' प्राण्यांच्या विष्ठेपासून बनवलेल्या, अतिश्रीमंत लोकांच्या "आवडत्या" महागड्या कॉफी

प्राण्यांच्या विष्ठेपासून बनवलेल्या, अतिश्रीमंत लोकांच्या “आवडत्या” महागड्या कॉफी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चहा आणि कॉफी हे आपल्या जीवनातील एक भागच असतो. यांच्याशिवाय बहुतेकांचा जणू दिवसच पूर्ण होत नाही.

दिवस कसा ही असो, बहुतेक लोकांना चहा आणि कॉफी हा लागतोच. आता ही बाहेर एवढे ऊन लागत आहे, तरीदेखील माणसे काही चहा आणि कॉफी पिण्याचे सोडत नाही.

ठिकठिकाणी टपरीवर आपल्याला चहा आणि कॉफी लवर्स नेहमीच दिसतील.

 

coffee uses01-marathipizza

 

कॉफी पिऊन आपल्याला ताजेतवाने वाटतं. ज्या कॉफींची गुणवत्ता जेवढी जास्त, तेवढीच या कॉफींची किंमत जास्त असते.

ऐकवेळ आवडता पदार्थ मिळाला नाही तरी चालेल, पण मनासारखी वाफाळती कॉफी मिळाली की दिवस कसा मस्त जातो.

पण तुम्हाला हे माहीत आहे का ? जगातील सर्वात महागडी कॉफी ही प्राण्यांच्या लीदपासून म्हणजेच विष्ठेपासून बनते.

काय, वाटलं ना आश्चर्य? पण हे खरं आहे.

अर्थात अशा कॉफी पिण्याचे खूप फायदे असल्याने या कॉफीसाठी कित्येक डॉलर मोजणा-यांची संख्याही पुष्कळ आहे.इंडोनेशियाची कॉफी लुवाक किंवा चिविट कॉफी ही सर्वात महागडी कॉफी मानली जाते.या प्रकारची एक कप कॉफी जवळपास ८० डॉलरपर्यंत असू शकते.

चला तर मग जाणून घेऊया, या जगातील सर्वात महागड्या कॉफीबद्दल काही विशेष माहिती.

ब्लॅक आयव्हरी ब्लँड कॉफी

उत्तर थायलंडमध्ये बनवण्यात येणारी ब्लॅक आयव्हरी ब्लँड कॉफी हत्तीच्या विष्ठेमध्ये असलेल्या बियांपासून बनवली जाते.

ही कॉफी जगातील सर्वात महागड्या कॉफी ब्रॅन्डस् मधीलच एक आहे. याच्या एक किलो कॉफीची किंमत ११०० डॉलर म्हणजेच ६७१०० रुपये आहे.

 

elephant inmarathi

 

या कॉफीला बनवण्यासाठी हत्तींना कॉफीचे बीज खाण्यास दिले जातात.

हत्ती हे कच्चे लेगम्स म्हणजेच शेंगा खातात आणि त्याला पचवतात आणि लीद म्हणजेच विष्ठा बाहेर फेकतात. त्यानंतर त्याच विष्ठेमधून कॉफीचे बीज काढले जाते.

एक किलो कॉफी मिळवण्यासाठी एका हत्तीला जवळपास ३३ किलो कॉफीचे कच्ची फळे खायला दिले जातात. हत्तीच्या विष्ठेमधून बीज काढण्याचे काम हत्तींचे प्रशिक्षित ट्रेनर करतात.

हे बीज काढल्यानंतर त्यांना उन्हामध्ये सुकवले जाते. याप्रकारे जगातील सर्वात महागडी कॉफी ब्लॅक आयव्हरी ब्लँड ही तयार करण्यात येते.

 

How the worlds most expensive coffee is made.Inmarathi1

हे ही वाचा – स्वतः पिकवलेल्या कॉफीची चव निराळीच असते, पण घरी कॉफीचं रोप लावायचं कसं? वाचा

याची खास गोष्ट ही आहे की, या कॉफीमध्ये कडूपणा जराही नसतो. पचन क्रियेच्या दरम्यान हत्तीचे एन्जाइम कॉफीच्या प्रोटीनला तोडून टाकते.

प्रोटीन तुटल्याबरोबरच कॉफीचा कडूपणा जवळपास संपतोच आणि याप्रकारे जगातील सर्वात महागडी कॉफीमध्ये गणली जाणारी ही एक कॉफी तयार केली जाते.

कोपी लुवाक

जगातील सर्वात महागड्या कॉफींमधील एक ‘कोपी लुवाक’ ही आहे.

ही कॉफी पिण्यासाठी खूपच मस्त लागते. पण या कॉफीला बनवण्याची प्रक्रिया खूपच चकित करणारी आहे. कॉफी कोपी लुवाक जिची चव घेण्यासाठी लोक जगभरातून इंडोनेशियामध्ये येतात.

लोकांच्या म्हणण्यानुसार, या कॉफीची जो एकदा चव घेईल, त्यानंतर त्याला दुसरी कोणतीही कॉफी आवडणार नाही.

 

How the worlds most expensive coffee is made.Inmarathi2

 

इंडोनेशियामधील पाम सिवेट नावाच्या एका मांजरीच्या प्रजातीच्या मदतीने ही जगातील सर्वात महागड्या कॉफींपैकी एक कॉफी तयार केली जाते.

हा प्राणी बेरी खातो, पण बेरीच्या बिया पचवू शकत नाही आणि या बियांना आपल्या विष्ठेद्वारे बाहेर फेकून देतो. याच बियांना सुकवून ‘कोपी लुवाक’ नावाची ही महागडी कॉफी तयार केली जाते.

ही कॉफी खूप दुर्मिळ असते, त्यामुळे या कॉफीची किंमत खूप जास्त असते. या कॉफीची किंमत जवळपास ७०० अमेरिकन डॉलर प्रति किलो म्हणजेच जवळपास ४५,५३१ रुपये प्रति किलो एवढी आहे.

महागड्या कॉफीचे व्यापारी पाम सिवेट पाळतात

‘पाम सिवेट’ कोपी लुवाकला मिळणाऱ्या मोठ्या किंमतीमुळे इंडोनेशियामध्ये पाळला देखील जातो.

पाम सिवेटला पिंजऱ्यामध्ये ठेऊन खूप कॉफी बीन्स खायला दिल्या जातात. पोट भरून खाणे खाल्ल्यानंतर काही तासांनी पाम सिमेट आपली विष्ठा बाहेर टाकून देतो.

त्यानंतर त्याला पाळणारे शेतकरी पाम सिवेटच्या विष्ठेला जमा करतात.

 

How the worlds most expensive coffee is made.Inmarathi3

 

यानंतर या विष्ठेमध्ये असलेले कॉफीचे बीज वेगळे केले जातात. या विष्ठेमधून वेगळी करण्यात आलेली कॉफी बीन्सला भाजलं जातं.

भाजल्यानंतर ही कॉफी बाजारामध्ये नेली जाते, युरोप आणि अमेरिकेच्या बाजारामध्ये जाईपर्यंत ही कॉफी खूप महाग होते.

अशाप्रकारे प्राण्यांच्या विष्ठेमधील पदार्थांपासून जागातील या सर्वात महागड्या कॉफी बनवल्या जातात. या कॉफींची मागणी देखील बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असते, त्यामुळे त्यांची किंमत अजूनच वाढते.

आपल्याकडे अशा प्रकारच्या कॉफी तितक्याशा प्रचलित नसल्या तरी जगभरात मात्र त्याचा आस्वाद घेतला जातो.

ही कॉफी प्राण्यांच्या विष्ठेपासून बनवली जात असली तरी स्वच्छता, त्यातील पौष्टिक घटक यांची मात्र पुरेपुर काळजी घेतली जाते.

===

हे ही वाचा – चहाचे इतके प्रकार… तुमच्या कट्टर चहाप्रेमी मित्रांनाही माहित नसतील!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?