' प्रेमाखातर पत्नीचे मंदिर बांधणारा आजचा शहाजहान ! – InMarathi

प्रेमाखातर पत्नीचे मंदिर बांधणारा आजचा शहाजहान !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

ह्या जगात खरं प्रेम सापडणे हे खूप कठीण आहे. म्हणजे आजवर आपण रोमिओ-जुलीएट, हिर-रांझा, शिरी-फरहाद इत्यादी प्रेमकहाण्या एकल्या आहेत. ह्या सर्वांच्या प्रेमाच्या कथा अमर आहेत. ह्यातच प्रेमाची निशाणी म्हणून आपल्याला एकच इमारत आठवते ती म्हणजे ताजमहाल. शहाजहानने बेगम मुमताजच्या आठवणीत ताजमहाल बनविला, ज्याकडे आजही आपण प्रेमाची निशाणी म्हणून बघतो.

 

taj-mahal

पण आता आपल्या देशात प्रेमापायी अशी इमारत उभी करणारा एक शाहजहानच नाही. तर आणखी एक शहाजहान आहे ज्याने आपल्या मुमताजसाठी ताजमहाल सोडा चक्क मंदिरच बांधलं.

 

rajmma-temple-inmarathi02
kannadaprabha.com

कर्नाटकचे राजुस्वामी हे ते दुसरे शहाजहान. ज्यांनी आपल्या मुमताजसाठी म्हणजे त्यांच्या पत्नीसाठी चक्क मंदिराची उभारणी केली. आणि ते मंदिर कुठल्या देवाचे नाही तर त्यांनी त्या मंदिरात आपल्या पत्नीचीच मूर्ती स्थापन केली. आता इतर देवांसोबत त्यांच्या पत्नीचीही पूजा केली जाते.

कर्नाटकातील येल्लंदूरच्या कृष्णापूरा गावातील हे मंदिर राजूची पत्नी राजम्मा ह्या नावाने प्रसिद्ध आहे. ह्या अनोख्या मंदिराला बघण्यासाठी लोक दुरुदुरून येतात. ह्या मंदिरात राजम्माची मूर्ती आहे ती राजू ह्यांनी स्वतः घडवली आहे. ह्या राजम्माची मूर्ती ही शनीश्वर, सिद्दप्पाजी, नवग्रह आणि भगवान शिव ह्यांच्या मुर्त्यासोबत ठेवली आहे.

 

rajmma-temple-inmarathi01
kannadaprabha.com

राजू ह्याने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आमचे आई-वडील आमच्या लग्नाच्या विरोधात होते. पण माझी बहिण आणि आत्या आमच्या बाजूने होते. त्यामुळे ह्या सर्व समस्यांना सामोरे जाऊन आम्ही लग्न केलं. लग्नाच्या काही दिवसांनी माझ्या पत्नीने मला गावात एक मंदिर बनविण्याची विनंती केली. पण जेव्हापर्यंत हे मंदिर बनून तयार झाले तोपर्यंत माझी पत्नी मला सोडून गेली, तिचा मृत्यू झाला. म्हणून मी तिची मूर्ती बनवली आणि मंदिरात तिच्या त्या मूर्तीला स्थापन केलं.

 

rajmma-temple-inmarathi03
thehindu.com

राजू सांगतात की त्यांच्या पत्नी ह्या खूप धार्मिक होत्या. त्यांना त्यांच्या मृत्यूचा आभास आधीच झाला होता, तेव्हाच त्यांनी राजू ह्यांना सांगितले की, ‘मी गेल्यावर गावात एक मंदिर बांधलं जावं.’ म्हणून मी तिच्यासाठी हे मंदिर बनवलं.

खरंच प्रेमाला काहीही सीमा नसते. लोक प्रेमात काहीही करू शकतात हे जे म्हणतात ते असचं नाही. आजवर केवळ ताजमहाल ह्यालाच प्रेमाची निशाणी म्हणून ओळखले जायचे पण ह्यानंतर राजम्मा मंदिर देखील प्रेमाची निशाणी म्हणून लक्षात ठेवली जाईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?