'असा आवळणार मोदी सरकार काळ्या पैश्यावरचा फास

असा आवळणार मोदी सरकार काळ्या पैश्यावरचा फास

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा व्यवहारातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांचीच झोप उडाली. एक नवीन दिव्यकर्म आपल्यासमोर उभं ठाकलं – ते म्हणजे जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा बँक खात्यात जमा करणं. मोदींनी पुरेसा अवधी दिलेला असून देखील पैसे जमा करण्यासाठी लोक मात्र बँकावर अगदी उड्या मारत आहेत. असो! सरकारचा हा डाव काळ्या पैश्याच्या विरोधात आहे हे दस्तुरखुद्द पंतप्रधानांनीच जाहीर केल्यामुळे काळा पैसा साठवून ठेवणाऱ्यांची आता काही खैर नाही हे मात्र खरे! कारण तुम्ही जमा करत असलेल्या प्रत्येक पैश्यावर आयकर विभागाची नजर असणार आहे…!

तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाचं सोडा हो, घरात पन्नास हजारांची किंवा जास्तीत जास्त 1 लाखांची रक्कम असेल. त्यामुळे त्याचा त्रास आपल्याला काही जास्त जाणवणार नाही. परंतु ज्यांनी घरात लाखोंनी पैसे दडवून ठेवले आहेत त्यांची मात्र चांगलीच गोची होणार आहे. याला कारण आहे महसूल सचिव ‘हसमुख अधिया’ यांनी ट्विटरवरून जनतेला दिलेली ‘तंबी’…!

हसमुख यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितले की, “ज्या लोकांनी आपल्या खात्यात १० लाखांपेक्षा जास्त रक्कम भरली आहे त्यांची रक्कम इन्कम टॅक्स रिटर्न्सशी जुळत नसल्यास, त्यांना चुकवलेला कर तर भरावाच लागणार आहे – पण सोबतच एकूण कराच्या २०० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.”

black-money-marathipizza01

स्रोत

उदा. समजा एखाद्याने १५ लाखाची रक्कम भरली आणि आयकर विभागाच्या ते निदर्शनास आलं आणि त्यांनी त्या व्यक्तीला पकडलं. त्याला कर म्हणून ३ लाख (२०% च्या होशिबाने गृहीत धरूया) रुपये भरावे लागतीलच, सोबतच कराच्या २०० टक्के रक्कम म्हणजे अजून ६ लाख रुपये दंड म्हणून भरावे लागतील. म्हणजेच १५ लाखामागे त्या व्यक्तीला ९ लाख रुपयांना मुकावे लागेल.

वित्त मंत्रालयाकडून असेही सांगण्यात आले आहे कि, “जर तुम्ही १० लाखांची रक्कम भरलीत आणि तुम्ही घोषित केलेल्या उत्पन्नाच्या (Declared Income) रकमेशी १० लाखांची रक्कम जुळत नसेल तर तो देखील कर बुडवेगिरीचा प्रकार मानला जाईल.”

त्यावर कारवाई म्हणून Income Tax Act Section 270(A) नुसार तुमच्याकडून कराची रक्कम आणि २०० टक्के दंडाची रक्कम वसूल केली जाईल. तसेच एखाद्याने उत्पन्नाविषयी खोटी माहिती देऊन कर बुडवला आहे असे निदर्शनास आल्यास त्या व्यक्तीला देखील २०० टक्के दंड आकारण्यात येणार आहे.

वित्त मंत्रालय देशातील प्रत्येक बँक खात्यावर करडी नजर ठेवत असून १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत ज्या खात्यामध्ये २.५ लाखाच्या वर रक्कम भरली गेली आहे, अश्या खात्यांचे व्यवहार त्या संबधित व्यक्ती भरत असलेल्या इन्कम टॅक्स रिटर्न्सशी पडताळून पाहिले जातील. आणि इथेही काही काळबेरं दिसलं ही कारवाई निश्चित!

वित्त मंत्रालयाकडून सोनारांना देखील आदेश देण्यात आले आहेत की सोने खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा पॅन नंबर घेतल्याशिवाय सोने विकू नये.

सोनारांनी त्यांच्या खात्यात जमा केलेल्या पैश्यांची त्यांनी केलेल्या विक्रीशी छाननी करण्यात येणार आहे. जर त्यात असे आढळून आले की ग्राहकाचा पॅन नंबर घेतल्याशिवाय सोन्याची विक्री करण्यात आली आहे, तर त्या सोनारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 

black-money-marathipizza02

स्रोत

सरकारची ही युक्ती पाहून काळा पैसा साठवणाऱ्या लोकांना एवढंच म्हणावसं वाटतंय..

आली रे आली आता तुमची पाळी आली…! 😀

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 38 posts and counting.See all posts by vishal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?