' वजन घटवण्यासाठी आहार कमी करायची गरज नाही, विश्वास बसत नाहीये? मग हे वाचा – InMarathi

वजन घटवण्यासाठी आहार कमी करायची गरज नाही, विश्वास बसत नाहीये? मग हे वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

वजन कमी करणे हे आज जगातील जवळपास सर्वच लोकांसाठी महत्वाचा विषय आहे. सर्वानांच आपलं वजन कमी असावं असं वाटतं असतं.  आपणही चित्रपटांतील नट-नट्यांसारखं दिसावे, म्हणजे करीना सारखं झिरो फिगर किंवा सलमान सारखी बॉडी हवी असते.

 

Salman Khan in film still Bodyguard

 

पण हे काही प्रत्येकाला जमत नाही. कारण वजन कमी करायचं म्हटलं तर खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवायला हवे, व्यायाम करायला हवा वगैरे वगैरे…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही  वाचा –

===

 

obesity-inmarathi01

 

पण आता एक नवीन शोध लागला हे, ज्यानुसार आता तुम्हाला खाण्यावर नियंत्रण ठेवायची गरज नाही, आणि व्यायाम करायचीही गरज नाही. कारण आता त्यासाठी एक वेगळाच उपाय शोधण्यात आला आहे.

ज्यामध्ये माणसाच्या मेंदूतील भुकेची माहिती देणाऱ्या सिस्टीमवर एक अश्या प्रकारचं कंट्रोल लावलं जाईल ज्यामुळे लोक आवश्यकतेपेक्षा जास्त खाऊ शकणार नाही.

 

brain InMarathi

 

मेडिकल सायन्सच्या इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी माणसांचा लठ्ठपणा कमी करण्याची एक अनोखी पद्धत शोधून काढण्याचा दावा केला आहे.

 

obesity-inmarathi

 

लठ्ठपणाने ग्रासलेल्या लोकांचा उपचार करण्याच्या हेतूने वैज्ञानिकांनी एक पद्धती शोधून काढली आहे. ज्यामध्ये माणसाच्या अन्ननलीकेच्या आत असलेल्या पोस्टिरीयर वेगल ट्रंक नावाच्या नसेला बंद केले जाईल.

हीच ती नस आहे जी भुकेचा संकेत मेंदूपर्यंत पोहोचवते. ह्या नसेतला प्रवाह थांबिल्यानंतर लोकांचे अनावश्यक भुकेची भावना कमी होईल.

म्हणजे अश्यात लोक फक्त गरजेपुरतच खाणार. त्यामुळे त्यांचा लठ्ठपणा कमी होईल. खाण्या-पिण्याची आवड असलेल्या लोकांसाठी हा उपचार खरच फायद्याचा ठरू शकतो.

हे ही वाचा –

===

 

fat-boy-eating-salad-inmarathi

 

अमेरिकेच्या एमोरी युनिवर्सिटी, स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये ही रिसर्चकरणाऱ्या टिमनुसार, ह्या ट्रीटमेंटमध्ये सिटी स्कॅनच्या प्रयोगाने एक सुई रोग्याच्या शरीरात इंजेक्ट केल्या जाते.

 

injection InMarathi

 

ह्या नंतर एर्गन गॅसला सुईद्वारे पाठवून पोस्टिरीयर वेगल ट्रंक या नसेला जाम केल्या जाते. कारण हीच नस मेंदूला संकेत देत असते की, पोट रिकामे आहे आणि तुम्हाला खायची गरज आहे.

 

obesity-inmarathi03

 

रिसर्च टिमनुसार त्यांनी ही ट्रीटमेंट १० लोकांवर प्रयोग केली. आणि त्यानंतर ९० दिवसांपर्यंत ह्या लोकांचं निरीक्षण करण्यात आले. ह्याचा परिणाम म्हणजे ह्या लोकांचा बॉडी मास इंडेक्स हा १४ टक्क्यांनी कमी झाला होता.

==

हे ही  वाचा

===

 

bmi formula InMarathi

 

तसेच याचा कुठलाही दुष्परिणाम त्या लोकांवर दिसून आला नाही. जर हा प्रयोग खरच यशस्वी झाला तर जे लोक लठ्ठपणा ह्या आजारापासून ग्रासलेले आहेत आणि त्यातून बाहेर पडणे त्यांच्यासाठी अशक्य ठरत आहे, अश्या लोकांसाठी ही ट्रीटमेंट नक्की फायद्याची ठरू शकेल.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?