“कोकम सरबत”चे आहेत हे ९ फायदे, आणि जे आहे या ८ व्याधींवर अत्यंत गुणकारी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखिका – डॉ प्राजक्ता जोशी
===
कोणत्याही ऋतुत कोकम सरबत सर्वांना आवडतं.
आज कोकमचेच औषधीय उपयोग आपण पाहणार आहोत.

कोकममध्ये B-complex ,vit.C,ही जीवनसत्वे भरपुर प्रमाणात असतात पण त्याबरोबरच hydrocitric acid नावाचे अत्यंत महत्वाचा आरोग्यदायक घटक असतो.तसेच मॅगनीज, मॅगनेशीअम, पोटॅशीअम अशी खनिजेही असतात.
१) यातील जीवनसत्वे व खनिजांमुळे गर्भीनीची प्रतिकारक्षमता वाढते. त्यामुळे गर्भावस्थेत हे अवश्य घ्यावे.
२) कोकम पचनसंस्था सुधारण्यास मदत करते.
३) यातील antifungal व antioxidantsहे गुणधर्म त्वचा निरोगी ठेवतात.
४) Insulinचे नियमन करून मधुमेह आटोक्यात ठेवते.

५) नवीन संशोधनावरून कोकम हे intestinal ulcer मध्ये ऊपयुक्त ठरते हे समोर आले आहे.
६) शरीराचे तपमान थंड ठेवण्याचा गुणधर्म कोकम मध्ये असतो.
७) त्वचा व केसासाठी ऊत्तम असते.
८) cholesterol चे प्रमाण कायम ठेवुन हृदयाचे आरोग्य कायम ठेवते.तसेच हे cardio tonic असते.
९) यातील hydro-citric acid हा घटक प्रतिकारक्षमता वाढवून वजन कमी करण्यास देखील मदत करतो.
आयुर्वेदानुसार “कोकम”ही अत्यंत ऊपयुक्त वनस्पती आहे. आयुर्वेदामध्ये यास “वृक्षाम्ला”किंवा “फलाम्ला “असे नाव आहे.
याचे फळ अत्यंत ऊपयुक्त वर्णीले आहे. मधुर,आम्ल रसात्मक कोकम हे रुक्ष गुणात्मक असुन पचनास जड असते. पचनानंतर हे आम्ल पाचक रसात परावर्ती त होते असे आयुर्वेद सांगतो.
कच्चं कोकम हे वात व पित्त दोषाचे निवारण करते. तर परिपक्व फळ हे कफ व वातदोषाचे निवारण करते.

अगनीदिपन ( भुक वाढवणे), रोचन ( अन्नाची रूची वाढवणे), संग्राही ( मलनिर्मीतीस मदत करणे)ही कोकमची प्रमुख कार्ये आहेत. त्यामुळे पचनासंबधीत व्याधी, अतिसार, irritable bowel syndrome यात अत्यंत उपयुक्त ठरते.
रोजच्या आहारामध्ये कोकमचा नियमितपणे वापर केल्यास अरुची, आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इ. तक्रारी दूर होऊन आहाराचे पचन चांगले होते.
कोकम तेलाचा उपयोग हा विविध प्रकारचे मलमे बनविण्यासाठी केला जातो. कोकमचा उपयोग नियमितपणे आहारात केल्याने आतडे कार्यक्षम होऊन पोट साफ होण्यास मदत होते.
तोळे कोकम पाण्यात भिजत घालावे. नंतर ते कोकम पाण्यात कुस्करून ते पाणी गाळून घ्यावे व त्यात जिरेपूड, साखर घालून ते पाणी प्यायले असता शरीरावर आलेले शीतपित्त दूर होते.
मूळव्याधीचा त्रास होत असेल व त्यातून रक्त पडत असेल तर कोकमचा कल्क दह्य़ावरच्या निवळीत कालवून ती निवळी प्यावी. यामुळे रक्त पडणे बंद होते.
आयुर्वेदानुसार कोकम चा खालील व्याधीत ऊपयोग होतो.
१ ) कफार्श (piles due to kaph dosh)
२ ) तृष्णा ( सतत तहान लागणे)
३ ) वातज ऊदर ( ascitis due to vaat dosha)
४ ) गुल्म ( fibroid)
५ ) अतिसार ( diarhoea)
६ ) ग्रहणी ( duodinal ulcer)
७ ) जंतु ( worm infestation)
८ ) हृद्रोग ( cardiac diseases)
अशाप्रकारे कोकम हे अत्यंत ऊपयुक्त फळ असुन त्याचे सेवन निश्चित करावे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.