' शिवाजी महाराजांच्या 'दूरदृष्टीची' ओळख पटवून देणारा भक्कम "दुर्गराज" : विजयदुर्ग 

शिवाजी महाराजांच्या ‘दूरदृष्टीची’ ओळख पटवून देणारा भक्कम “दुर्गराज” : विजयदुर्ग 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाघोटन या नदीमुख खाडीवर एका तीस मीटर उंचीच्या आणि ऐसपैस पसरलेल्या बेलाग खडकावर एक किल्ला दिसतो.

शिलाहार राजघराण्याच्या कारकिर्दीत अंदाजे १२०० साली म्हणजे सुमारे आठशे वर्षापूर्वी राजा भोज याने हा भक्कम किल्ला बांधून काढला.

कोल्हापूरच्या पन्हाळा किल्ल्यावर शिलाहार घराण्याचा हा भोज राजा राज्य करत होता. त्याने आपल्या हयातीत एकंदर सोळा किल्ले बांधले आणि अनेक किल्ल्यांची डागडुजी केली. त्यात या किल्ल्याने नाव आहे.

शिलाहारांचे राज्य देवगिरीच्या यादवांनी सन १२१८ मध्ये बुडविले. तेव्हा हा किल्ला यादवांच्या ताब्यात गेला. १३४५ साली विजयनगरच्या दिग्विजयी राजाने देवगिरी राज्याचा पराभव केला आणि कोकण प्रांत जिंकून घेतला.

विजयनगर साम्राज्याची विजयी घोडदौड काही काळ चालू राहिली. त्या साम्राज्याचे वैभव डोळे दिपवणारे होते. विजयनगरचा धोका ओळखून सर्व मुस्लीम राजे जे वेगवेगळे राज्य करत होते ते एकत्र आले.

या बहामनी राजांनी एकत्र येत विजयनगर साम्राज्याचा पाडाव केला. विजयनगर स्वतःच्या अधिपत्याखाली आणले.

१४९१ ते १५२६ या काळात बहामनी राज्यातील अंतर्गत कुरापतींमुळे त्या राज्याचे पाच भाग पडले. त्यात विजापूरच्या आदिलशहाकडे कोकण प्रांत गेला.

पुढे हाच काळ म्हणजे अंदाजे १६५३ सालापर्यंत, तब्बल १२९ वर्षे हा किल्ला विजापूरकर बादशहाच्या अमलाखाली राहिला. १६५३ साली चंद्रराव मोरे याचा प्रदेश जिंकत पुढे महाराजांनी विजयदुर्ग ताब्यात घेतला.

 

vijaydurga inmarathi
historicfortsofindia.blogspot.com

 

सिद्दी, इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यावर करडी नजर ठेवण्यासाठी महाराजांनी हे ठाणे निवडले. त्यांनी हा किल्ला जिंकून घेतला तेव्हा त्याचा घेर पाच एकराचा होता.

या ठिकाणी आरमारी केद्र स्थापन करायच्या मनसुब्याने त्यांनी किल्ल्याच्या सभोवती चिलखती तटबंदी उभारली. या तटबंदीने किल्ल्याचा घेर तब्बल १७ एकर झाला. या चिलखती  त्यांनी तटबंदीवर २७ बुलंद बुरुज बांधून घेतले.

यातले तीन बुरुज तीन मजल्याचे आहेत. उत्तर दिशेला या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. गोमुख दरवाजापासून किल्ल्याची सुरुवात होते.

या गोमुख दरवाजाचे आणि किल्ल्यावर असलेल्या भव्य मारुतीच्या मंदिराचे बांधकाम शिवाजी महाराजांच्या काळात झाले आहे.

दरवाजाच्या बाहेर पूर्वी एक मोठा खंदक होता. खंडाकाने जमिनीच्या बाजूने असलेली किल्ल्याची तटबंदी व्यवस्थित संरक्षित केलेली होती. या खान्दाकामुळे शत्रू तटाला भिडणे जवळजवळ अशक्य होते.

आज हा किल्ला पहिला तर त्याच्या तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने किल्ल्यात जायला रस्ता आहे. पण पूर्वी किल्ल्याच्या चारही बाजूंनी पाणी होते.

 

vijay durga inmarathi
tripiwiki.com

 

विजयदुर्ग किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या बांधकामाच्या दूरदृष्टीचा आणि कल्पकतेचा असामान्य नमुना पाहायला मिळतो. मुंबईला असणार्या गोर्या साहेबांच्या डोळ्यात इथले बलाढ्य आरमार कायम खुपत असे.

त्यासाठी त्यांनी अनेक वेळा अंधातज्र्या रात्री ‘ऑपरेशन विजयदुर्ग’ या नावाने मोहीम काढली होती. त्यासाठी तीन युद्धनौका पाठवण्यात आल्या.

पण विजयदुर्गापासून साधारण दीडशे सागरी मैल अंतरावर या युद्धनौका बुडाल्या.

या भागात ओहोटीच्या वेळीही पाण्याखालीच राहिलं अशी एक भक्कम सागरी भिंत उभारलेली आहे. ही भिंत कायम पाण्याखाली असल्याने वरून दिसत नाही.

याच अदृश्य तत्बंडीला इंग्रजांच्या नौका धडकल्या आणि जागच्या जागी बुडाल्या. तज्ञांनी या भिंतीचा अभ्यास केला असता हे बांधकाम सतराव्या शतकातले असल्याचे समोर आले.

विजयदुर्गची चिलखती तटबंदी उभारताना ही पाण्याखालील चौथी तटबंदी सुद्धा बांधून घेतली असा तज्ञांचा अंदाज आहे.

 

vijaydurga1-inmarathii
glimpsesofkonkan.blogspot.in

 

शिवाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्युनंतर छत्रपती राजाराम यांच्या कारकिर्दीत कान्होजी आंग्रे या याने विजयदुर्ग किल्ल्यावर आपले ठाणे उभारले आणि ‘सरखेल’ हा किताब मिळवला.

१६९८ ते १७२९ या काळात कान्होजीने पश्चिम किनार्यावर मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. ते गेल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी त्यांची सेवा लक्षात घेऊन त्यांच्या मुलाकडे सरखेलपद आणि किल्ल्याची जबाबदारी सोपवली.

पण कान्होजी यांच्या दोन मुलांमध्ये भांडण झाले. त्यातला तुळाजी आंग्रे पेशव्यांचे काही ऐकण्याच्या तयारीत नव्हता.

त्याला पडण्यासाठी पेशव्यांनी इंग्रजांशी युती केली. तुलाजीने १७५४ मध्ये त्यांची अनेक जहाजे पडली, जाळून टाकली. 

त्याने आपल्या आरमारात नवीन जहाजे बांधली. जी जुनी होती त्यांची डागडुजी केली. ठाणे बळकट केले. या विजयामुळे तो कोकण किनारपट्टीचा अनभिषिक्त सम्राटाच बनला.

इंग्रजांनी पेशव्यांना हाताशी धरत नानासाहेबांच्या अधिपत्याखाली आंग्रे आरमाराचा नाश केला. त्यामुळे इंग्रजांचे पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व वाढीस लागले.

तुलाजीने घाबरून नानासाहेबांना पत्र लिहिले. त्यात पूर्वीचा घरोबा होता तसाच वृद्धींगत राखू असे आवाहन केले. तरी पेशव्यांनी २६ मार्च १७५५ रोजी आंग्रे यांच्याविरुध्द संयुक्त मोहिम उघडली.

या मोहिमेत तुलाजीचा पराभव झाला आणि इंग्रजांनी किल्ल्यावरील संपत्ती अमाप लुटून नेली. तुळाजी आंग्रे पेशव्यांच्या कैदेत पडला. पुढे १७८६ मध्ये त्याचे कैदेतच निधन झाले.

आन्ग्र्यांच्या अस्तानंतर पेशव्यांनी विजयदुर्ग किल्ला आणि परिसर आनंदराव धुळप यांना सांभाळण्यासाठी दिला.

 

aarmar-inmarathi
marathanavy

 

इथून विजयदुर्गच्या आरमाराची उतरती कळा सुरु झाली. पेशवाई संपेपर्यंत विजयदुर्ग मराठ्यांच्या ताब्यात होता. १८१८ साली इंग्रजांनी तो जुन्कून घेतला आणि भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला राहिला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्यानंतरही मराठा आरमाराची शान म्हणून ओळखला गेलेला हा किल्ला आज प्रसिध्द पर्यटनस्थळ म्हणून विकसित होतो आहे.

महाराजांच्या दूरदृष्टीची आणि कल्पकतेची ओळख या किल्ल्यावर त्यांनी केलेल्या बांधकामातून होते. विजयदुर्ग हा मराठा आरमाराच्या मुकुटातला हिरा आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “शिवाजी महाराजांच्या ‘दूरदृष्टीची’ ओळख पटवून देणारा भक्कम “दुर्गराज” : विजयदुर्ग 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?