जुन्या काळचे वजन कमी करण्याचे खुळचट व विचित्र प्रयोग…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

आजच्या आधुनिक जगात लोक आपल्या आरोग्याविषयी जरा जास्तच कॉन्शिअस झाले आहेत. म्हणूनच आता लोक फिट राहण्याच्या नानाविध पद्धती शोधात असतात.

जसे की, ग्रीन टी पिणे, ओट्स खाणे, कमी जेवण करणे, व्यायाम करणे, इत्यादी इत्यादी… तसं वजन प्रमाणात ठेवणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलेच आहे आणि सर्वांनी स्वतःची काळजी ही घ्यायलाच हवी.

पण म्हणून, वजन कमी करण्यासाठी वाट्टेल ते करणे चुकीचे आहे.

म्हणजे वजन कमी करण्यासाठी कधी कधी लोक सर्व परिसीमा ओलांडतात. त्याने वजन जरी कमी होत असलं तरी ते तुमच्या जीवावर देखील बेतू शकते.

 

weight-loss-inmarathi

 

पण वजन कमी करणे, फिट दिसणे हे भूत काही आजच्या आधुनिक जगातील लोकांच्या डोक्यातच शिरलं आहे असं नाही. तर ते पूर्वीपासून चालत आलेलं आहे. पूर्वीच्या काळी देखील लोक वजन कमी करण्यासाठी अनेक विचित्र पर्याय निवडायचे.

१. सूर्याची किरणं आणि हवेवर जगणे :

 

weight loss-inmarathi11
wwno.org

हो, तुम्ही अगदी बरोबर वाचलंत! जर कुणी खूप बारीक असेल तर आपण मस्करीत नेहेमी असं म्हणत असतो की ती व्यक्ती हवा खाऊन जगत आहे. पण हा केवळ एक प्रकारे टिंगल उडविण्यासाठी वापरल्या जाणारा वाक्प्रचार आहे.

कारण आपल्याला माहित आहे ह्या जगात अन्न आणि पाण्याविना कुणीही जास्तकाळ जिवंत राहू शकत नाही. कारण आपल्याला जिवंत राहण्यासाठी काही पोषक तत्वांची गरज असते जी आपल्याला हवा, पाणी आणि अन्नातून मिळत असतात.

पण पूर्वीच्या काळी लोक वजन कमी करण्यासाठी सूर्याची किरणे आणि हवा ह्यांच्या भरवश्यावर जगत होते. आणि ह्या प्रयत्नांत अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.

२. Tapeworms खाऊन जगणे :

 

tapeworm-inmarathi
budejovice.idnes.cz

एक वेळ अशी देखील होती जेव्हा विक्टोरियन लोक हे वजन करण्यासाठी, बारीक दिसण्यासाठी Tapeworms खायचे. आणि ह्याचा परिणाम म्हणजे त्याचं वजन तर कमी नाही झालं पण त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागले.

३. वजन कमी करण्यासाठी Arsenic चा वापर :

 

weight loss-inmarathi10
indiatimes.com

Arsenic चा प्रयोग हा औषधी आणि गोळ्यांमध्ये केला जातो. पण Arsenic हा शरीरातील जमलेल्या कॅलरीज कमी करण्यात मदत करतो.

पण हा पदार्थ तेव्हढाच घातक देखील आहे. पूर्वीच्या काळी लोक वजन कमी करण्यासाठी कुठलाही विचार न करता ह्या Arsenic चे सेवन करायचे. त्याच्या परिणामास्वरूप त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला.

४. जेवण चावून थुंकून द्यायचे :

 

weight loss-inmarathi08
graziadaily.co.za

१९ व्या शतकातील लोकांना ह्याशी काहीही घेण-देणं नव्हतं की त्यांच्या शरीराला आवश्यक ते पोषक द्रव्य मिळत आहेत की नाही.

त्यामुळे वजन कमी करण्याचा एक बऱ्यापैकी प्रचलित प्रचार म्हणजे – जेवणाचा घास तोंडात घेऊन त्याला चावून गिळायचे नाही तर बाहेर थुंकून द्यायचे…!

५. लॉर्ड बेरॉन हे रोज व्हिनेगर प्यायचे :

 

weight loss-inmarathi07
medicalnewstoday.com

प्रसिद्ध कवी लॉर्ड बेरॉन हे त्यांची बॉडी मेंटेन ठेवण्यासाठी रोज व्हिनेगारचे सेवन करायचे. एवढचं नाही तर ते बटाट्यामध्ये पण व्हिनेगार टाकून प्यायचे.

पण वयानुसार बेरॉन ह्यांना अतिसार आणि उलट्या ह्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला.

६. स्त्रिया साबणाने वजन कमी करायच्या :

 

weight loss-inmarathi06
indiatimes.com

पूर्वीच्या काळी स्त्रिया La-Mar Reducing Soap ह्या साबणाचा वापर करून शरीरातील चरबी कमी करण्याचा प्रयत्न करायच्या. पण ह्याने काहीही फरक पडला नाही.

७. Corsets ने ठेवायचे स्वतःला फिट :

 

weight loss-inmarathi05
citelighter.com

Corsets हे रबराचे बनलेले असायचे, ज्याला घालून स्त्री किंवा पुरुष स्वतःला आणखी आकर्षक आणि फिट दाखविण्याचा प्रयत्न करायचे.

असं मानलं जायचं की, हे घातल्याने शरीरातून घाम निघतो ज्यामुळे चरबीचे विघटन व्हायचे. पण हे खोटं होतं.

८. स्त्रिया सलूनमध्ये जाऊन वजन कमी करायच्या :

 

weight loss-inmarathi04
indiatimes.com

१९५० च्या दशकात स्त्रिया ह्या वजन कमी करण्यासाठी सलूनमध्ये जात होत्या. जिथे त्या वेगवेगळ्या मशीन्सचा वापर करायच्या ज्यामुळे शरीरातील जमलेली चरबी कमी केली जाऊ शकेल.

पण ही पद्धती खूप त्रासदायक अशी होती.

९. Sauna Pants घालून वजन कमी करण्याचा प्रयत्न :

 

weight-inmarathi
indiatimes.com

Sauna Pants हे १९७० च्या दशकात खूप लोकप्रिय झाले होते. त्या दरम्यान लोक या pants घालायचे जेणेकरून त्यांच्या शरीरातून घाम निघेल आणि त्यांची चरबी होऊन ते बारीक होतील. पण ह्याने देखील काही फरक पडायचा नाही.

आपलं वजन नियंत्रणात ठेवणे शरीरासाठी खरंच गरजेचं आहे. पण त्यासाठी हे असे उपाय फायद्याचे नाही, घातकच आहेत. त्यामुळे असे उपाय करण्यापेक्षा नियमित व्यायाम करा आणि खाण्यावर जरा नियंत्रण ठेवा म्हणजे तुमचं वजन नियंत्रणात राहिल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?