' कर्नाटकात राहुल गांधींचा "मन की बात" चा अभिनव प्रयोग!

कर्नाटकात राहुल गांधींचा “मन की बात” चा अभिनव प्रयोग!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

काँग्रेसने आज नव कर्नाटक म्हणत जाहीरनामा प्रकाशित केला. त्यावर राहूल गांधींनी पुढीलप्रमाणे ट्विट केलं.

We released the Congress Manifesto for Karnataka earlier today. It captures the “Mann Ki Baat” of the people of Karnataka and makes very specific commitments that we intend to deliver on, including creating 1 Cr. new jobs over the next 5 yrs. #NavaKarnatakaManifesto https://t.co/hktUWrpeiI

त्यातला *”मन की बात”* शब्द वाचून उत्सुकता चळावली गेली. सुरुवातीला वाटलं की ज्या शब्दाचा कधीकाळी उपहास करणारे राहुल गांधी नेमके हेच तीन शब्द वापरून उपहास तर करत नसावेत. पण, काही मोजके राज्य हातात असताना त्यातील मोठ्या राज्याची निवडणूक जाहीरनामा प्रकाशित करताना उपहास केला तर तो अंगलट येऊ शकतो. शेवटी न रहावून हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांना संपर्क केला.

राजीव सातवांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं की आजवर भाजप असो वा मोदीजी फक्त त्यांच्या मनातली गोष्ट “*मन की बात*” म्हणून लादत आले आहेत. मात्र, आम्ही खरोखर काम केलं आहे म्हणून जनतेच्या मनातील गोष्ट मांडतोय म्हणून *”मन की बात”* असा शब्दप्रयोग केला आहे.

 

rahul-gandhi-inmarathi
newsx.com

इथे एक गोष्ट आठवते ती अणुउर्जेबाबत. अणुऊर्जा असलेला अणुबॉम्ब विध्वंस करू शकतो किंवा तीच अणुऊर्जा योग्य प्रकारे वापरून वीज निर्मिती केली जाते. थोडक्यात वस्तू, घटक किंवा शब्द सारखे असले तरी त्याच्या योग्य-अयोग्य वापरावर त्याची गुणवत्ता किंवा उपयोगीता सिद्ध होते. असो, मूळ विषयाकडे वळू.

राजीव सातव चर्चेदरम्यान म्हणाले की शब्दांच्या खेळाबाबत बोलायचे तर सन २००४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना तब्बल चार दशकांहून अधिक संसदीय कामांचा अनुभव होता. त्यांच्या समोर त्यामानाने राजकीय दृष्ट्या एक व्यक्ती म्हणून सोनिया गांधी खूपच नवख्या होत्या. वाजपेयी पंतप्रधान असताना पोखरण अणुबॉम्ब चाचणी, कारगील युद्धातील विजय आदी गोष्टींचा प्रचार करत “India Shining” चा नारा देत निवडणुकीला सामोरे गेले.

पुढे निवडणूक निकालात भाजप परास्त झाली अन् काँग्रेसने यूपीए स्थापन करून सत्ता स्थापन केली. थोडक्यात शब्दचं निवडणूक जिंकवातात किंवा हरवतात असे नाही.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा सातवांनी मांडला तो म्हणजे काँग्रेसने कधी जाहिरातबाजी केली नाही. काँग्रेस कामावर भरवसा करते. थोडक्यात काँग्रेस जनतेचे काम करून *”काम की बात*” तर करतेच सोबत जनतेच्या *”मन की बात”* देखील करते आणि हेच कारण आहे; कर्नाटकचा जाहीरनामा प्रकाशित करताना राहुल गांधींनी *”मन की बात”* असा शब्दप्रयोग केला.

inc-inmarathi
capitalkhabar.in

सध्या नक्षलवादाचा अभ्यास करताना सन २००८-२००९ च्या आसपास प्रकाशित झालेला एक शासकीय अहवाल वाचताना एक शब्दप्रयोग लक्षवेधी वाटला. त्यात नक्षलवाद समस्येचे उच्चाटन करण्यासाठी आणि सर्वांचा विकास करण्यासाठी सरकार “All Inclusive Policy” तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार आहे असे म्हंटले होते. पुढे सन २०१४ मध्ये मुद्दाम की योगायोगाने माहिती नाही पण नेमके “सबका साथ, सबका विकास” म्हणतं भाजपने केंद्रात सत्ता स्थापन केली.

थोडक्यात “All Inclusive Policy” हेच स्वप्न मोदींनी जनतेला दाखवलं होतं. या लेखाचा उद्देश कर्नाटक कोण जिंकणार किंवा कोण हरणार यावर भाष्य करणे असा अजिबात नाही. या लेखाद्वारे किमान मी तरी राहुल गांधींच्या काही तासांपूर्वीच्या ट्विटबाबत माझी *”मन की बात”* सामायिक (शेयर) करण्याचा प्रयत्न करत आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?