लंडनमध्ये चहाचं दुकान टाकणारा भारतीय युवक आज करोडपती झालाय !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक यशस्वी माणसामागे त्याच्या अपयशाची एक कहाणी नक्की असते, ज्यातून वर येऊन त्याने आज हे यश प्राप्त केलेलं असतं. ह्यासाठी गरज असते ती केवळ प्रयत्न आणि महत्वाकांक्षेची. असे अनेक लोक आपल्याला माहित आहेत ज्यांनी अपयशाच्या पायरींवर चढत चढत यशाचे शिखर गाठले आहे. आज त्यापैकी एकाची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

rupesh-thomas-inmarathi02
dailymail.co.uk

ह्या व्यक्तीने स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. काही काळाआधी थोडेसे पैसे घेऊन लंडन येथे आलेला हा तरुण आज १८ कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक आहे.

३९ वर्षीय रुपेश थॉमस हे मुळचे केरळ येथील, ज्यांनी आपल्या चांगल्या भविष्याकरिता लंडनला जायचे ठरवले. आणि आज रुपेश ह्यांचे इंग्लंडमध्ये दोन बंगले आहेत. ज्याची किंमत १०-१२ कोटी रुपये आहे.

 

rupesh-thomas-inmarathi01
d3gtswiihfkcji.cloudfront.net

पण हे सर्व रुपेशला असचं सहजपणे नाही मिळालं, तर त्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली. २००२ साली लंडनला गेल्यावर ते तिथल्या मॅकडोनाल्डला नोकरी करू लागले. जिथे त्यांना एका तासाचे ३५० रुपये मिळायचे. तरी त्यांनी आशा सोडली नाही, ते आपल्या पूर्ण निष्ठेने काम करत राहिले. काही काळाने त्यांना मार्केटिंग मध्ये नोकरी मिळाली. ज्यात ते सेल्समन बनून घरोघरी जाऊन समान विकायचे.

त्यांच्यातील स्किल्स आणि कामाप्रती त्यांची प्रामाणिकता बघत त्यांना प्रमोट केले गेले. २००७ साली रुपेश ह्यांची ओळख एलेक्जेंड्रा हिच्याशी झाली. काही काळाने हे दोघे विवाहबंधनात अडकले.

 

rupesh-thomas-inmarathi
dailymail.co.uk

ह्यादरम्यान त्यांच्या जीवनाला एक नवीन मार्ग मिळाला. त्यांच्या पत्नी ह्यांना भारतीय चहा खूप आवडायचा. ह्यातून रुपेशला चहाच्या व्यवसायाचा आयडिया आला. एवढ्या वर्षांत रूपेशने जो पैसा जमा केला, त्याला गुंतवून त्यांनी इंग्लंडमध्ये चहाचा व्यवसाय सुरु केला.

हळूहळू त्यांचा हा व्यवसाय वाढू लागला. आणि रुपेशच्या चहाचा हा ब्रान्ड लोकप्रिय झाला. आज ह्या ब्रान्डची लोकप्रियता एवढी वाढली की आज त्यांच्या चहाची सप्लाय इंग्लंडच्या सर्वात लग्जरी डिपार्टमेंटल स्टोर हार्वे निकोल्स ह्यांच्याकडे होत आहे.

आज रुपेश थॉमस ह्यांनी दाखवून दिले की मेहनत आणि महत्वाकांक्षेच्या जोरावर आपल्याला हवं ते आपण मिळवू शकतो…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?