'सापळा लावून प्राण्यांची ‘शिकार’ करणाऱ्या काही अफलातून परभक्षी वनस्पती !

सापळा लावून प्राण्यांची ‘शिकार’ करणाऱ्या काही अफलातून परभक्षी वनस्पती !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

अन्नसाखळीतील मुलभूत तत्व आपल्याला माहित आहेच. झाडे सूर्यप्रकाशाचे सेवन करतात, प्राणी झाडांचे सेवन करतात, आणि मोठे प्राणी छोट्या माशांना खातात. पण यालाही अपवाद निसर्गात पाहायला मिळतात. सापळा टाकून छोट्या प्राण्यांना अडकवणारी आणि त्यांची शिकार करणारी काही झाडे आहेत. छोटे प्राणी म्हणजे पाली, कीटक, फुलपाखरे इत्यादी.. अशीच काही झाडे या लेखात आपण पाहणार आहोत.

त्रोपिकल पिचर :

 

tropical_pitcher_plant_inmarathi
sandiegozoo.org

छोट्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी या झाडाचा ‘पिचर’ नावाचा भाग साधारण फुटभर उंच जाऊ शकतो. “genus Nepenthes” या जीवशास्त्रीय नावाने हे झाड ओळखले जाते. फक्त कीटकाच नव्हे तर पाल, नाकतोडे आणि प्रसंगी मोठे प्राणीही हे झाड पचवू शकते. पूर्व गोलार्धात अनेक ठिकाणी याच झाडाच्या तब्बल दीडशे प्रजाती आढळतात.

कोब्रा लिली :

फना उगारून दंश करण्याच्या तयारीत असणार्या कोब्रा सारखे दिसणारे हे झाड म्हणजे कोब्रा लिली. ‘Darlingtonia californica’ या जीवाशात्रीय नावाने हे झाड ओळखले जाते. उत्तर कलीफोर्नियाच्या थंड प्रदेशात ही दुर्मिळ वनस्पती आढळते. ही वनस्पती खरोखर दुष्ट आहे. तिच्या मोहक सुगंधाने कीटक तिच्याकडे आकर्षिले जातात.

 

sandiegozoo.org

त्या वनस्पतीवर कीटक बसले की अचानक स्वतःचा बाहेर जाण्याचा मार्ग ती बंद करून घेते. निसर्गतज्ञ या वनस्पतीवर अजून संशोधन करत आहेत. काही प्रकारंचे कीटक आहेत जे या वनस्पतीचे परागकण एकत्र करतात पण ते कोणते आहेत आणि या वनस्पतीत प्रजनन नेमके कसे होते यावर अजून पूर्ण माहिती उपलब्ध नाही.

ट्रिगर प्लांट :

 

trigger-plant-inmarathi
en.wikipedia.org

हे नाव थोडेसे आक्रमक वाटत असेल, पण ही वनस्पती दिसायला अत्यंत सुंदर असते. ही वनस्पती परभक्षी आहे. आपल्या फुलांवर नसणाऱ्या त्रासदायक कीटकांना ती फस्त करते. काही प्रजातीच्या पानांवर आणि फुलांवर केस असतात. प्रजननासाठी काहीच उपयोग नसलेले कीटक या केसांमध्ये अडकले जातात. आणि ती झाडांची पणे हळूहळू ते कीटक पचवून टाकतात.

पोर्तुगीज सन ड्यू :

 

portuguise-inmarathi
rhs.orhs.org.ukrg.uk

‘Drosophyllum lusitanicum’ या जीवशास्त्रीय नावाने हे झाड ओळखले जाते. स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को या देशांतील ज्या भागात मातीची पोषणमुल्ये कमी आहेत त्या भागात ही वनस्पती वाढते. इतर परभक्षी झाडांप्रमाणे ही वनस्पती सुद्धा आपल्या मोहक सुगंधाने कीटकांना आकर्षित करते. नंतर एका चिकट पदार्थात त्यांना अडकवते. पानावर असलेली पाचक संप्रेरके या कीटकांना पचवून टाकतात. आणि किटकांमध्ये असलेली पोषणमुल्ये स्वतः साठी वापरते.

बटरवर्थ :

 

fthmb.tqn.com

या वनस्पतीची पसरत पाने लोणी लावलेल्या पावसारखी दिसतात. त्यावरून हे नाव पडले आहे. उत्तर, पश्चिम आणि मध्य अमेरिकेत ही वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळते. ही वनस्पती इतरांप्रमाणे मोहक सुगंध सोडत नाही. या झाडाच्या पानांवर पाण्याचा अंश जमा झालेला असतो. हे पाणी पिण्यासाठी कीटक पानावर येऊन बसतात. तिथेच हे कीटक त्या चिकट पदार्थात अडकून पडतात.

अशा आणखीही अनेक परभक्षी वनस्पती आहेत. संशोधक आणि निसर्गप्रेमी लोकांसाठी या वनस्पती म्हणजे कुतूहलाचा विषय बनून राहिल्या आहेत. या वनस्पतींवर अजूनही संशोधन चालूच आहेत. पण ठरलेल्या अन्नसाखळीच्या विपरीत असून नैसर्गिक वातावरणात तग धरून राहणाऱ्या या परभक्षी वनस्पती म्हणजे खरोखरच एक आश्चर्य आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?