' बंदी घालण्याऐवजी सेनेच्या जवानांना दारू स्वस्त दरात देतात, कारण… – InMarathi

बंदी घालण्याऐवजी सेनेच्या जवानांना दारू स्वस्त दरात देतात, कारण…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

मद्यपान करणे हे तसे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारकच मानले जाते. डॉक्टर देखील मद्यपान न करण्याचा सल्ला देत असतात. कारण दारू शरीरासाठी अत्यंत नुकसानकारक असते. पण तरी देखील लोक दारू पितातच. कितीही काही झालं तरी दारू कोणी सोडत नाही.

 

army-men-alcohol-inmarathi01

 

पण दारूचे व्यसन हे चांगले नाहीच. आपल्या देशातील अनेक भागांत ही एक सामाजिक समस्या म्हणून समोर येत आहे. त्यामुळे संपूर्ण दारू बंदीची मागणी देखील जोर धरते आहे. पण तुमच्या कधी लक्षात आले आहे का की, एवढं सर्व असून देखील भारतीय सेनेत कधीही दारूवर प्रतिबंध घालण्यात आलेला नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

तर त्याउलट जवानांन आणखी स्वस्त दरात ती दारू उपलब्ध करवून दिली जाते. काय कारण असणार ह्या मागे?

नेहेमी शिस्तबद्ध असलेल्या भारतीय सैन्यात दारूला जागा का दिली जाते? तर ह्यामागे अनेक अज्ञात अशी कारणे आहेत.

 

army-men-alcohol-inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आधीच्या काळी भारतीय सैनिकांनी अनेक वर्षांपर्यंत ब्रिटीश रॉयल सेनेअंतर्गत काम केले आहे. रॉयल सेनेत नेहेमीच दारू पिण्याची परंपरा राहिली आहे. ब्रिटीश सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना खाण्यापिण्याच्या इतर वस्तूंसोबतच एका निश्चित प्रमाणात दारू देखील दिली जायची.

ब्रिटीश सेना जेव्हा भारतात आली, तेव्हा त्यात समाविष्ट झालेले भारतीय जवान देखील ती परंपरा पाळायला लागले.

ब्रिटीश राज्य संपून देशाला स्वातंत्र्य मिळालं. आपली स्वतःची भारतीय सेना उभी झाली, पण ही परंपरा मात्र अशीच सुरु राहिली.

ब्रिटीश गेल्यावर देखील त्यांची ही परंपरा सेनेने जोपासली आणि अधिकाऱ्यांच्या देखरेखीत एका निश्चित प्रमाणात दारू सैनिकांना दिली जाऊ लागली. सेनेत जुन्या परंपरांना खूप महत्व दिले जाते. सेनेचे जवान अगदी शिस्तबद्ध रीतीने ह्या परंपरा निभावतात.

ह्याच परंपरांपैकी एक म्हणजे जेव्हा सेनेत कुठल्या नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती होते तेव्हा रेजिमेंटचे इतर जवान दारूचा एक प्याला घेऊन त्याचे स्वागत करतात.

 

army-men-alcohol-inmarathi03

 

जवानांचं काम हे आपल्यासारखं नसतं, म्हणजे सकाळी उठलं की मस्त एसी ऑफिसमध्ये बसून निवांत आरामात काम करणे, असं त्यांच जीवन नसतं. त्यांच जीवन हे अतिशय खडतर असतं, कारण त्यांना देशाच्या रक्षणासाठी कुठेही कश्याही परिस्थितीत आपली ड्युटी करावी लागते.

हे जवान आपल्या घरापासून हजार किलोमीटर दूर सीमेवर राहतात. जिथे कधीकधी कुठलीही सुविधा नसेल अश्या ठिकाणी त्यांना राहावं लागतं.

कधीकधी शुन्याहून कमी तापमान असलेल्या ठिकाणी त्यांना पहारा द्यावा लागतो.

पण अशा थंड ठिकाणी सीमेवर पहारा देणे खूप कठीण होऊन जाते.

तेव्हा स्वतःला त्या थंडीपासून वाचवण्यासाठी मद्यपान करणे आवश्यक ठरते कारण त्याने आपलं शरीर गरम राहतं.

 

army-men-alcohol-inmarathi04

हे ही वाचा – अवघ्या १२४ भारतीय जवानांनी हजारो चिनी सैनिकांना धूळ चारल्याची – रेझांगलाची अज्ञात समरगाथा

बर्फाळ प्रदेशांव्यतिरिक्त देखील जवानांना इतरही प्रदेशात अनेक बिकट परिस्थितींचा सामना करावा लागतो. मग अशा परिस्थितीत दारू ही त्यांची सोबती म्हणून काम करते. त्यांच धैर्य टिकवून ठेवण्याचं काम ही दारू करते.

तसेच सीमेचे रक्षण करताना सैनिकांना खूप तणावपूर्ण परिस्थितीत जगावं लागतं. त्यानंतर मग जेव्हा त्यांना थोडाफार स्वतःसाठी वेळ मिळतो तेव्हा त्यांना मानसिक आणि शारीरिक स्तरावर संतुलित राहण्यासाठी, आपला सर्व थकवा विसरण्यासाठी, ते दारूचे सेवन करतात.

तसेच आपल्या मित्रांसोबत जरा चांगला वेळ घालविण्यासाठी ह्या जवानांना दारू मदत करते.

 

army-men-alcohol-inmarathi02

 

पण असं नाहीये की, जवानांना नेहमी दारू पिऊन राहण्याची सूट असते.

इतर कुठल्याही संस्थांच्या तुलनेत सेनेला जास्त शिस्तबद्ध समजले जाते. सेनेत शिस्तबद्ध राहणे अतिशय आवश्यक आहे. मग अश्यात जर कुठला जवान हा ड्युटीवेळी जास्त प्रमाणात दारूचं सेवन करत असेल तर त्याला शिक्षा भोगावी लागते.

एवढंच नाही तर जवानांना दिल्या जाणाऱ्या दारूचा हिशेब ठेवला जातो.

म्हणजे कुठल्याही जवानाला दारू देण्याआधी त्याचं प्रमाण आणि हिशेब लिहून ठेवले जाते.

कारण सेनेत अधिक प्रमाणात दारूचे सेवन करणे म्हणजे गुन्हा मानला जातो. आणि जर जवान ह्यात दोषी सिद्ध झाला तर त्याला कैद पासून कोर्ट मार्शल पर्यंतची शिक्षा सुनावली जाऊ शकते.

 

Indian army's Bulletproof Jacket.Inmarathi

 

जर ह्याबद्दल तुमच्या मनात काही गैरसमज असतील तर ते आता नक्कीच ते दूर झाले असतील.

कारण जवान हे दारूचे सेवन करतात आणि त्यांना तेवढी मुभा ही ह्यासाठी दिली जाते की, कारण त्यांना त्याची गरज असते.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?