प्रदीर्घ आयुष्य जगायचं असेल तर पुरुषांपासून दूर राहा : १०९ वर्ष जगलेल्या महिलेचा सल्ला!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

जीवनात आनंदी राहणे खूप गरजेचे असते. असं म्हणतात की आनंदी राहिल्याने आपण जास्त काळ जगतो. पण स्कॉटलंड येथील १०९ वर्षीय वृद्ध महिला जेसी ह्यांचं प्रदीर्घ काळ जगण्याचं कारण जरा वेगळंच आहे. त्यांच्या मते जर तुम्हाला प्रदीर्घ काळ जगायचं असेलं तर पुरुषांपासून दूर राहावे.

 

jessie gallan -inmarathi02
gazabpost.com

जेसी गॅलन ह्या स्कॉटलंडच्या सर्वात वृद्ध महिल्या होत्या. जेसी आता ह्या जगात नाहीत पण त्यांनी त्यांच्या मृत्यूआधी आपल्या एवढ्या मोठ्या आयुष्याबद्दल जे सांगितले ते खूप आश्चर्यकारक आणि विचित्र असे होते. आपल्याला वाटतं की, जर मनुष्याने योग्य आहार, योग्य दिनचर्या, रोज व्यायाम इत्यादी सर्व केलं तर तो जास्त काळ जगू शकतो. पण जेसी ह्यांचं ह्याबाबत काही वेगळच म्हणणं आहे. जेसी ह्यांच्या मते जास्त आयुष्य आणि निरोगी जीवनासाठी पुरुषांपासून दूर राहावे.

 

jessie gallan -inmarathi01
dailyrecord.co.uk

जेसी ह्यांनी त्या १३ वर्षांच्या असतानाच घर सोडलं होतं. त्यानंतर त्यांनी जीवनात त्यांना जे हवं आहे ते मिळवलं. कठोर परिश्रम आणि आपल्या हिमतीच्या जोरावर त्या स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या. स्कॉटलंडच्या नर्सिंग होममध्ये जेव्हा त्याचं निधन झालं, तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितलं की त्या त्यांचे संपूर्ण जीवन हे आनंदात जागल्या. त्यांनी नेहेमी “पुरुषांपासून दूर राहा आणि प्रदीर्घ आयुष्य जगा” आपला हा पवित्रा सोडला नाही.

 

jessie gallan -inmarathi
dailyrecord.co.uk

प्रत्येकाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो, प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धत वेगळी असते. जेसी ह्यांनी त्यांच्या जीवनात तेच केलं जे त्यांना पटलं. त्यांना कधीही त्यांच्या जीवनात कुठल्या पुरुषाची कमतरता नाही भासली. त्यांनी त्याचं गोष्टींना महत्व दिलं ज्या त्यांच्यासाठी महत्वाच्या होत्या, ज्यातून त्यांना आनंद मिळायचा.

 

jessie gallan -inmarathi03
telegraph.co.uk

जगात असे अनेक लोक आहेत जे आपले संपूर्ण आयुष्य एकटे राहून काढतात, कदाचित त्यांना आपल्या आयुष्यात इतर कोणाचा हस्तक्षेप किंवा लुडबुड आवडत नसावी. किंवा त्यांना जे करायचं आहे ते त्यांना स्वतःच्या भरवश्यावर करायचे असते म्हणून ते आयुष्यभर एकटे राहत असावे. त्यांना त्यांच्या आयुष्यात कुणाचीही गरज वाटत नाही.

आपण एकटे राहावे की कुणाच्या सोबत हे आपल्यावर अवलंबून आहे पण जेसी ह्यांच्या मते जर प्रदीर्घ आयुष्य जगायचे असेल तर पुरुषांपासून दूर राहावे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?