. पण सकाळच्या वेळी त्याचाही काहीच फायदा होत नाही. मी लाघवी न करता नमाज पढू शकतो का?”

 

darulifta-deoband.com

त्यावर मुफ्ती महोदय उत्तर देतात की, “तुमचा प्रश्न वाचून असे कळते की तुम्ही लघवी केल्यानंतर एक तास थेंब चालू राहतात आणि त्यानंतर बंद होतात. म्हणजे तुम्ही पुन्हा लघवीला जाईपर्यंत थेंब येत नाहीत. याचा अर्थ तुम्हाला लघवीसशी संबंधित कोणताही विकार झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला नमाज पढणे बंधनकारक आहे.

ही समस्या असल्याने तुम्ही जेव्हा नमाजाच्या आधी “वदू” (शरीराचे सर्व भाग धुवून पवित्र होणे) करता त्यानंतर भेंब चालू राहिले तर तुम्हाला पुन्हा वदू करावी लागेल. महत्वाचे म्हणजे तुम्हाला नमाजाच्या ४५ मिनिट आधी लघवीला जाणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमची नमाजाची वेळ होईपर्यंत थेंब येणे बंद होईल.

हा फतवा देवबंदच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तो या ठिकाणी वाचता येईल.

===

२. “दारूचा व्यापार करणाऱ्या व्यक्तीच्या एअरलाईन कंपनीच्या विमानातून प्रवास करणे योग्य आहे काय?” असा एक प्रश्न एका व्यक्तीने विचारला होता. किंगफिशर या विमान कंपनीबद्दल हा प्रश्न होता.

 

fatwa-2-inmarathi
darulifta-deoband.com

त्यावर उत्तर देताना मुफ्ती महोदय म्हणतात, “बिगरमुस्लीम व्यक्तीसाठी दारूचा व्यापार करणे आणि त्यातून पैसे कमावणे ही गोष्ट कायदेशीर आहे. त्यातून येणारे उत्पन्न त्यांच्यासाठी कायदेशीर आहे. आणि त्या उत्पन्नातून त्यांनी विमान कंपनी सुरु केली आहे. अशा कायदेशीर उत्पन्नातून सुरु झालेल्या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करणे मुस्लीम व्यक्तीला वर्ज्य नाही. ते अशा विमानातून प्रवास करू शकतात.”

हा फतवा देवबंदच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, तो या ठिकाणी वाचता येईल.

===

३. एका व्यक्तीने असा प्रश्न विचारला की सिनेमात काम करणे इस्लामला मान्य आहे का?

 

fatwa-3-inmarathi
darulifta-deoband.com

त्यावर उत्तर असे दिले गेले की, “सिनेमात अनेक पाखंड दाखवले जातात जे इस्लामी शिकवणीच्या विरुध्द आहेत. इस्लामी कायद्याने चुकीच्या ठरवलेल्या गोष्टी सिनेमाच्या केंद्रस्थानी असतात. किंवा त्यांच्याशी असलेले नाते सिनेमात दाखवले जाते. या दोन्ही गोष्टी शरियतला अमान्य आहेत. कुराण म्हणते की “कुणालाच पापात मदत करू नका. अल्लाह सर्वशक्तिमान आहे, त्याची भीती बाळगा..”

हा फतवा देवबंदच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तो या ठिकाणी वाचता येईल.

===

४. मुले आणि मुली एकत्र असणाऱ्या शाळेत शिकणाऱ्या एका मुलाने एक मजेशीर प्रश्न विचारला. तो विचारतो की मी अशा शाळेत शिकतो, अनेकदा मुली अभिनंदन करण्यासाठी किंवा इतर काही कारणांसाठी माझ्याशी हस्तांदोलन करतात. बहिण या नात्याने मी ते स्वीकारतो. असे हस्तांदोलन करणे योग्य आहे का?

 

fatwa-4 -inmarathi
darulifta-deoband.com

त्यावर मुफ्ती साहेब यापेक्षा मजेशीर उत्तर देताना म्हणतात, की “मुस्लीम व्यक्तीने बिगरमुस्लीम व्यक्तीचे अभिनंदन करण्याचीही परवानगी नाही, तिथे हस्तांदोलन करण्याचा तर प्रश्नच येत नाही!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “इस्लामी धर्मगुरुंना विचारले गेलेले मनोरंजक प्रश्न आणि हास्यास्पद फतवे…

  • January 17, 2020 at 12:13 pm
    Permalink

    मूर्खाचा बाजार

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?