२१ किलोमीटर सहज धावणारी ४५ वर्षांची महिला अॅथलिट : कोईम्बतूरच्या महिलेचा आदर्श प्रवास

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

कुठलही काम करायचं म्हटल तर त्यासाठी जिद्द आणि मेहेनतीची गरज असते. आपल्याला हवं असलेलं आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण काहीही करतो. मग त्यात कुठलीही गोष्ट आपल्या आड आली तरी आपण त्याला पार करत आपलं ध्येय हे पूर्ण करतोच. अगदी वयही आपल्या आड येऊ शकत नाही. अश्याच एक स्त्री आहे A. Kalaimani ज्या ४५ वर्षांच्या आहेत. आणि तरीही त्या एक चांगल्या एथलिट आहेत.

 

A kalaimani-inmarathi03
indiatimes.com

कोयंबतूर येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय A. Kalaimani ह्या एथलिट तर आहेतच सोबतच त्या ३ मुलांच्या आई देखील आहेत. आणि त्या पोटाची खळगी भागविण्यासाठी एक चहाच दुकान चालवतात. A. Kalaimani ह्यांनी १० वी पर्यंतच शिक्षण घेतलं, शाळेत असताना पासूनच त्या एथलेटिक्स आणि कबड्डीच्या खेळांत सहभागी व्हायच्या. त्या अनेक मॅराथॉनमध्ये देखील धावल्या आहेत. पण लग्न झाल्यानंतर त्या त्यांच्या पतीसोबत चहाच्या दुकानात काम करू लागल्या.

 

A kalaimani-inmarathi
indiatimes.com

Kalaimani ह्या २१ किलोमीटरमच्या मॅराथॉनमध्ये पहिल्या स्थानावर होत्या. त्या आजही दर रविवारी २१ किलोमीटर धावतात. म्हणूनच त्यांच्या टीमने त्यांना ‘Phoenix Runner’ असे नावं दिले आहे. आणि आता त्यांना चार तासांत ४१ किलोमीटरची मॅराथॉन जिंकायची आहे.

 

A kalaimani-inmarathi02
indiatimes.com

Kalaimani ह्या सांगतात की, २० वर्षांच्या वयात त्यांच लग्न झालं. लग्नानंतर देखील त्यांना त्यांचा खेळ सुरु ठेवायचा होता. जेव्हा त्यांनी हे त्यांच्या पतीला सांगितले तेव्हा त्यांचे पती देखील ह्याकरिता तयार झाले. १० वर्षांआधी त्यांच्या पतीने त्यांना Masters Athletic Championships बद्दल सांगितले. ह्यादरम्यान त्यांची जोसेफ ह्यांच्याशी ओळख झाली. ज्यांनी एक प्रशिक्षक म्हणून Kalaimani ह्यांना प्रशिक्षण दिलं. ह्यानंतर त्या नेहेमी पुढे जातच राहिल्या, त्यांनी जिल्हा, राज्य आणि राष्टीय स्तरावर अनेक स्पर्धांत भाग घेतला. आणि ह्या दरम्यान त्यांनी ४ वेळा सुवर्ण पदकं देखील मिळविली.

 

A kalaimani-inmarathi01
aninews.in

Kalaimani ह्या सांगतात की, ‘मी नेहेमी मॅराथॉन मध्ये सहभाग घ्यायची. ह्यादरम्यान मी मॅराथॉन चे प्रशिक्षण घेण्याकरिता Phoenix Runner टिम जॉइन केली. मी सकाळी ४ वाजता उठून माझ्या कुटुंबाकरिता नाश्ता बनवते, मग त्यानंतर ५ वाजेपर्यंत माझ्या पतींना चहाच्या दुकानात सोडते आणि प्रशिक्षणासाठी निघते. दर रविवारी आमची टीम २१ किलोमीटर धावते. सोबतच मॅराथॉन साठी ४१ किलोमीटरची प्रॅक्टिस देखील करतो. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही १०० वर्षांच्या वयात देखील Masters Athletic Championships मध्ये सहभाग घेऊ शकतात. फक्त त्यासाठी स्वतःला सुदृढ ठेवण्याची गरज आहे.

ते म्हणतात ना, जिद्द असेल तर माणूस कुठल्याही परिस्थितीशी झगडत आपलं ध्येय गाठतोच. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे A. Kalaimani…

स्त्रोत : ANI

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?