' विविध ठिकाणी दिसणाऱ्या बारकोडचा नेमका वापर कशासाठी करतात?

विविध ठिकाणी दिसणाऱ्या बारकोडचा नेमका वापर कशासाठी करतात?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पॅकिंग केलेल्या वस्तूंवर तुम्ही बऱ्याचदा काही वेगवेगळ्या जाडीच्या उभ्या रेषांचा संच पहिला असेल. पांढऱ्या रंगावर काळ्या रंगाच्या या रेषा असतात. त्या रेषांना बारकोड असे म्हणतात.

दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षांना बारकोड सिस्टीम वापरण्यात येते. परीक्षा चालू असताना हे बारकोड असलेले स्टीकर तुमच्या उत्तरपत्रिकेवर चिकटवण्यात येते.

मॉल मध्ये किंवा संगणकीयकृत बिलिंग व्यवस्था असलेल्या ठिकाणी जेव्हा तुम्ही काही खरेदी करता तेव्हा बिलिंगच्या वेळी हा कोड एका उपकरणातून स्कान केला जातो. स्कॅन केल्यानंतर त्या वस्तूची किंमत आणि इतर माहिती संगणकाला मिळते.

हा कोड कसा तयार होत असेल? त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? या लेखातून जाणून घेऊया…

 

barcode-inmarathi
internationalbarcodes.com

 

बारकोड म्हणजे काय?

बारकोड म्हणजे उपकरणाद्वारे वाचता येईल अशा आकड्यांचा संच असतो जो कमी जास्त जाडीच्या समांतर रेषांच्या स्वरुपात लिहिलेला असतो. म्हणजेच आकड्यांचे असे रुपांतर (ENCODING) की जे आपल्याला वाचता येणार नाही पण मशीन वाचू शकेल. काळ्या पांढऱ्या रेषांचा प्रत्येकी एक आकडा दर्शवणारा हा संच असतो.

या कोड मध्ये वस्तूच्या संबंधित माहिती जसे की त्या वस्तूचे वजन, किंमत, उत्पादनाची तारीख, शेवटच्या वापराची तारीख- ही माहिती एका विशिष्ट क्रमाने सांगितलेली असते.

बारकोडचे दोन प्रकार आहेत.

१) एकमितीय (ONE Dimensional )
२) द्विमितीय (TWO Dimensional ) – QR CODE

एकमितीय बारकोडचा उपयोग किराणा माल, कमी किमतीच्या वस्तू जसे की पेन, इलेक्ट्रोनिक गोष्टी इत्यादींवर केला जातो. द्विमितीय आणि एकमितीय बारकोड मध्ये फारसा फरक नसतो.

त्यातला मुख्य फरक हा की दोघांना समान जागा लागत असेल तर एकमितीय पेक्षा द्विमितीय बारकोड मध्ये तुलनेने जास्त माहिती साठवता येऊ शकते.

 

barcodesinc.com

 

बारकोड कसा तयार केला जातो?

एका बारकोडला ९५ ब्लॉक असतात. त्या ९५ पैकी १२ ब्लॉकमध्ये बारकोड लिहिला जातो. त्यापैकी तीन ब्लॉक हे लेफ्ट गार्ड, सेंटर गार्ड आणि राईट गार्ड या नावाने ओळखले जातात.

बारकोड कसा काम करतो?

बारकोड म्हणजे आयताकृती जागेत असलेला रेषांचा संच असतो हे आपण पहिले. त्या समांतर रेषांमध्ये आणि त्यांच्या मधल्या जागेत आवश्यक ती माहिती साठवलेली असते. बारकोड वाचण्यासाठी असणाऱ्या स्कॅनिंग मशीनमध्ये लेझर लाईटचा वापर केलेला असतो. हे मशीन डावीकडून उजवीकडे अशा क्रमाने बारकोड वरच्या रेषा वाचत जाते.

 

Scanners-inmarathi
tracesol.co.za

 

हे मशीन वाचलेली रेषांच्या रूपातली माहिती बायनरी कोडमध्ये (0 or 1)  रुपांतरीत करते. संगणक फक्त ही बायनरी रुपात असलेली माहिती वाचू शकतो. आणि हीच माहिती तो स्क्रीनवर दाखवतो.

सेंटर गार्डच्या डाव्या बाजूला असलेल्या आकड्यावरून ती वस्तू प्लास्टिक किंवा तत्सम मानवनिर्मित पदार्थावरून बनलेली आहे की नैसर्गिक पदार्थापासून बनलेली आहे, शाकाहारी आहे कि मांसाहारी हे संगणकाला कळते. खालचे चित्र पहा. त्यातील शून्याच्या जागी दोन हा आकडा लिहिलेला असेल तर त्यातून हा खाद्यपदार्थ आहे असे कळते. ‘3’ हा आकडा लिहिले असेल तर तो औषध आहे असे कळते.

 

Next-Wearable-Productivity-Device-Barcode-Scanner-inmarathi
futuristech.info

 

अशा प्रकारे प्रत्येक बारकोड मधून संख्या आणि त्यामधून माहितीचे संकलन केले जाते. आणि ही माहिती संगणकीयकृत प्रणालीतून वापरली जाते. मानवी श्रम कमी करण्यासाठी बारकोड प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरली आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?