' जास्त काळ साठवलेली वाईन चवदार का लागते? याचं उत्तरं तुम्हाला नक्कीच ठाऊक नसेल

जास्त काळ साठवलेली वाईन चवदार का लागते? याचं उत्तरं तुम्हाला नक्कीच ठाऊक नसेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

वाईन हा प्रकार आपल्या सर्वांना माहित असेलच. वाईनचे खूप वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. रेड वाईन, पोर्ट वाईन यांसारखे आणि इतर कितीतरी प्रकार आपल्याला वाईनमध्ये पाहायला मिळतात.

वाईन ही माणसा साठी दारू एवढी हानिकारक नसते. वाईन दारूमधील एक वेगळा प्रकार आहे, जो सहसा कोणत्याही वयोगटातील लोक घेऊ शकतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच लोक या वाईनचा मनसोक्त आस्वाद घेतात.

 

Wine taste better with age.Inmarathi
nyt.com

 

एखाद्या ख्रिश्चन लग्नामध्ये जर तुम्ही गेला असाल, तर तुम्हाला तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन ठेवलेल्या पाहायला मिळतील. त्यांच्या लग्नामध्ये वाईन ही एक प्रकारची सॉफ्ट ड्रिंक म्हणून वापरली जाते. पण तुम्हाला हे माहित आहे का ? की नवीन वाईनपेक्षा जास्त काळ साठवलेली वाईन ही आणखी चवदार लागते.

वाईन लवर्सना म्हणजेच जे वाईनचे चाहते आहेत, त्यांना नवीन आणि जुन्या वाईनमधील फरक लगेच समजून येतो. ते लगेच च यामधील फरक अचूकपणे ओळखू शकतात. ग्रीक, रोमन आणि अॅनी हॉल या वाईनच्या चवीमध्ये आपल्याला सारखेपणा आढळतो. बायबलमध्ये देखील वाईन विषयी काही प्रमाणात लिहिलेले आहे.

 

Wine taste better with age.Inmarathi1
nzwine.com

 

हे खरे आहे की, सर्वच वाईन्सची चव ही जास्त काळ ठेवल्याने चांगली होत नाही. त्यातील बहुतेक वाईन्सची चव काही साठवून ठेवल्यामुळे चांगली होत नाही. जेव्हा वाईनचे मार्केट वाढले आणि वाईन सगळीकडे विस्तारित झाली, तेव्हा मागणीनुसार त्या वाईन्समध्ये काही बदल करावे लागले. त्यातील काही वाईन्स तर गेल्या चार ते पाच वर्षापासून बनवल्याच गेल्या नाहीत. ज्यांच्या चवी खूपच भयानक होत्या.

तथापि, काही अत्यंत प्रतिष्ठित घरांमध्ये दीर्घकालीन वाईन तयार करणे चालूच आहे. विशेषतः त्या अधिक महाग देखील असतात.  त्यामुळे त्या जास्त खरेदी केल्या जात नाहीत आणि तरुणांना अशा वाईनच्या चव देखील तेवढ्या आवडत नाहीत. त्यामुळे लोक यावर पैसे खर्च करण्यास सहसा तयार नसतात.

 

Wine taste better with age.Inmarathi2
winecellardepot.com

 

या दुर्मिळ वाईनसाठी, वाईनला जर एका परिपूर्ण परिस्थितीमध्ये संरक्षित ठेवले तर वेळेनुसार त्यामध्ये एक मंद परिवर्तन होण्यास सुरुवात होते आणि ते हळूहळू चालू राहते. ऑक्सिडेशन आणि टॅनिन्स वाईनमध्ये अरोमा विकसित करण्यास मदत करतात. हे टॅनिन्स सहसा द्राक्षांच्या देठापासून बनतात, पण बहुतेकदा ते बॅरल ओकपासून मिळतात.

लाकूड (सिडर, युकलिप्टस), मसाले (व्हेनिला, मिरप), इम्रेरीमॅटिक किंवा मानवनिर्मित रासायनिक घटकांची पुनर्रचना वाईनमध्ये केली जाते. तपमान बदलल्यास वाईनची वैशिष्ट्ये बदलतात. वाईन ही तापमानाशी अत्यंत संवेदनशील असते.

तापमानात जर वाढ झाली, तर वाईनमधील ऑक्सिडेशन वाढते. असे झाल्यास, वाईनच्या वयामध्ये वाढ होते आणि ती कधी – कधी पिण्यायोग्य राहत नाही. वाईन साठवण्यासाठी ५५ डिग्री तापमान हे योग्य तापमान मानले जाते. तसेच, वाईन साठवतेवेळी आर्द्रता देखील तितकाच महत्वाचा घटक आहे.

 

Wine taste better with age.Inmarathi3
narcity.com

 

त्यामुळे वाईन ही कधीही एका विशिष्ट काळामध्ये पिणे गरजेचे आहे, कारण जास्त वेळ वाईन ठेवल्यास ती कधी – कधी पिण्यायोग्य राहत नाही. खूपच कमी वाईन अशा आहेत, ज्या ठेवल्यानंतर चवीला अधिक चांगल्या होतात. पण असे देखील खूप कमी वेळा घडते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?