' 'फोबिया' म्हणजे काय ? आपल्या नकळत घडून येणाऱ्या या धोकादायक प्रकाराबद्दल जाणून घेणं अत्यावश्यक आहे

‘फोबिया’ म्हणजे काय ? आपल्या नकळत घडून येणाऱ्या या धोकादायक प्रकाराबद्दल जाणून घेणं अत्यावश्यक आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती असते. तुम्हाला देखील नक्कीच कधी न कधी कशाची ना कशाची भीती वाटते. भीती ही प्रत्येकाच्या मनामध्ये असते, पण काही लोक मुद्दाम ती लपवण्याचा प्रयत्न करत असतात.

आपण अचानक एखादी गोष्ट समोर आल्यावर काही प्रमाणात दचकतो, ती देखील एक प्रकारची भीतीच असते.

पण काही लोकांना एवढी भीती असते की, ते त्या परिस्तिथीमध्ये काहीही करू शकत नाहीत. अशा लोकांना एकप्रकारचा हा भीतीचा मानसिक आजार असतो.

ज्याला फोबिया असे म्हटले जाते.

आज पण याच फोबियाबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत…

 

Phobia.Inmarathi
hypnotherapyinsydney.com

फोबिया म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीची किंवा घटनेची खूप प्रचंड प्रमाणात मनामध्ये भीती निर्माण होणे. जर एखाद्या माणसाला हा फोबिया असल्यास तो मनुष्य त्या गोष्टीच्या आसपास देखील भटकत नाही किंवा त्याचे नाव जरी काढले तरी त्याचा थरकाप उडतो.

यामध्ये एक असे भय येते, जे तुम्हाला आणि तुमच्या जीवनाला विचलित करून जाते.

भूतकाळामध्ये झालेल्या एखाद्या गोष्टीचा मेंदूवर जास्त मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊन, त्याविषयीची भीती आपल्या मेंदूमध्ये घर करून जाते आणि आपल्याला अशाप्रकारचा एक आजार जडतो.

उदारणार्थ : काही लोकांना पाण्याची भीती असते, तर काही लोकांना उंचीची भीती वाटते. भूतकाळात घडलेल्या काही गोष्टींमुळे भविष्यात ही माणसे त्या गोष्टीपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत असतात.

 

Phobia.Inmarathi1
thehealthsite.com

या फोबिया म्हणजेच भीतीवर मात करण्यास वर्तणूक चिकित्सा बहुधा यशस्वी ठरतात. या उपचारपद्धतीमध्ये धैर्यशील व्यक्ती असल्यास ती हळूहळू या चिंताग्रस्त परिस्थितीमधून बाहेर पडू शकते आणि आपल्या भीतीला कंट्रोल करूस शकते.

भयभीत परिस्थितीमध्ये या चिंतेमध्ये तो मनुष्य आपली विचार करण्याची शक्ती गमावून बसलेला असतो आणि त्याला यावेळी नक्की काय करावे हे समजत नसते.

यावेळी मनामध्ये एक वेगळीच भीती निर्माण होऊन हातापायांचा थरकाप उडतो आणि घाम फुटतो. तसेच, अशावेळी त्या माणसाच्या हृदयाचे ठोके खूप जलद गतीने होत असतात.

आपणही एखाद्या वेळी असे नक्की अनुभवतो. पण यांच्या बाबतीत हे खूपच भयानक असते, ज्याची कल्पना देखील करणे आपल्याला कठीण आहे. मानसोपचार देखील फोबियामध्ये खूप फायद्याचा ठरतो.

 

Phobia.Inmarathi2
postimg.org

ही भीती म्हणजेच हा फोबिया वैद्यकीय भाषेमध्ये एक प्रकारच्या मानसिक आजार जरी असला तर त्याला वेगवेगळ्या भागांमध्ये वर्गीकृत करण्यात आलेले आहे.

फोबिया हा एक ग्रीक शब्द आहे, ज्याचा अर्थ एखाद्या विशिष्ट गोष्टीची खूप मोठ्या प्रमाणावर मनामध्ये भीती असणे. यामध्ये काही वेगवेगळी उदाहरणे देखील आहेत.

जसे, एफ्रोफोबिया म्हणजे ऊंच आणि बंदिस्त ठिकाणांची भीती, नायक्टोफोबिया म्हणजेच अंधाराची भीती वाटणे, ओक्लोफोबिया म्हणजेच गर्दीची भीती वाटणे, झेनोफोबिया म्हणजेच अनोळख्या व्यक्तीची भीती वाटणे आणि झूफोबिया म्हणजेच प्राण्यांची भीती वाटणे.

अजून एक म्हणजे, अॅग्रोफोबिया म्हणजेच उघड्या आणि सार्वजनिक ठिकाणांची भीती वाटणे.

 

Phobia.Inmarathi3
psychologicalscience.org

विशेषकरून हा आजार अपंगत्वाचा आजार असलेल्या पीडितांना जे आपल्या घराच्या बाहेर पडू शकत नाहीत, अशा लोकांना होतो.

शाळेमध्ये घडलेल्या काही प्रकारामुळे मुलांमध्ये देखील एक प्रकारची भीती निर्माण होऊ शकते आणि त्याचे वळण फोबियामध्ये होऊ शकते.

त्यामुळे पालकांनी अशा बाबतीत त्यांची नेहमी काळजी घ्यावी आणि त्यांच्याशी मित्राप्रमाणे राहावे. ज्यामुळे ते तुमच्यासोबत आपल्या समस्या शेयर करून दडपणाखाली राहणार नाहीत.

आता यावरून तुम्हाला हे लक्षात आलेच असेल की, फोबिया म्हणजे नक्की काय असते आणि आपल्यामधील भितीमध्ये आणि फोबियामध्ये काय फरक असतो. आपल्यातील भीती ही काही काळासाठी असते.

पण फोबिया आपल्याला तेच तेच सारखे आठवण करून देत असतो आणि आपल्यातील भीती वाढवत असतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “‘फोबिया’ म्हणजे काय ? आपल्या नकळत घडून येणाऱ्या या धोकादायक प्रकाराबद्दल जाणून घेणं अत्यावश्यक आहे

  • April 11, 2018 at 8:57 am
    Permalink

    Excellent and 8nformative write up.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?