आकाशाचा रंग निळा का असतो? जाणून घ्या…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लहानपणी आपल्या सर्वांचाच मनामध्ये विविध प्रकारचे प्रश्न निर्माण होत होते आणि त्यांची उत्तरे आपण आपल्या पालकांकडून मिळवत असू. आजही लहान मुले वेगवेगळे प्रश्न आपल्या पालकांना विचारत असतात. त्यावेळी काही प्रश्नांची उत्तरे तर आपल्याला मिळत होती, पण आपले काही प्रश्न असे असायचे, ज्यांची उत्तरे आपल्या पालकांना देखील देणे जमत नव्हते. त्यामुळे त्यावेळी आपल्यावर रागवून वेळ मारून नेत असत.

 

Why sky is Blue.Inmarathi
pexels.com

पण आजही तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या प्रश्नांची उत्तरे कदाचित माहित नसतील. त्यातीलच एक प्रश्न म्हणजे आकाश हे निळे का असते ? लहानपणी आपण जेव्हा कधी आपण आकाशाकडे पाहायचो तेव्हा आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण व्हायचा. पण याचे उत्तर काही केल्या कुणी देत नसे, कारण कदाचित त्यांना देखील या प्रश्नाचे उत्तर माहीत नसावे. आज आम्ही तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.

पावसाळ्यामध्ये तुम्ही बहुतेकदा इंद्रधनुष्य पाहिले असेल. इंद्रधनुष्य हे, जेव्हा सूर्याची किरणे पावसाच्या थेंबावर पडतात आणि रिफ्लेक्शन होते, त्यावेळी तयार होते. इंद्रधनुष्यामध्ये एकूण सात रंग आपल्याला पाहायला मिळतात, असेच काहीसे आकाशाचे देखील आहे.

 

Why sky is Blue.Inmarathi1
wallpapertag.com

आपल्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत, जसे नायट्रोजन, कार्बन डाय – ऑक्साईड, ऑक्सिजन, हायड्रोजन आहेत. याचबरोबर वेगवेगळे कण आणि गॅस आपल्या वातावरणामध्ये नेहमी फिरत असतात. वातावरणामध्ये या वायूंचे आणि इतर काही गोष्टींचे वेगवेगळे थर असतात. जे आपल्या सूर्याच्या किरणांवर परिणाम करतात.

सूर्याची किरणे जेव्हा आपल्या वायुमंडळामध्ये येतात, त्यावेळी ते या विविध वायूंमध्ये आणि इतर गोष्टींमध्ये मिसळतात आणि सगळीकडे पसरतात. सूर्याकडून येणारा प्रकाश हा पांढऱ्या रंगाचा असतो. पण जो हा पांढऱ्या रंगाचा प्रकाश असतो, त्यामध्ये अजून काही वेगवेगळ्या रंगाचे लाईट रेझ असतात. ज्यांना विज्ञानच्या भाषेमध्ये स्पेक्ट्रम म्हटले जाते. यामध्ये आपल्या इंद्रधनुष्यामध्ये जसे सात रंग असतात, त्याचप्रमाणे जांभळा, निळा (इंडिगो), निळा, हिरवा, पिवळा, नारंगी आणि लाल अशाप्रकारचे सात रंग असतात.

 

Why sky is Blue.Inmarathi3
nju.edu.cn

या रंगांमधील लाल रंगाची वेव्हलेन्थ (तरंगलांबी) सर्वात जास्त असते आणि जांभळ्या रंगाची वेव्हलेन्थ सर्वात कमी असते. तसेच, यामधील निळ्या रंगाची वेव्हलेन्थ देखील खूप कमी असते. या रंगाच्या वेव्हलेन्थ कमी असल्यामुळे हे जेव्हा आपल्या वातावरणातील वायूंना किंवा इतर वस्तूंना आदळतात, तेव्हा ते त्यामध्ये एकरूप होतात आणि वातावरणामध्ये सगळीकडे पसरतात. याच कारणामुळे ते जमिनीवर पूर्णपणे येऊ शकत नाहीत.

जांभळ्या रंगाची वेव्हलेन्थ सर्वात कमी असल्यामुळे तो वातावरणामध्ये सर्वात जास्त पसरतो. पण तरीही आपल्याला आकाश जांभळे न दिसता, निळेच दिसते असे का बरे होत असेल? यासाठी आपले डोळे कारणीभूत असतात. आपले डोळे हे जांभळ्या रंगासाठी एवढे सेन्सिटिव्ह असतात, तेवढे ते निळ्या रंगासाठी नसतात. त्यामुळे आपल्याला आकाश हे जांभळ्या रंगाचे न दिसता, निळ्या रंगाचे दिसते.

 

Why sky is Blue.Inmarathi2
youtube.com

पण बाकी प्राण्यांना कदाचित ते जांभळ्या रांगेचे दिसत देखील असेल. या सर्व कारणांमुळे आपल्याला आकाश हे निळे दिसते.

येथे एक गोष्ट समजून घ्यायला हवी, ती म्हणजे आकाश काही खरोखर निळ्या रंगाचे नसते. पृथ्वीवर येणारा सूर्याचा प्रकाश, त्याचे वातावरणातील घटकांशी होणारे मिश्रण, त्यातून अनेक रंगांचा स्पेक्ट्रम निर्माण होणे, आणि त्यातला निळा रंग दिसणे माणसाच्या दृष्टीला सोयीस्कर म्हणून ते आपल्याला निळे दिसते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?