'वजन कमी करण्यासाठी हे पदार्थ खाताय? मग त्यांचे विपरीत परिणाम होणार नाहीत याची खात्री करून घ्या !

वजन कमी करण्यासाठी हे पदार्थ खाताय? मग त्यांचे विपरीत परिणाम होणार नाहीत याची खात्री करून घ्या !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज आपण स्वतःला निरोगी आणि सुदृढ ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. मग त्यासाठी व्यायाम, योग, जिम वगैरे सर्व करतो.

त्यातच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपलं डाएट. वजन कमी करण्यासाठी लोक डाएट करतात. मग त्यात त्या सर्व गोष्टींचा समावेश असतो ज्याने वजन वाढत नाही.

पण तुम्ही वजन वाढू नये म्हणून जे काही खाता ते खरंच तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करतं का?

आज ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत.

 

decreasing
delish.com

 

कोणीतरी सांगितलं की हे खाल्ल्याने वजन कमी होतं, किंवा टीव्हीवर येणाऱ्या जाहिराती पाहून आपण त्या गोष्टी आपल्या आहारात समाविष्ट करून घेतो.

पण त्याने खरंच काही फायदा होतो की, नाही ह्याचा आपण विचारही करत नाही. बाजारात मिळणारी प्रत्येक वस्तू ही आपल्या शरीरासाठी चांगली असेलचं असं नाही.

 

ग्लूटेन मुक्त प्रोडक्ट्स :

ग्लूटेन मुक्त प्रोडेक्ट्स ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे तांदळाचे पीठ, स्टार्च आणि साखर असते. ज्यातून तुमच्या शरीराला कुठल्याही पोषकतत्वांचा लाभ मिळत नाही.

 

glutane free-inmarathi
foodbusinessnews.net

 

सुकलेली फळे :

Sayonara Dried आंबा आणि अननस ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखरेची मात्र असते. सुकलेल्या आंब्याच्या एका फोडीत २७ ग्राम साखर असते. त्यामुळे ह्याचे सेवन आपल्या शरीरासाठी कुठल्याही प्रकारे लाभदायक नाही.

त्यापेक्षा तुम्ही ताज्या फळांचे सेवन करा. आणि कधीही दुकानातून अशी सुकलेली फळं घेताना त्यातील पोषकता तपासून घ्या.

 

realfoods.co.uk

 

आर्टिफिशियल शुगर :

आर्टिफिशियल शुगर ज्याला आपण शरीरासाठी चांगलं मानतो ती तुमच्या शरीरासाठी मुळीच चांगली नसते. एवढचं नाही तर ह्या शुगर फ्री प्रोडक्ट्समुळे कॅन्सरसारखा भयानक आजार देखील होऊ शकतो.

तरी जर तुम्हाला शुगर फ्री वस्तूंचा वापर करायचा असेल तर नैसर्गिक स्त्रोतांपासून जसे की Agave Plants ह्यापासून बनलेल्या शुगर फ्री गोष्टींचा उपयोग करा, ज्याने तुमच्या आरोग्याला काहीही धोका नाही.

 

ArtificialSweeteners-inmarathi
world.wng.org

 

फ्लेवर्ड योगर्ट :

चांगल्या निरोगी शरीरासाठी सामान्य योगर्टचा वापर करायला हवा. कारण हे जे फ्लेवर्ड योगर्ट बाजारात मिळतात त्यांच्यामध्ये फळ कमी आणि जास्त प्रमाणात साखर मिसळलेली असते.

 

 

ट्रेल मिक्स :

जर तुम्ही स्वतःला निरोगी आणि सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करत आहात तर तुम्हाला अनसॉल्टेड नट्स, डार्क चॉकलेट आणि कॅण्डी ट्रेल मिक्स ह्यांपासून दूर राहायला हवं.

 

trail-mix-inmarathi
farmfreshfeasts.com

 

Meal Replacement Bars :

जर तुम्हाला वाटत असेल की Meal Replacement Bars मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि ताकद असते तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात.

 

meal-bar-inmarathi
thrivepersonalfitness.com

 

कारण ह्यात मोठ्या प्रमाणात क्रीम असते जे आपल्याला वजन कमी करण्यासाठी कुठल्याही प्रकारे मदत करत नाहीत.

फ्रोजन योगर्ट :

जर तुम्ही कॅण्डी आणि साखरेने बनलेले फ्रोजन योगर्टचे सेवन करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.

 

yogurt-inmarathi
seriouseats.com

 

Low-Fat/Fat-Free :

युकेमध्ये झालेल्या एका शोधानुसार, Low-Fat/Fat-Free फुड्समध्ये १० टक्के जास्त कॅलरी आणि ४० टक्के जास्त साखर असू शकते. ह्या वस्तूंमध्ये अशा फ्लेवर्सचा वापर केला जातो ज्यात साखरेचे प्रमाण खूप जास्त असते.

 

fat-free-foods-inmarathi
mymcmedia.org

 

सलाड :

सलाड हे नेहमी तुमच्या आरोग्यासाठी चांगलेच असेल असं नाही. आपण हॉटेलमध्ये जे सलाड खातो त्यामध्ये ड्रेसिंग असते ज्यामुळे त्यातील पोषकतत्व नष्ट होऊन जातात.

त्यामुळे घरचं सलाड कधीही चांगलं.

 

salad-inmarathi
delish.com

 

व्हेज बर्गर :

जर तुम्ही आरोग्याचा विचार करत व्हेज बर्गर खात असाल, तर हे जाणून घ्या की Veg Burgers हे हेल्दी नसतात. तर काही बर्गर हे तांदूळ आणि मैदा ह्यांच्यापासून बनलेले असतात.

 

burger-inmarathi
funandfoodcafe.com

 

ह्यासारखे आणखी कितीतरी पदार्थ आहेत जे आपण आरोग्याला चांगले आहेत म्हणून खात असतो. पण ते आपल्या आरोग्यासाठी मुळीच चांगले नसतात.

त्यामुळे कोणाच्या सांगण्यावरून किंवा जाहिरातीवरून त्या गोष्टी स्वतःच्या आहारात समाविष्ट करू नका.

सर्व पदार्थ खाण्यापूर्वी खरंच तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे की नाही ह्याची आधी तपासणी करून घ्या…

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?