' या बँकेत माणसे काम करत नाहीत, तरीही बँक सुरु आहे. कसे काय? वाचा… – InMarathi

या बँकेत माणसे काम करत नाहीत, तरीही बँक सुरु आहे. कसे काय? वाचा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बॅंक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच दृश्य उभं रहातं, ते म्हणजे एका खोलीत असलेले 3-4 काउंटर आणि त्यासमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. पण जर तुम्ही कुठल्या बँकेत गेला आणि तिथे तुम्हाला एकही व्यक्ती किंवा कर्मचारी दिसला नाही तर? आपल्याला वाटेल की आज बँकेला सुट्टी आहे. पण जर त्या बँकेत तुम्हाला बँकेचे कर्मचारी नाही तर रोबोटस दिसले तर.. नक्कीच आपलं डोकं चक्रावून जाईल.

 

robots-inmarathi06
thatsmags.com

पण चीनच्या शांघाय ह्या शहरात जगातील पहिली अशी बँक उघडली आहे जिथे कर्मचारी नाही तर चक्क रोबोटस काम करतात. चायना कंस्ट्रक्शन बँक (CCB) नावाची ही सरकारी बँक जगातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. या बँकेच्या जवळपास १३,६२९ शाखा आहेत. याशिवाय जगभरातही वेगवेगळ्या देशातही या बँकेच्या शाखा आहेत.

 

robots-inmarathi07
ibtimes.co.uk

CCB बँकेची शाघांय शहरातील शाखा ही पूर्णपणे कृत्रिम बुद्धीमत्ता (Artificial Intellegance), मानवी चेहरा ओळखण्याचे तंत्र (Face Recognition) आणि आभासी वास्तव (Virtual Reality) या तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत. येथे ग्राहकांचे काम करण्यासाठी रोबोटस आहेत. सोबतच ह्या बँकेत आर्टिफिशियल इंटेलिजेंस मशीन्स आहेत, ज्या ग्राहकांना सेवा पुरविण्याचे काम करतात.

 

robots-inmarathi08
globaltimes.cn

ह्या बॅंकेतील रोबोटस ग्राहकांशी संवाद देखील साधतात. आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे ते ग्राहकांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देण्यात सक्षम आहेत.
ह्या बँकेच्या एन्ट्री गेटवर एक मानवासारखा दिसणारा (ह्यूमनॉइड रोबोट) आहे. जो येणाऱ्या ग्राहकांचे स्वागत करतो. त्याचबरोबर तो त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही देतो.

 

robots-inmarathi02
topyaps.com

बँकेत आत जाण्यासाठी ग्राहकांना आपलं राष्ट्रीय ओळख कार्ड स्वाईप करावं लागतं. त्यानंतरचा ग्राहकांना बँकेत एन्ट्री घेता येते. येथील रोबोटस ग्राहकांना खाते उघडण्यापासून ते पैसे ट्रान्स्फर करण्यापर्यंत प्रत्येक काम करतात. जे एखाद्या सामान्य बँकेतील कर्मचारी करतात.

 

robots-inmarathi04
nowtheendbegins.com

आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने चालविल्या जाणाऱ्या या बँकेबद्दल CCB च्या कर्मचाऱ्यांच्या मते बँकेच्या या मानवरहित शाखेमुळे बँकिंग सेवा सोप्यारीतीने आणि अधिक जलद गतीने ग्राहकांना पुरविल्या जाऊ शकतात. पण या रोबॉट्स असलेल्या बँकेवरून आपल्याला आपलं भविष्य कसं असेलं हे कळू शकते, जिथे मनुष्याला कुठलाही काम करावं लागणार नाही, तो ह्या रोबोटस भरवश्यावर कुठलाही काम सहजपणे आणि अधिक गतीने करू शकतो.

अर्थातच अशा प्रकारच्या यांत्रिकीकरणामुळे मनुष्यबळाचा कमीत कमी वापर आणि अर्थातच बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकेल का? यावर वेळीच विचार करणं आवश्यक आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?