'जगभरातील सर्व प्रसिध्द इमारती एका तासासाठी का होतात 'लाईट्स ऑफ'! जाणून घ्या...

जगभरातील सर्व प्रसिध्द इमारती एका तासासाठी का होतात ‘लाईट्स ऑफ’! जाणून घ्या…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

जगभरातील सर्व प्रसिद्ध इमारती वर्षात एका तासासाठी संपूर्णपणे अंधारात हरवून जातात. आता तुम्ही विचार कराल की, जसं आपल्या घरी लोडशेडिंग मुळे लाईट जाते तशीच ह्या इमारतींवर देखील होत असेल. तर नाही. एका तासासाठी लाईट बंद ठेवण्यामागे एक स्तुत्य उपक्रम आहे.

 

earth-hour-inmarathi
सिडनी, ऑस्ट्रेलिया – हार्बर ब्रिज अॅण्ड ओपेरा हाउस

वीज वाचविण्याच्या उद्धेश्याने गेल्या शनवारी म्हणजेच २४ मार्च ला संपूर्ण जगात “अर्थ आवर” साजरा करण्यात आला. ज्याची सर्वत्र चर्चा देखील झाली. ह्याचा उद्देश म्हणजे जगात हवामानातील बदलांच्या प्रभावाबद्दल जागरुकता निर्माण करणे होय. अर्थ आवर हा वर्ल्ड वाईड फंड (WWF) ह्या संस्थेचे एक असे अभियान आहे ज्याचा उद्देश लोकांना विजेचे महत्व आणि पर्यावरणाची सुरक्षा ह्याप्रती जागरूक करणे आहे. ह्या संस्थेचे मुख्यालय हे सिंगापूर येथे आहे.

ह्या अभियानाची सुरवात २००७ साली झाली होती. २०१० मध्ये, हे अभियान जगातील १२० देशांमध्ये स्वीकारले गेले होते, तर या वर्षी १८७ देशांनी यात सहभाग घेतला होता.

 

earth-hour-inmarathi8
पार्थेनॉन मंदिर, एथेंस, ग्रीस

WWF ही एक अशी संस्था आहे, जी जगातील सर्वात मोठी इंडिपेंडेंट कंन्जरवेशन ऑर्गेनाइजेशन असल्याचे मानले जाते. ह्या संस्थेचा उद्देश हा निसर्गाचा ऱ्हास होण्यापासून वाचवणे आणि मानवी भविष्य अधिक चांगले करणे हे आहे.

World Wildlife Foundation’s Earth Hour ने लोकांना वीज आणि पर्यावरण ह्यांच्या प्रती जागरूक करण्यासाठी हे अभियान चालवले आहे. २००७ साली जेव्हा सिडनी येथे पर्यावरण सुरक्षेचा संदेश देण्याकरिता एका तासासाठी लाईट बंद ठेवल्या गेले होते तेव्हापासून ह्या संस्थला एक वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर हे अभियान संपूर्ण जगाने स्वीकारले.

ह्यावर्षी देखील पर्यावरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने २४ मार्च ला शनिवारी जगभरातील अनेक देशांनी ह्या अभियानात सहभाग घेतला. ह्यावेळी जगभरातील अनेक प्रसिद्ध ठिकाणांच्या, इमारतींच्या लाईट बंद ठेवण्यात आल्या होत्या…

त्यापैकी काही इमारतींचे हे फोटोज…

 

earth-hour-inmarathi5
इंडिया गेट, दिल्ली

 

earth-hour-inmarathi1
चीन येथील नॅॅशनल स्टेडियम (बर्ड्स नेस्ट), बीजिंग

 

earth-hour-inmarathi2
मलेशिया येथील पेट्रोनस टॉवर्स, क्वाला लंपुर

 

earth-hour-inmarathi3
ताइपेई १०१, ताइवान

 

earth-hour-inmarathi4
सुपरट्री ग्रोव, सिंगापुर

 

earth-hour-inmarathi6
क्राइस्ट दि सेवियर कथिड्रल, मॉस्को

 

earth-hour-inmarathi7
कोलोजियम, रोम, इटली

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?