' क्रिकेटच्या इतिहासातल्या सर्वात चिकाटीपूर्ण आणि चिवट “५ इनिंग्स” – InMarathi

क्रिकेटच्या इतिहासातल्या सर्वात चिकाटीपूर्ण आणि चिवट “५ इनिंग्स”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

क्रिकेट हा खेळ माहित नसणारे किंवा आवडत नसणारे भारतात खूप कमी लोक असतील. क्रिकेट हा खेळ सगळीकडेच खूप लोकप्रिय आहे. भारतात तर या खेळाचे प्रस्थ जरा जास्तच आहेत, कारण भारतामध्ये खूप दिग्गज खेळाडू देखील तेवढेच होऊन गेले आहेत.

भारतातील लोक हा खेळ बघत नाहीत, तर तो एकप्रकारे जगतात. या खेळाशी भारतातील लोक मनाने जोडले गेले आहेत. आपल्या भारतीय संघाला खूप मोठमोठे दिग्गज खेळाडू लाभले आहेत. सचिन तेंडूलकर, महेंद्र सिंग धोनी, विराट कोहली यांनी भारतीय क्रिकेट संघाला एका वेगळ्या शिखरावर नेऊन ठेवले आहे.

 

sachin, dhoni, virat InMarathi

 

भारतीय क्रिकेट आज टेस्ट क्रिकेटमध्ये अव्वलस्थानी विराजमान आहे. टेस्ट क्रिकेटमधली विशेष गोष्ट म्हणजे त्यात शतकांची मर्यादा नसते. त्यामुळे बनवल्या जाणाऱ्या धावा आणि टाकल्या गेलेल्या चेंडूंची संख्या यात भार्पूर्ण अंतर असू शकते.

काही फलंदाज तर दिवस दिवस फलंदाजी करतात पण त्यांच्या धावा कमीच असतात. अशाच काही क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात स्लो इनिंग्स आपण या लेखात पाहणार आहोत.

 

test-cricket-inmarathi
gaonconnection.com

जेओफ अॅलॉट (Geoff Allott) :

 

Geoff-Allott-InMarathi

 

न्यूझीलंड संघाचा डावखुरा जलदगती गोलंदाज जेओफ अलोट हा एकदा ७७ चेंडू खेळून शून्यावर बाद झाला आहे. १९९९ साली ओकलंड, दक्षिण आफ्रिका येथे खेळल्या गेलेल्या एका कसोटी सामन्याच्या पहिल्या खेळीत तो फलंदाजी करत होता.

जेओफ अलोट याने या खेळीत एकही धाव केली नाही. त्यामुळे त्याचा स्ट्राईक रेट ०.०० इतका होता. कसोटी क्रिकेट मध्ये खेळली गेलेली ही सगळ्यात स्लो इनिंग आहे.

मन्सूरअली खान पतौडी :

 

mansoor-ali-khan-pataudi_InMarathi

 

पतौडी घराण्याचे मन्सूर अली हे भारताकडून खेळायचे. १९७३ साली मुंबई येथे इंग्लंड विरुध्द खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्यांनी ८४ चेंडूंचा सामना करत फक्त ५ धावा काढल्या. एकूण १०२ मिनिटे ते खेळपट्टीवर फलंदाजी करत होते. त्यांच्या या खेळीचा स्ट्राईक रेट ५.९५ इतका होता.

स्टूअर्ट ब्रॉड :

 

stuart broad InMarathi

 

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्तुअर्ट ब्रॉड याने १३७ मिनिटात फक्त ६ धावा करण्याचा विक्रम बनवला होता. या धावांपैकी एक चौकार होता. म्हणजे त्याने फक्त दोन धावा पळून काढल्या होत्या. त्याने एकूण ७७ चेंडूंचा सामना केला.

हा सामना न्यूझीलंडच्या विरोधात ओकलंड मध्ये २०१३ साली खेळवला गेला होता. त्याच्या या खेळीचा स्ट्राईक रेट ७.७९ इतका होता.

डेमियन मार्टिन :

 

Damien-Martyn InMarathi

मार्टिन यानेसुद्धा तब्बल १०६ मिनिटे इतका वेळ खेळपट्टीवर काढला, त्यात त्याने २९ चेंडूंचा सामना करत फक्त सहा धावा काढल्या. या सहा धावांपैकी एक चौकार होता. दक्षिण ओफ्रिका विरुध्द ऑस्ट्रेलियात खेळवल्या गेलेल्या कसोटी सामन्याचा दुसर्या इनिंगमध्ये तो फलंदाजी करत होता.

जेफ मिलर (Geoff-Miller) :

 

Geoff-Miller InMarathi

 

इंग्लंडचा फलंदाज जेओफ मिलर याने १०१ चेंडूंचा सामना करत सात धावा नोंदवल्या. तो तब्बल १२३ मिनिटे खेळपट्टीवर फलंदाजी करत होता. १९७९ साली मेलबोर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुध्द कसोटी सामना खेळत असताना त्याच्या तिसऱ्या इनिंग मध्ये तो फलंदाजी करत होता.

या क्रिकेटच्या इतिहासातील पाच सर्वात स्लो इनिंग्स आहेत. अनेकांना प्रश्न पडला असेल की भारताचा “द वॉल” राहुल द्रविड या यादीत कसा नाही? तर राहुल या यादीत पहिल्या पाच मध्ये नाही. त्याचा क्रमांक आठवा लागतो.

rahul dravid Inmarathi

२००७ साली इंग्लंड मधील ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्याने ९६ चेंडूंचा सामना करत १२ धावा काढल्या होत्या. आणि तो खेळपट्टीवर १४० मिनिटे फलंदाजी करत होता.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?