' सँड पेपरने घासून ‘बॉल टेम्परिंग’ केल्याने नक्की काय होते? जाणून घ्या… – InMarathi

सँड पेपरने घासून ‘बॉल टेम्परिंग’ केल्याने नक्की काय होते? जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काही वर्षांपूर्वी केपटाऊन कसोटीमध्ये झालेल्या बॉल टेम्परींगचा प्रकार हा सगळीकडेच एक चर्चेचा विषय बनला होता. ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होती.

पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने एकदम सहज जिंकली, पण दुसऱ्या कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेने पुनरागमन करत ती कसोटी आपल्या नावे केली.

दोन्ही संघ एक – एक कसोटी जिंकल्यामुळे मालिकेला एक रंजक वळण निर्माण झाले होते. आता तिसरी कसोटी दोन्ही संघासाठी महत्त्वाची होती.

 

Ball tampering.Inmarathi
radionz.co.nz

 

केपटाऊन कसोटीमध्ये प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेने डीन एल्गार याच्या शतकी खेळीच्या जोरावर ३११ धावांचा मजबूत पल्ला गाठला होता.

पण या पहिल्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ हा फक्त २५५ धावाच करू शकला. दुसऱ्या डावामध्ये परत एकदा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची जादू दिसायला सुरुवात झाली होती!

मार्करम आणि एबीडी म्हणजेच ए.बी. डिव्हीलर्सने अर्धशतक ठोकत परत एकदा मजबूत स्थानावर आणून ठेवले.

त्यामुळे हा सामना देखील आपल्या हातातून जातो की काय, अशी भीती ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला वाटायला लागली.

याच भीतीपोटी ऑस्ट्रेलियाच्या कॅमरन बॅन्क्रोफटला चेंडू सँड पेपरने घासण्यास सांगितले गेले आणि त्याने देखील ते केले.

पण नियमानुसार अवैधरीत्या चेंडू हाताळणे किंवा चेंडूशी छेडछाड करणे बेकायदेशीर आहे. हा घडलेला प्रकार पहिल्यांदा पंचांकडून लपून राहिला होता, पण कॅमेऱ्याने त्याला बरोबर टिपले होते.

काही वेळाने हा प्रकार उघडकीस आला आणि कॅमरन बॅन्क्रोफटकडे याबाबत विचारणा करण्यात आली.

 

Ball tampering.Inmarathi1
bbci.co.uk

 

पण त्याआधी त्याला ड्रेसिंग रूममधून कोच डॅरेन लेहमन यांनी पीटर हॅन्ड्सकॉममार्फत कॅमरन बॅन्क्रोफटला एक मॅसेज पाठवला, त्यानंतर बॅन्क्रोफटने सँडपेपरचा तुकडा आपल्या खिशातून काढून आपल्या स्पोर्ट्स पॅन्टमध्ये लपवला.

पण हे सर्व कृत्य कॅमेऱ्याने बरोबर टिपले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा हा डाव फसला आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

या प्रकरणाने संपूर्ण क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे.

मोठमोठ्या दिग्गजांनी यावरून कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि ऑस्ट्रेलिया संघावर टीका केली.

ऑस्ट्रेलिया सरकारने देखील लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावून कारवाई करण्याचे आदेश क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिले.

ऑस्ट्रेलिया सरकारनुसार हे प्रकरण आपल्या देशाची प्रतिष्ठा मलीन करणारे ठरले.

 

Ball tampering.Inmarathi2
365dm.com

 

त्याचबरोबर या बॉल टेम्परींग प्रकरणानंतर स्टीव्ह स्मिथने दबावात येऊन आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला, स्मिथच्या या निर्णयाला पाठींबा देत डेव्हिड वॉर्नरने देखील आपल्या उपकर्णधारपदाचा राजीनामा दिला.

स्मिथने हे कृत्य आमच्या खेळाच्या रणनीतीचा एक भाग होता, असे सांगितले.

काय असते, बॉल टेम्परींग

बॉल टेम्परींग म्हणजे बॉलचा पृष्ठभाग किंवा सीम केलेल्या भागाशी बेकायदेशीरपणे असे काही तरी करणे, ज्याच्यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आणि गोलंदाजाला त्याचा फायदा मिळेल.

सामान्य शब्दांमध्ये असे की, यामध्ये अवैधरीत्या चेंडूला घासले, कुरतडले जाते. यामुळे खेळपट्टी कशीही असली तरीदेखील चेंडूला स्विंग मिळतो.

 

Ball tampering.Inmarathi3
newsnation.in

 

या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या कसोटी सामन्यामध्ये देखील असाच काहीसा प्रकार घडत होता. खेळपट्टी बॉल स्विंग करणारी नसतानाही २६ व्या ओव्हरपासूनच चेंडू रिव्हर्स स्विंग होऊ लागला होता.

आशिआई खेळपट्टीवर बहुतेकदा अशा प्रकारची स्विंग एवढ्या लवकर पाहायला मिळते. पण फॉरेन खेळपट्यांवर असे कधीही घडत नाही, कारण या खेळपट्यांवर योग्य प्रमाणात ग्रास असते.

या प्रकरणामध्ये दोषी सापडल्यास पंच प्रतिस्पर्धी संघाला ५ धावा पेनल्टी म्हणून देतात आणि नवीन चेंडू मागवला जातो.

तिथेच आयसीसी सामन्याच्या मानधनातील ५०, ७५ किंवा १०० टक्के दंड सुनावते. स्मिथला देखील या प्रकरणासाठी सामना मानधनाच्या १०० टक्के दंड सुनावला गेला होता!

आणि बॅन्क्रोफटला सामना मानधनाच्या ७५ टक्के दंड आणि ३ डिमेरेट गुण देण्यात आले. तसेच, स्मिथला एका कसोटी सामन्याची बंदी देखील घालण्यात आली.

 

Ball tampering.Inmarathi4
newsnation.in

 

दक्षिण आफ्रिकेवर देखील दोनदा बॉल टेम्परींगचे आरोप लावले गेले आहेत. एकदा फाफ डू प्लेसी या दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारावर देखील अशा प्रकारचा आरोप लावण्यात आला होता.

त्यावेळी त्याने एक विशिष्ट प्रकारचे चॉकलेट खाऊन आपल्या लाळेने चेंडूवर शाईन आणण्याचा प्रयत्न केला होता.

असे हे बॉल टेम्परींग प्रकरण ऑस्ट्रेलिया संघाला आणि स्टीव्ह स्मिथला चांगलेच महागात पडले आहे.

आतापर्यंत कितीदा हे झाले आहे आणि त्यातील पाच वेळा पाकिस्तानवर बॉल टेम्परींगचा आरोप लावण्यात आलेला आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?