Googleच्या CEO सुंदर पिचैंनी सांगितले यशाचे ५ मंत्र

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

एकदा दिल्ली युनिव्हर्सिटीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC) च्या विद्यार्थ्यांशी Google च्या CEO सुंदर पिचै ह्यांनी संवाद साधला होता. त्यांच्या टेक्नोलॉजीवरच्या प्रेमाच्या गोष्टी सांगितल्या – आणि त्या सोबतच – त्यांचं यशाचं सूत्रसुद्धा.

Sundar Pichai at SRCC

Image source: Business Insider

“तुमच्याकडे किती स्मार्ट फोन्स आहेत?” असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले – माझ्या घरी २०-३० फोन्स पडून आहेत. पुढे त्यांनी हेही सांगितलं की त्यांचा पहिला फोन त्यांनी १९९५ मध्ये घेतला होता आणि पहिला स्मार्टफोन, २००६ मध्ये!

बारावीत इतके कमी मार्क्स मिळाले होते की SRCC मध्ये प्रवेश मिळाला नसता – हे दिलखुलासपणे सांगत, पिचैंनी यशाची ५ सूत्रं सांगितली.

ते म्हणतात –

१) तुमच्या मनाचा आवाज ऐकण्याइतकी हिम्मत बाळगा. Be Bold – जे काम तुम्हाला excite करतं ते करा. मोठा विचार करा – तुमच्या कामाला आणखी मोठं कसं करता येईल – हा विचार करा.

२) Risk घ्या – Different विचार करा!

३) अपयश आलं तर त्याची लाज वाटून घेऊ नका – त्या अनुभवातून शिका आणि ते अपयश अभिमानाने मिरवा!!!

४) “Insecure” वाटणं सहाजिक आहे. यशाची शाश्वती नसण्याची भावनाच learning process ची सुरुवात करते.

५) शिक्षण प्रक्रियेत creativity ला प्राधान्य द्या. शिकताना practical कामाचा अनुभव मिळणं खूप आवश्यक आहे.

sundar-pichai5-820

Image Source: Times Of India

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 191 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?