' अन्यायाला वाचा फोडणारी बेधडक 'ग्रीन गँग'

अन्यायाला वाचा फोडणारी बेधडक ‘ग्रीन गँग’

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

तुम्हाला गुलाब गँग बद्दल तर माहितच असेल. त्यांच्यावर आधारित गुलाब गॅन्ग नावाचा माधुरी दीक्षित आणि जुही चावलाचा चित्रपट देखील येऊन गेला. अशीच एक गॅन्ग उत्तर प्रदेशच्या कन्नोज जिल्ह्यातही आहे, ग्रीन गॅन्ग. नावावरून भलेही ही कुठली पर्यावरण प्रेमी गॅन्ग वाटत असली तरी असं नाहीये. तर या गँगमधील स्त्रिया अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात. ह्या गँग मधील सर्व सदस्य ह्या स्त्रिया आहेत आणि त्या फक्त हिरव्या रंगाची साडी नेसतात.

 

green gang-inmarathi03
krishijagran.com

ह्या गॅन्गच्या प्रमुख आहेत अंगुरी दहाडिया, ह्यांनीच ह्या ग्रीन गॅन्गची स्थापना केली. कन्नोजमध्ये ग्रीन गॅन्ग ही न्यायाचं प्रतिक आहे. ह्या स्त्रिया कायदेशीर पद्धतीने अत्याचार झालेल्या व्यक्तीला न्याय मिळवून देतात. ह्या गटाची स्थापना २०१० साली झाली. सध्या ही गॅन्ग उत्तर प्रदेशच्या १३ जिल्ह्यांत सक्रीय आहे. ह्या गॅन्गमध्ये एकूण १४ हजार २५२ महिलांनी सहभाग नोंदवला आहे.

ग्रीन गॅन्गची सुरवात ही देखील एका अन्यायातूनच झाली होती. ह्या गॅन्गची लीडर अंगुरी ह्या त्यांच घर चालविण्यासाठी बूट आणि काच ठेवायचे बॉक्स बनवायच्या. ह्यातूनच त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या आजारी पतीचा उपचार चालत असे. ह्यातूनच त्यांनी काही पैसे जमा करून त्यांनी काही जमीन विकत घेतली होती. ज्याचे पैसे त्या हप्त्यांद्वारे फेडत होत्या. पण ती जमीन ज्याने त्यांना विकली त्याने अंगुरीची फसवणूक केली.

 

green gang-inmarathi02
yourstory.com

ज्यानंतर अंगुरी न्यायासाठी भटकत राहिली. पण तेव्हा कुणीही त्यांच्या मदतीला पुढे आलं नाही. तेव्हा अंगुरी ह्यांना असं वाटलं की, काहीतरी असं करावं ज्यामुळे त्या अश्या लोकांना त्यांचा अधिकार मिळवून देऊ शकतील ज्यांच्या मदतीला आणखी कोणीही पुढे येत नाही.

त्यामुळे त्यांनी महिलांचं एक असं संघटन तयार केलं, जे ह्या अन्यायाविरोधात आवाज उठवू शकतील. पण सुरवातीला ह्या गॅन्गमध्ये कुणीही सामील होण्यास तयार नव्हते. तेव्हा अंगुरी ह्या गावोगावी जाऊन लोकांना न्याय-अन्याय काय असतो हे समजवू लागल्या, आपण अन्यायाविरोधात आवाज उठवायला हवा हे सांगू लागल्या. काही काळाने लोकांनाही त्यांचं म्हणणे पटायला लागलं आणि स्त्रियांनी त्यांच्या ह्या गॅन्गमध्ये सामील होण्यास पुढाकार घेतला. ह्यात जास्तकरून त्या स्त्रिया होत्या ज्यांच्यासोबत कधीकाळी अन्याय झाला होता, ज्यांची फसवणूक झाली होती. हळूहळू ही ग्रीन गॅन्ग वाढू लागली.

 

green gang-inmarathi
jansandeshonline.com

ह्या ग्रीन गॅन्गमधील हिरव्या रंगाची साडी ही सामान्य कार्यकर्त्यांसाठी असते तर लाल पट्टी असलेली साडी ही गॅन्गच्या पदाधिकारीसाठी असते.
अन्यायाविरोधात लढत असताना अनेकदा ह्या स्त्रियांना तुरुंगात देखील जावे लागले. स्वतः अंगुरी ह्या पाच वेळा तुरुंगात जाऊन आल्या आहेत.
आता ही गॅन्ग खूप मोठी झाली आहे. त्यामुळे ती चालविण्यासाठी काही आर्थिक अडचणी येत आहेत. त्यामुळे आता ग्रीन गॅन्ग चे रुपांतर राजकीय पार्टीत करण्याचा विचार सुरु आहे. जेणेकरून आर्थिक अडचण तर दूर होईलच पण त्यामुळे आणखी मोठ्या स्तरावर लोकांची मदतही करता येईल आणि हे संगठन असचं निरंतर कार्यरत राहू शकेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?