' दोन विनोदवीरांच्या घरच्या विचित्र चोऱ्या : पु. ल. आणि चार्ली – एक अशीही आठवण – InMarathi

दोन विनोदवीरांच्या घरच्या विचित्र चोऱ्या : पु. ल. आणि चार्ली – एक अशीही आठवण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===
लेखक – आदित्य कोरडे
===

दोन वर्पूषांपुर्वी  पु लं च्या घरी चोरी झाल्याची बातमी वाचली तेव्हा आणि अगदी सहजच ते ज्याचे निस्सीम चाहते त्या चार्ली चॅप्लिनच्या चोरीची कथा आठवली. ही चोरी त्याच्या घराची किंवा कोणत्याही मौल्यवान चीजवस्तूची नसून प्रत्यक्ष चॅप्लिनच्या मृतदेहाची होती…!

झाले असे की २५ डिसेंबर १९७७ रोजी ( नाताळ) चार्ली वारला. त्याला तो राहत असलेल्या स्वित्झर्लंड मधील घराजवळच्या एका दफनभूमीत पुरले गेले. त्यानंतर जवळपास २ महिन्यांनी म्हणजे २ मार्च १९७८ ला त्याचे थडगे उकरून त्याचा मृतदेह असलेली शवपेटीच चोरून नेल्याचे आढळून आले.

आधी ही कोणातरी चार्लीच्या चाहत्याने त्याचे अवशेष आपल्या संग्रही असावेत म्हणून केलेली कृटी असावे असेच वाटले पण जेव्हा चार्लीच्या चौथ्या ( आणि शेवटच्या ) विधवा पत्नीला उनाला जेव्हा ६ लाख डॉलर ची मागणी करणारा फोन आला तेव्हा सगळ्यांना आश्चय वाटले.

 

violetplanet.blogspot.in

 

उनाने अर्थातच ही मागणी फेटाळली. तेव्हा चोरांनी त्याची आधीची पत्नी पॉलेट गोडार्ड हिला फोन करून आपल्याकडे चार्लीचा मृतदेह असल्याचे सांगितले त्यावर तिने त्यांना “बर मग?” असा प्रश्न विचारला आणि फोन ठेवून दिला असे सांगतात.

असो. तर ११ आठवड्यांनी चोरही सापडले आणि त्यांनी आता कुणीच पैसे देत नाही हे पाहून जवळच्याच एका मक्याच्या शेतात पुरलेली चार्लीची शवपेटी आणित्यातले त्याचे शव सर्व सहीसलामत (?) अवस्थेत सापडले.

ते दोन चोर होते पहिला पोलंडचा रोमन वार्डास आणि दुसरा बल्गेरियाचा गांस्तहो गानेव.

दोघेही मेकॅनिक होते आणि काही पैसे कमावण्याच्या लालसेने त्यांनी हे कृत्य केले. चार्ली सारख्या इतक्या प्रसिद्ध माणसाच्या शवा करता ६ लाखाची क्षुल्लक रक्कम कुणीही देईल असा त्यांचा कयास असावा.

त्यांनी चार्लीच्या घराच्या कुणा ऐवजी त्याच्या धनिक चाहत्याला संपर्क केला असता तर कदाचित त्यांचा विचार खरा ठरलाही असता . असो तर चोरांना ४ वर्षे आणि १८ महिन्याची शिक्षा झाली. २०१४ मध्ये ह्या घटनेवर आधारलेला एक विनोदी चित्रपट आला त्याचे नाव होते “द प्राईस ऑफ फेम ” दिग्दर्शक होता झेवियर बोवी.

आश्चर्य म्हणजे ह्या चित्रपटामुळे चॅप्लिन कुटुंबीय (किंवा चोरांचे कुटुंबीय देखील ) कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या नाहीत उलट चॅप्लिन कुटुंबीयांनी दिग्दर्शकाला बारीक सारीक तपशील पुरवून मदतच केली.

 

Pu La Deshpande-inmarathi
faltupana.in

 

असो, पु लं च्या घरी काही मौल्यवान चीजवस्तू मिळेल ह्या आशेने चोरी करणारे ( हा दुसरा प्रयत्न आहे म्हणे ) पु लनीच म्हटल्याप्रमाणे एखाद्या बँकेवर धाडशी दरोडा घालून पट्टेवाल्याची फक्त टोपी चोरणाऱ्याच्या वंशाचे असणार.

पुलंचा मौल्यावान खजिना तर आमच्या कडे आहे आणि तो चोरी होऊ शकत नाही … फुकट वाटला जाऊ शकतो कितीही वेळा.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?