' अलार्म मधलं “स्नूझ” बटन – जन्माची कथा आणि थोडीशी फसवणूक! – InMarathi

अलार्म मधलं “स्नूझ” बटन – जन्माची कथा आणि थोडीशी फसवणूक!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

रोज सकाळी अलार्म वाजतो आणि आपण तो बंद करून ‘अजून फक्त ५ मिनिट’ म्हणत परत झोपतो. ते ५ मिनिट कधीच पूर्ण होत नाहीत आणि थोड्या वेळाने परत आपला अलार्म वाजतो. जवळपास सर्वांचीच सकाळ ही अशीच होत असेल.

 

sleeping-inmarathi05
thelist.com

पण तुम्हाला हे माहित आहे का, की आपण जेव्हा अलार्म स्नुज करतो तेव्हा तो १० मिनिटांनी नाही तर ९ मिनिटे पुढे होतो. म्हणजे स्नुज जे १० मिनिटांचे असते असे आपल्याला वाटते, खरे तर ते केवळ ९ मिनिटांचे असते.

पण ९ च मिनिटे का? तर आपल्याला सर्वांनाच माहित आहे स्नुज ह्या बटनद्वारे आपण अलार्मला काही वेळाकरिता पुढे करू शकतो. जेव्हा ह्या स्नुज बटणाचा शोध लागला तेव्हा घडीच्या गीयरची सायकल १० मिनिटांची होती. पण स्नुज बटणाकरिता वेगळा गियर जोडल्यामुळे इतर गोष्टींचा ताळमेळ बसण्यात अडथळा निर्माण व्हायचा. त्याकरिता विशेषज्ञांनी असे सुचवले की, ह्या स्नुजच्या गियर सायकलचा वेळ का १० मिनिटांपेक्षा जास्त किंवा कमी ठेवायला हवा म्हणजे दोन्ही गोष्टी एकमेकांच्या कार्यात अडथळा आणू शकणार नाहीत.

 

alarm-clock-inmarathi
lifehacker.com

त्यामुळे त्यांनी ह्याला ९ मिनिटांवर सेट करण्याचा निर्णय घेतला. पण आता एक प्रश्न उठतो तो म्हणजे ९ मिनिटेच का? ११ मिनिटेही चालू शकली असती ना?

तर काही विशेषज्ञांनी ह्यावर असा तर्क लावला की, १० मिनिटांनी आपल्याला गाढ झोप लागते, मग अश्यात जर अलार्म पुन्हा वाजला तर आपण उठणार नाही. कदाचित म्हणूनच ह्याची वेळ ९ मिनिटे ठेवण्यात आली असावी.

 

alarm-clock-inmarathi01
veja.abril.com.br

तर ह्याची एक मानसिक बाजू देखील आहे. जेव्हा लोक गजराच्या घड्याळाचा वापर करतात तेव्हा त्यांना असे वाटते की, ह्याला स्नुज केल्याने ते काही वेळ आणखी झोपू शकतील. ह्याने ते थोड्या आणखी वेळ झोपू शकतात आणि त्यांना उशीरही होत नाही कारण लगेच काही वेळात म्हणेच ९ मिनिटांत अलार्म वाजला की, ते उठू शकतात.

हे तर झालं तेव्हाचं जेव्हा लोक गाजराच्या घडाळ्याचा वापर करायचे पण आता त्याची जागा ही, डिजिटल घड्याळ आणि स्मार्टफोन्स ने घेतली आहे.

डिजिटल घड्याळात देखील अलार्म हा १० नाही ९ मिनिटांनीच समोर वाढतो. कारण असे करणे सोपे होते. तर स्मार्टफोन जेव्हा आले तेव्हा स्नुज अॅप्लिकेशन बनविणाऱ्या इंजिनिअर्सनी देखील ह्याची सायकल ही ९ मिनिटांचीच ठेवली. कारण आता ही वेळ एक स्टॅण्डर्ड फॉरमॅट बनली होती. पण ते हे बदलूही शकले असते.

 

alarm-clock-inmarathi02
shutterstock.com

आता तर आपण सकाळचा अलार्म वाजला की त्याला बंद करून किंवा स्नुजवर टाकून परत झोपी जातो. ह्याची आपल्याला सवय झाली आहे. पण स्नुजचे काम हे झोपेतून उठवायचे आहे. तो तुम्हाला जास्त झोपायचा चान्स देत नाही. पण तरी आपण परत-परत स्नुजच्या बटणाचा वापर करून त्याला परत-परत रिसेट करत असतो. ह्याने झोप येण्याचा आभास तर होतो पण झोप येत नाही. तर उलट ह्या सवयीमुळे झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते.

जेव्हा आपण २-३ वेळा अलार्मला पुढे करतो तेव्हा आपली झोप तर पूर्ण होतच नाही, ह्याउलट दिवसभर आपल्याला थकल्यासारख देखील होतं. आपण फ्रेश राहू शकत नाही. म्हणून विशेषज्ञांच्या मते तेव्हाचाच अलार्म लावायला हवा जेव्हा आपल्याला उठायचं असते.

ह्यासार्वांवरून हेच लक्षात येते की रोज सकाळी जे आपण १० मिनिटं म्हणत अलार्म स्नुज वर टाकून झोपतो, तेव्हा तो आपल्याला १० नाही तर केवळ ९ मिनिटेच झोपू देतो…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 47 posts and counting.See all posts by abhidnya

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?