' कारगिल युद्धातील विजयाला “लॉन्च” करणारा भारतीय सैन्याचा हवाई भाता – InMarathi

कारगिल युद्धातील विजयाला “लॉन्च” करणारा भारतीय सैन्याचा हवाई भाता

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

भारतीय सेना ही जगातील चौथी सर्वात शक्तिशाली सेना आहे. ह्या सेनेला शक्तिशाली सेनांच्या पंक्तीत बसविण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळी आधुनिक शस्त्रे खूप महत्वाची भूमिका बजावतात.

शत्रूपासून देशाचे रक्षण करण्यासाठी ही शत्रेच आपल्या जवानांना साथ देतात. म्हणून ह्यांच्यावर जास्त लक्ष दिलं जातं. काही वर्षांपूर्वी पर्यंत ह्या आधुनिक शस्त्रांसाठी आपल्याला दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागत होते.

पण आज आपण आपल्याला लागणाऱ्या जास्तीत जास्त शास्त्रांची निर्मिती आपल्याच देशात करतो. जसे की, मल्टी बॅरल रॉकेट लॉंचर पिनाका.

 

pinaka-inmarathi01
youtube.com

डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेवलपमेंट ऑर्गनाईजेशन (डीआरडीओ) ह्यांनी तयार केलेलं पिनाका हे एक कम्प्लीट एमबीआरएल सिस्टम आहे. ज्याने कितीतरी किलोमीटर दूरवर असलेल्या शत्रूच्या ठिकाणाला उध्वस्त कर शकतो.

पिनाकाला डीआरओच्या पुणे येथील लॅब आर्ममेंट रिचर्स अॅण्ड डेव्हलपम एस्टाब्लीशमेंटच्या नेतृत्वात विकसित केलं गेलं. हे काम डिसेंबर १९८६ साली सुरु झालं आणि डिसेंबर १९९२ साली ते पूर्ण झालं.

ह्याला विकसित करण्यासाठी भारतीय रक्षा विभागाकडून २६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. त्यानंतर १९९८ साली पिनाकाला अखेर भारतीय सेनेत सामील केले गेले.

 

pinaka-inmarathi
larsentoubro.com

सध्या पिनाकामध्ये दोन प्रकार आहेत, ज्यांना पिनाका मार्क I आणि मार्क II म्हणून ओळखल्या जाते. पिनाका मार्क I सध्या भारतीय सेनेत सामील आहे तर पिनाका मार्क II चे अनेक यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या, पण अजूनही त्याला भारतीय सेनेत सामावून घेतलेलं नाही.

पिनाका मार्क I जास्तीत जास्त ४० किलोमीटर दरम्यान असलेल्या शत्रूच्या छावणीला उधवस्त करू शकतो. तर मार्क II हा ७५ किलोमीटर पर्यंत दूरवर असलेल्या शत्रूंना निस्तनाबूत करू शकतो.

तर आता पिनाकाचा तिसरा आणि अधिक प्रभावी प्रकार विकसित केला जात आहे. हा मल्टी बॅरल रॉकेट लॉंचर ४४ सेकंदात १२ विध्वंसक रॉकेट सोडू शकतो.

 

pinaka-inmarathi04
ibgnews.com

पिनाका चा वापर १९९९ सालच्या कारगिल युद्धात देखील झाला होता. तेव्हा ह्या पिनाकाच्या मदतीने भारतीय सेनेने पहाडांवर असलेल्या शत्रूंच्या छावणींना मातीमोल केले होते.

पिनाका मार्क II हा इतर देशांच्या मल्टी बॅरल रॉकेट लॉंचर तुलनेत अधिक शक्तिशाली आहे. ह्यांच्या जोरावर आपण शत्रूच्या सेनेला चांगलाच धडा शिकवू शकतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?