' "जय भीम हा नारा इस्लामच्या विरोधात" वाचा इस्लामच्या अधिकृत भूमिकेमागचं सत्य!

“जय भीम हा नारा इस्लामच्या विरोधात” वाचा इस्लामच्या अधिकृत भूमिकेमागचं सत्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : मुकुल रणभोर

 

फतवे काढण्याची परवानगी कोणालाही नसते. कोणीही उठला आणि फतवा काढला असं होत नाही.

फतवा काढणाऱ्याचं इस्लामचं ज्ञान वादातीत असतं, आणि असं ज्ञान असणाऱ्या व्यक्ती, संस्थेला फतवा काढण्याचा अधिकार असतो.

शिवाय सामान्य माणूस रोजच्या आयुष्यातले प्रश्न घेऊन मुफ्ती, मौलवीकडे जातो त्या समस्येवर, प्रश्नाला दिलेली उत्तरं म्हणजे फतवे असतात.

तेव्हा तुम्ही जे फतवे न्यूजमध्ये किंवा कुठेही वाचता ते out of blue नसतात. तो मुलतः विचारलेला प्रश्न असतो, त्याला तुम्ही वाचत असलेला फतवा हे उत्तर असतं.

या संदर्भात जेष्ठ पत्रकार आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील एक विचारवंत पत्रकार ‘अरुण शौरी’ याचं World Of Fatwas नावाचं पुस्तक आहे.

आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आज अभ्यास करताना एक फतवा सापडला.

भारतात आणि जगात अलिगढची देवबंद स्कूल प्रतिष्ठित मानली जाते.

शिवाय दार-उल-उलूम देवबंद (दार उल उलूम चा अर्थ ‘ज्ञानाचे घर’ असा होतो) या संस्थेला फतवे काढण्याचा अधिकार आहे.

 

darul-uloom-deoband-inmarathi

हे ही वाचा – चीनचा मुसलमान आणि त्या मुसलमानांची गळचेपी करणारा शिनजियांग प्रदेश!

 

तर देवियो और सज्जनो आणि खावाती-नो हजरात

त्या देवबंदने काढलेला फतवा होता की ‘जय भीम’ हा नारा इस्लामच्या विरोधात आहे.

उत्तर प्रदेशात एका विद्यापीठात शिकणारा एक मुस्लीम विद्यार्थी दार उल उलूमच्या मुफ्ती कडे गेला होता

आणि म्हणाला ‘माझ्याबरोबरचे माझ्ये विद्यार्थी मित्र एकमेकांना भेटताना ‘सलामू आलेकुम’ किंवा ‘वालेकुम असल्लाम’ म्हणत नाहीत, ते एकमेकांत ‘जय भीम’ म्हणून बोलण्याची सुरवात करतात.

तर हे योग्य आहे का?

त्यावर तो अत्यंत प्रतिष्ठित संस्थेचा एक प्रतिष्ठित मुफ्ती उत्तर देतो, की अल्लाह शिवाय कोणाचाही जयजयकार करणे हे इस्लामी कायद्याच्या विरोधात आहे, तेव्हा ‘जय भीम’ म्हणणे चुकीचेच आहे.

इस्लामच्या मूलभूत सिद्धांतांचा, इस्लामच्या इतिहासाचा समग्र लेखाजोखा बाबासाहेबांनी मांडला आहे.

स्वतः बाबासाहेबांनी वाचून मान्यता दिलेले बाबासाहेबांचे दुसरे विश्वसनीय चरित्र म्हणेज धनंजय कीर यांनी लिहिलेले चरित्र.

पाकिस्तान या ग्रंथाबद्दल कीर लिहितात, ‘मुसलमानांच्या प्रतिगामी वृत्तीचे वर्णन करणारा काही खरमरीत नी बोचरा भाग मित्रांच्या भिडेखातर बाबासाहेबांनी गाळला.’

अन्यथा आज प्रसिद्ध असणाऱ्या मजकुरापेक्षा जास्त बोचरा आणि तिखट ग्रंथ आपल्यासमोर असता.

 

Ambedkar-inmarathi

 

हे ही वाचा – “मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण म्हणून मी धर्मांतर करणार नाही!”

२ वर्षांपूर्वी महाराष्ट्र नगर पालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागले होते. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ४० पेक्षा जास्त नगरसेवक हे असवूद्दिन ओवेसी यांच्या MIM या पक्षाचे होते.

त्यांनी दलित आणि मुस्लीम युती असे समीकरण मांडून निवडणुका लढवल्या.

बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती वर्षात MIM च्या मागे जाणाऱ्या दलितांनी बाबासाहेबांनी केलेली इस्लामची चिकित्सा वाचून MIM ला पाठींबा द्यावा.

आणि दुसऱ्या बाजूने MIM ने सुद्धा बाबासाहेबांनी आपल्या इस्लामधर्माबद्दल काय लिहिले आहे, याचा अभ्यास करावा.

असा अभ्यास झाल्यास कोणीही बाबासाहेबांचा अपमान होईल अशी ‘जय मिम, जय भीम’ अशी घोषणा देणार नाही.

===

दार-उल-उलुम ने दिलेल्या या फतव्यासंदर्भातील इंडियन एक्स्प्रेसची बातमी या ठिकाणी वाचता येईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?