' ग्वाल्हेरच्या शिंदे (सिंधिया) घराण्याच्या मोठ्या खजिन्याची अद्भुत सत्यकथा...

ग्वाल्हेरच्या शिंदे (सिंधिया) घराण्याच्या मोठ्या खजिन्याची अद्भुत सत्यकथा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लहानपणापासूनच आपण गुप्त खजिनाच्या गोष्टी वाचत किंवा पाहत आलेलो आहोत. प्रत्येक राजा – महाराजाचा एक लपवलेला खजिना असायचा, ज्याचा वापर संकटकाळी हे राजे करत असत.

अशाप्रकारचे कितीतरी खजिने आपल्या भारतात आपल्याला आढळून येतात. ज्यांच्यामागे वेगवेगळ्या प्रकार ऐतिहासिक रहस्य लपलेले आहेत. त्यांचा इतिहास देखील तेवढाच मोठा आहे.

ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये लपलेल्या गुप्त खजिन्याचे देखील असेच काहीसे आहे. या खजिन्याचा उल्लेख ‘फॉर पॅव्हीलियंस’ या लेखक एम.एम. केय यांच्या पुस्तकामध्ये केलेला आहे.

 

Royal treasure of scindia dynasty.Inmarathi

 

एम. एम. केय यांचे वडील सर सेसिल केय हे सर माधवराव शिंदे यांचे खास मित्र होते, त्यांच्या या पुस्तकामध्ये लिहिलेली ती खजिन्याविषयीची खरी गोष्ट स्वतः सर माधवराव शिंदे यांनी त्यांना सांगितली होती.

सर माधवराव शिंदे हे कॉंग्रेस पार्टीचे नेते माधवराव सिंधिया यांचे आजोबा होते. माधवराव सिंधिया यांचे वडील जिवाजीराव शिंदे हे ग्वाल्हेरचे महाराजा होते.

माधवराव हे मराठ्यांच्या शिंदे राजेशाहीचे उत्तराधिकारी होते, शेवटी सन १९६१ मध्ये त्यांना ग्वाल्हेरचे राजा बनवले गेले. पण १९७१ मध्ये संविधानाच्या २६ व्या अमेंडमेंटमुळे त्यांची राजेशाही संपली आणि त्यांना आपल्या विशेष अधिकारांवरून हटवण्यात आले.

 

Royal treasure of scindia dynasty.Inmarathi1

 

१७ व्या आणि १८ व्या शतकामध्ये शिंद्यांची वैभवसंपन्नता प्रचंड वाढली होती. ग्वाल्हेरच्या किल्ल्यावरून जवळपास पूर्ण उत्तर भारतावर ते शासन करत होते.

ग्वाल्हेरचा किल्ला हा या राजपरिवारचा खजिना आणि हत्यारे, दारुगोळा ठेवण्याचे स्थान होते. हा गुप्त खजिना किल्ल्याच्या तळघरामध्ये ठेवण्यात येत असे, याच्याबद्दल राजदरबारामधील काही खास लोकांनाच माहिती असे.

हा खजिना गंगाजळीच्या नावाने ओळखला जात होता आणि या खजिन्याला ठेवण्याचा मुख्य उद्देश युद्ध, दुष्काळ आणि संकटाच्या काळामध्ये त्याचा उपयोग करण्यासाठी होता.

शिंदे राजेशाही एक यशस्वी आणि समृद्ध राजेशाही होती आणि तिच्या खजिन्यामध्ये सारखी वाढ होत होती. जेव्हा हे तळघर भरले जात असे, तेव्हा काही कोड वर्डचा वापर करून त्याला सील केले जात असे.

 

Royal treasure of scindia dynasty.Inmarathi3

 

त्यानंतर नवीन बनवल्या गेलेल्या तळघरामध्ये खजिन्याचा संग्रह केला जात असे. त्याला खास कोड वर्ड होता, ज्याला बीजक असे म्हटले जाते असे, जो फक्त महाराजांना माहित असे. जो नंतर आपल्या उत्तराधिकाऱ्याला ते सांगत असत.

ग्वालियरच्या किल्ल्यामध्ये असे कितीतरी तळघरे होती, ज्यांना खूप चतुराईने तयार करण्यात आले होते. या तळघरांना बिजकाशिवाय खोलणे आणि शोधणे अशक्य आहे.

१८४३ मध्ये जयाजीराव शिंदे राजा बनले आणि त्यामुळे तळघरे आणि बीजकाचे उत्तराधिकार त्यांना मिळाले.

१८५७ मध्ये काही काळासाठी हा किल्ला विद्रोहींनी काबीज केला, ज्या नंतर ब्रिटिशांनी तो काबीज केला. इंग्रजांनी या किल्ल्यातील गुप्त खजिना शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्यांना काही त्यात यश आले नाही.

सन १८८६ मध्ये इंग्रजांनी या किल्ल्याचा अधिकार परत एकदा शिंदे कुटुंबाला दिला.

 

Royal treasure of scindia dynasty.Inmarathi2

 

त्यानंतर काही काळाने राजा जयाजीराव यांचे निधन झाले. पण त्यावेळी सर माधवराव हे लहान असल्यामुळे ते बीजक मिळवण्यास अयशस्वी राहिले. त्यामुळे शिंद्यांचा खजिना या सूत्राशिवाय अदृश्य झाला आणि कुणीही काही करू शकत नव्हते.

ही समस्या पाहून ग्वाल्हेरमध्ये राहणारे ब्रिटीश कर्नल बॅनरमॅनने खजिना शोधण्यासाठी राजघराण्याकडे मदत करण्यासाठी विनंती केली, ही विनंती राजघराण्याने स्वीकारली.

कर्नलने पूर्ण मेहनतीने किल्ल्याची शोधाशोध केली. मोठ्या मेहनतीने आणि प्रयत्नांनंतर कर्नल ते तळघर शोधण्यात यशस्वी झाले.

जेव्हा या खजिन्याचा दरवाजा उघडला तेव्हा सगळेजण ते पाहतच राहिले. कर्नल बॅनरमॅननुसार हा खजिना अलिबाबाच्या खजिन्यापेक्षा काही कमी नव्हता.

या खजिन्यामध्ये ६ कोटी २० लाख रुपये किमतीची चांदी, ४० लाख रुपये किमतीचे सोने, खूप मौल्यवान रत्न आणि दागिने व हिरे मिळाले. हे तळघर त्या सर्व तळघरांपैकी एकच होते.

ग्वालियर किल्ल्यामध्ये अशी कितीतरी तळघरे होती, जिथे गंगाजळी खजिना लपवून ठेवण्यात आलेला होता. हा खजिना मिळाल्यानंतर काही वर्ष खजिना शोधण्याचे काम थांबवण्यात आले.

सर माधवराव हे राजा बनले तेव्हा त्यांनी परत एकदा खजिना शोधण्यास सुरुवात केली, पण त्यांना काही खजिना मिळाला नाही.

 

Royal treasure of scindia dynasty.Inmarathi4

 

एक दिवस एक वृद्ध ज्योतिषी त्याच्याजवळ आला आणि त्याने सर माधवराव यांना सांगितले की, तो त्यांना खजिन्यापर्यंत घेऊन जाईल. पण फक्त त्यांनी एकट्यानेच त्यांच्याबरोबर यावे. ते देखील डोळ्यांवर पट्टी बांधून यावे.

राजाने सर्व अटी मान्य केल्या, पण त्या खजिन्याच्या तळघराच्या जवळ जाताच त्यांना वाटले की, कुणीतरी तिसरा त्यांच्या पाठीमागून चालत आहे.

या तिसऱ्या माणसामुळे जीवावर बेतू शकते, या भितीपोटी त्यांनी आपल्याकडे असलेल्या शस्त्राने त्याच्यावर वार केला आणि धावत किल्ल्याच्या बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांना समजले की, त्यांनी चुकून त्या ज्योतिष्यालाच मारले होते, कोणताही तिसरा मनुष्य तिथे उपस्थित नव्हता.

त्यानंतर परत त्यांनी तो खजिना शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काय तो मिळाला नाही.

 

scindia family inmarathi

 

एक दिवस माधवराव किल्ल्याच्या एका भागामधून जात होते, अचानक त्यांचा पाय घसरला. त्यावेळी त्यांनी स्वतःला सावरण्यासाठी एका खांबाला आधार म्हणून पकडले.

त्याने ज्या खांबाला आधार म्हणून धरले होते, तो खांब अचानक एका बाजूला झुकला आणि एका गुप्त तळघराचा दरवाजा उघडला.

त्यानंतर सर माधवराव यांनी आपल्या शिपायांना बोलवून त्या तळघराचा तपास केला. त्या तळघरामध्ये सर माधवराव शिंदे यांना २ कोटीच्या चांदीच्या शिक्क्यांबरोबरच काही इतर अनमोल रत्ने मिळाली. या खजिन्यामुळे माधवराव यांची आर्थिक स्थिती सुधारली.

 

Royal treasure of scindia dynasty.Inmarathi6

 

या एवढ्या वर्षाच्या वाईट अनुभवांनंतर सर माधवराव यांनी एक निर्णय घेतला की, ते त्यांचे धन लपवणार नाहीत. त्यांनी आपल्या संपत्तीला रुपयांमध्ये बदलले आणि मुंबईमध्ये त्या पैशांना मोठमोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली.

सन १९२० च्या दरम्यान टाटा समूहाची आर्थिक स्थिती काही चांगली नव्हती आणि कंपनीचा खूप संघर्ष चालू होता.

टाटा समूहाच्या प्रबंधकांनी राजा माधवराव शिंदे यांच्याकडे आर्थिक मदत करण्याची विनंती केली. सर माधवराव देखील त्यांना मदत करण्यास आनंदाने राजी झाले.

याप्रकारे माधवराव हे टाटा समूहाचे सर्वात मोठे गुंतवणूकदारांपैकी एक बनले आणि टाटा समूहाच्या एका मोठ्या भागाचे मालक झाले.

 

tata inmarathi

 

टाटा कंपनीमधील गुंतवणूक ही गोष्ट खरी असल्याचा पुरावा आहे. असे मानले जाते की, आजही गंगाजळी खजिना हा ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये लपलेला आहे. चंद्रगुप्त मोर्याचा खजिना देखील चाणक्यने आपल्या बुद्धिमत्तेच्या सहाय्याने दडवून ठेवला होता, असे म्हटले जाते.

पण त्याच्याबद्दल देखील अजूनही काहीच माहिती समजली नाही आहे. जर हे सर्व खजिने हाती लागले, तर नक्कीच आपल्या देशाची परिस्थिती अजून चांगल्याप्रकारे सुधारेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “ग्वाल्हेरच्या शिंदे (सिंधिया) घराण्याच्या मोठ्या खजिन्याची अद्भुत सत्यकथा…

  • December 23, 2018 at 6:14 pm
    Permalink

    हि निव्वळ एक दंतकथा असून याचा शिंदे(सिंदिया) घराण्याच्या इतिहासाशी काही एक संबंध नाहीये.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?