जगातील या सर्वात उष्ण ठिकाणांचं तापमान केवळ ऐकलं तरी आपल्याला घाम फुटेल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सध्या संपूर्ण महाराष्ट्राला उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.
दर उन्हाळ्यातले ते दिवस जरा आठवा, जेंव्हा घराबाहेर पडताच घामाच्या धारा लागायच्या.
लॉकडाऊनमुळे बाहेर पडण्याल मनाई असली, तरी घरातल्या घरातही उन्हाचा तडाखा जाणवतो.
सकाळी अकरा वाजेपासूनच घराच्या खिडक्यांमधून थेट प्रवेश करणारं हे ऊन सायंकाळी सहा नंतर आपली तीव्रता कमी करतं.
सध्याची दुपार म्हणजे एसी, कुलर किंवा फॅनशिवाय पर्याय नाही.

ज्यांच्याकडे या सोई आहेत, त्यांना हे काही प्रमाणात सुसह्य असलं, तरी ज्यांना या महागड्या सुविधा परवडत नाही त्यांच्या परिस्थितीची कल्पना करणेही कठीण.
मग अशावेळी काहीजण आईस्क्रीम तर काहीजण थंडगार बर्फाचा गोळा खातात, काही माठातलं पणी पितात तर काही वाळ्याचे पडदे लावतात.
उन्हाळ्यापासून बचाव करण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगळा असला, तरी उन्हाळ्याचे हे चार महिने सुकर व्हावेत असं प्रत्येकालाच वाटतं.
दररोज तापमानाचा वाढता आकडा पाहिल्यावर पावसाची आठवण आल्याशिवाय रहात नाही.
पण तुम्हाला माहित आहे का, आपण ज्या ठिकाणी राहतो तिथे पडणारे ऊन हे तर आपण सहन करू शकतो,
पण जगात काही अशी ठिकाणं देखील आहेत जिथे अमर्याद उष्णता असते. म्हणजे त्या ठिकाणी कोणी जगूच शकत नाही असा उन्हाळा.
अश्या ठिकाणांना जगातील सर्वात उष्ण ठिकाणं म्हणून ओळखलं जातं.
दश्त-ए-लुत, ईरान

दश्त-ए-लुत हे जगातील सर्वात उष्ण ठिकाण आहे.
येथील तापमान हे ७० डिग्री सेल्सिअस पेक्षाही जास्त असतं. अनेकदा त्यात वाढही होते.
आश्चर्य वाटलं ना! पण हे खरं आहे. याबाबत अनेकदा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संशोधनेही झाली आहेत.
आता तुम्हाला वाटेल की एवढ्या तापमानात माणसाच्या शरिराचे किती हाल होतील.
पण तापमानात कुठलाही मनुष्य किंवा जीव-जंतू जिवंत राहु शकत नाही, त्यामुळे या भागात मानवी वस्ती नाही.
केव ऑफ द क्रिस्टल, मेक्सिको

मेक्सिकोच्या नैका येथे एक क्रिस्टल गुहा आहे. ही गुहा एवढी गरम आहे की येथिल तापमान हे ५८ डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढल्याचं नोंदवलं गेलं.
या गुहेत एवढी उष्ण हवा असते की, येथे कुठल्या प्रकारचे संशोधन देखील करता येत नाही. या गुहेला जगातील सर्वात नैसर्गिक क्रिस्टल गुहा मानली जाते.
मोठं वाळवंट

बॅडलॅण्ड म्हणू प्रसिद्द असणाऱ्या क्वीन्सलँडचा एक मोठा भाग हा वाळवंटाने वेढलेला आहे.
२००३ बसली येथील तापमान हे ६९.३ डिग्री सेल्सिअस एवढं नोंदविण्यात आलं होतं. म्हणूनच येथे भयंकर दुष्काळ देखील पडतो.
अल-अजीजियाह, लीबिया

लिबिया येथील अल-अजीजियाह ह्या ठिकाणाचा समावेश देखील जगातील त्या निवडक ठिकाणांमध्ये होतो जिथे सर्वात जास्त उष्णता असते.
उन्हाळ्यात येथील तापमान हे ४८ डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचतं, तर काहीवेळा येथील तापमानाने ५७.८ डिग्री सेल्सिअस एवढा उच्चांक गाठला होता.
उन्हामुळे जमिनीला पडलेल्या भेगा, वाळलेली झाडं हे चित्र पाहून तेथिल वातावरणाचा नक्कीच अंदाज येऊ शकतो.
फ्लेमिंगो माउंटेन, चीन

चीन येथील फ्लेमिंगो माउंटेन हा देखील जगातील सर्वात उष्ण प्रदेशांपैकी एक आहे.
येथिल तापमान अनेकदा ६६.८ दिग्र सेल्सिअस एवढं नोंदवलं जातं.
तापलेली लाल माती, केवळ नजरेलाही सहन न होणारी उष्णता, यांवरून येथिल उष्णतेचा दाह जाणवु शकतो.
या प्रदेशांच्या मानाने आपल्या देशातील उन्हाळा सुसह्य आहे.
जर आपल्या देशात देखील उन्हाळ्यात तापमानाने एवढा उच्चांक गाठला असता तर आपण कसं जगलो असतो.
त्यामुळे ह्या ठिकाणांच्या तुलनेत आपल्याकडील उन्हाळा परवडला…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
जय श्रीरामछान माहिती