' ही चालू असलेले शीतयुध्द तिसऱ्या महायुद्धात बदलण्याची नांदी तर नाही ना ? – InMarathi

ही चालू असलेले शीतयुध्द तिसऱ्या महायुद्धात बदलण्याची नांदी तर नाही ना ?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

“History doesn’t repeat itself but it often rhymes”

(ढोबळ मराठी अर्थ – इतिहासाची पुनरावृत्ती होईलच असं नाही पण घटनांचं यमक मात्र नक्कीच जुळतं) असं Mark Twain ने म्हटलंय.  पाश्चिमात्त्य देशांची हाताबाहेर गेलेली आक्रमकता हि वर्ल्ड वॉर-१ आणि वर्ल्ड वॉर-२च्या आधी घडलेल्या घटनांची आठवण करून देतेय. पण त्या काळी वापरण्यात आलेली हत्यारं ही आजच्या हत्यारांच्या तुलनेत खेळणी म्हटली पाहिजेत.

सध्या घडत असलेल्या घटनांचं रूपांतरण जर Nuclear confrontation मध्ये झालं तर जगात फक्त दगड-विटाच उरतील आणि त्याही रेडिएशन वातावरणात सोडणाऱ्या.

रशियन राजदूतांची जगभरातल्या २३ देशांमधून हकालपट्टी करण्यात आलीये, त्यामुळे काहीतरी भीषण घडणार असं वाटू लागलय. रशियाने उचललेली पाऊलं ही वॉशिंग्टन, ब्रिटन आणि इतर महत्त्वाच्या पाश्चिमात्त्य सत्ताकेंद्रांवर काहीही परिणाम साधू शकत नाहीयेत.

Sergei Skripal, त्याची मुलगी Yulia आणि डिटेक्टिव्ह सार्जंट Nick Bailey यांच्यावर विषप्रयोग झाल्यानंतर ही परिस्थिती उद्भवलीये. एकट्या अमेरिकेतून ६० (त्यात UNमधले १२ सुद्धा आहेत ), १६ युरोपिअन युनिअन राष्टांमधले मधले आणि इतरही काही देशांतले राजदूत त्या त्या राष्ट्रांतून हाकलण्यात आले आहेत. रशियानेही राजदूतांना हाकलून सेंट पिटर्सबर्ग येथील consulate ला बंद करण्याचा निर्णय घेतलाय.

 

www.bbc.com

ह्या प्रकरणाचा फायदा ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांनी बरोब्बर उचललाय. तिथली राजकीय परिस्थिती आणि ब्रेक्सिट वगैरे घटनांची पार्श्वभूमी वगैरे लक्षात घेता एका प्रेक्षणीय निर्णयाची गरज होती आणि मे यांनी ती गरज पूर्ण केलीये. तिथल्या सांसदांना त्यांनी पटवून दिलाय कि रशियाचं पाश्चिमात्त्य देशांमधलं गुप्तहेरांचं जाळं उद्धवस्त झालंय!

ह्या सर्व प्रकारामुळे रशियाची अमेरिकेवर लक्ष ठेवण्याची क्षमता मात्र कमी झालीये हे नक्की. अमेरिकेची क्षमता हि रशियापेक्षा कित्त्येक पटींनी जास्त आहे हे सर्वांना ठाऊक आहेच. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश एकदा म्हणाले होते,

“आपल्या लोकांचे आणि राष्ट्राचे शत्रू नवनवीन पद्धतींनी आपल्याला हानी पोचवत असतात…आणि आपणही तेच करतो”.

 

www.nytimes.com

ट्रम्प हे “खरे” white nationalist असू देत नाही तर नसू देत. त्यांनापण ह्यात सहभागी व्हावंच लागेल! नाहीतर त्यांची गत देखील केनेडी किंवा हिटलर यांपैकी एकासारखी होईल ( केनेडी आणि हिटलर हे अँटी बँकिंग सिस्टिम, अँटी इस्राएल वगैरे होते असं जर आपण गृहीत धरून चाललं तर हे वाक्य वाचण्यात एक वेगळीच मजा आहे!). असो.

रशिया आणि जगभरातल्या देशांमध्ये “Regime change” हि अमेरिकेची खूप जुनी policy आहे आणि त्यात ब्रिटन हा खूप जुना मित्र. त्यामुळे रशियात अमेरिकेला अनुकूल सरकार येईस्तोवर हे प्रकार सुरूच राहणार.

 

news.vice.com

फक्त याचं रूपांतर भीषण अणुयुद्धात झालं तर याचे गंभीर परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील!

रशियाचा हा तीव्र तिरस्कार आपल्या सर्वांच्या विनाशाचं कारण ठरणार का?! आता खूप उशीर झालाय का? संपूर्ण सृष्टी mushroom cloudने झाकोळली जाणार का?

 

steemit.com

सध्या जशी परिस्थिती आहे ती लक्षात घेता जर काही पाऊलं उचलली गेली नाहीत तर हे दुसरं शीत युद्ध तिसऱ्या महायुद्धात बदलेल!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?