' “उजव्या” ना शिव्या घालणाऱ्या “डाव्या” लोकांची कृष्णकृत्यं! – InMarathi

“उजव्या” ना शिव्या घालणाऱ्या “डाव्या” लोकांची कृष्णकृत्यं!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

सध्या फेसबुकच्या वापरकर्त्यांचा डेटा राजकीय पक्षांनी वापरण्याचं प्रकरण बातम्यांत गाजतय. कित्येक जाणकार विवीध माध्यमांत आपापली मते मांडत आहेत. वृत्तपत्रां प्रमाणे हल्ली विवीध वेबपेज, फेसबुक ही देखील प्रती माध्यमेच आहेत.

असंच एक on-line वृत्तपत्र आहे the wire नावाचं, आणी याच नावाचं त्यांच स्वतःच फेसबुक पेज देखील आहे.

सिद्धार्थ वरदराजन संस्थापक – संपादक असलेल्या या ऑन लाईन वृत्तपत्रात जेष्ठ पत्रकार-समालोचक विनोद दुवा यांचे व्हिडीओ ब्लॉग खास प्रसिद्ध, लोकप्रिय आहेत. कित्येक शे-हजार लोकांपर्यंत फर्स्ट हँड शेअर होतात, wire चे लेख, विनोद दुवा यांचे v-blog .

 

सध्या राम मंदीराचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. कित्येक वादी-फिर्यादी आपापले मुद्दे मांडण्यात शड्डू ठोकून उतरलेत. या प्रकरणी दोन आठवड्यांपूर्वी १४ मार्चच्या आसपास श्री श्री रवीशंकर यांची द वायरने एक मुलखात घेतली. मुलाखती नंतर द वायरचे संपादक राजन यांनी त्या interview चं विश्लेषण केलंय.

रवीशंकरांच्या मुलाखतीच्या शेवटी, “आमच्या पत्रकाराने विचारलेल्या  प्रश्नांना रवीशंकरांनी उत्तरं तर दिलीच नाहीत, उलट त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमचा कॅमेरा जबरदस्तीने बंद केला, आणी पत्रकाराशी गैरवर्तन केले” अशी एक टिप्पणी जोडली आहे. आणी मग संपादक त्या interview चं विश्लेषण करताना दिसतात. https://thewire.in/video/watch-interview-sri-sri-ravi-shankar-faith-constitution-ayodhya

वायरच्या संपादकांनी तर ” श्री श्री रविशंकर आणी त्यांच्या पाठीराख्यांनी रवी शंकरांना गैरसोयीच्या प्रश्नांबद्दल त्यांचा अजेंडा आ असहिष्णू वृत्ती दर्शवत आमचा कॅमेरा बंद केला, आणी आमच्या पत्रकाराला  घाबरवले.” …. अशी टिप्पणी करत मुलाखतीचा व्हिडीओ ट्वीट केला.

५०० हुन अधिक लोकांनी ते ट्विट रि-ट्विट केलंय.

 

The wire हे तसं एक प्रसीद्ध वेब पोर्टल.

Intolerance, मनुवाद, जातीयता, cow vigilante, माध्यमांची गळचेपी अशा कित्येक विषयांवर “विनोद दुआ” सारख्या कितीतरी जेष्ठ पत्रकारांचे, विश्लेषणकर्त्यांचे भारंभार लेख प्रकाशीत केले जातात या पोर्टलकडुन.

आणी सोशल मिडीयांतील युझर्स कडुन ते हातोहात वाचले, प्रसारीत केले जातात. या मुलाखतीचं देखील तेच झालं.

हि फेसबुक पोस्ट intitial लेव्हल जवळपास ३८४ जणांनी शेअर केली. तर ती बातमी १, ७८,०००  लोकांनी वाचली…असं फेसबुक दाखवतयं.

 

 

Pls do check for views count !!!

FB post link – https://www.facebook.com/thewire.in/videos/604483513237185/ 

==================================

हि झाली एक बाजू….आता दुसरी बाजू पाहु.

या मुलाखतीतील the wire च्या आरोपांना खंडीत करणारी आणखी एक व्हिडीओ क्लिप फिरते आहे सोशल मिडीयांत.

(तो या लिंकवर पाहता येईल)

The wire च्या व्हिडीओत आरोप केल्या प्रमाणे कॅमेरे बंद केल्याचा आरोप खोटा ठरला, कारण आणखी एका कॅमेऱ्यातून चित्रीकरण सुरुच होतं….आणी चित्रीकरण करणाऱ्या कॅमेऱ्याचं शुटींग दुसऱ्या कॅमेऱ्याने बरोबर टिपलं !!!

attach camera recording screen shot

म्हणजेच, कॅमेरा बंद केल्याचा शुद्ध बनाव केला गेला the wire कडुन !!!

आता उरला आणखी एक आरोप-पत्रकाराला browbeat केल्याचा….घाबरवल्याचा.

हा हि एक बनाव होता…कारण त्या महिला पत्रकाराला दुसरी एक महिला येऊन काही तरी समजावते …हे देखील audible आहे क्लिप मध्ये.

 

आणी लगेचच रवी शंकर त्या पत्रकाराला हवा तसा शेवट करत आभार प्रदर्शनाची संधी देतात !!!

निष्पक्षतेचा झेंडा वगैरे मिरवत फिरणाऱ्या the wire चा शुद्ध खोटा आरोप पकडला गेलाय.

आणी बेमालूमरीत्या ठरावीक विचारसरणीला, त्या विचारसरणीशी संबंधीत व्यक्तींना बदनाम-कलंकीत करण्याचा प्रोपोगंडा देखील पकडला गेलाय. विनोद दुवांच्या ” जन मन कि बात” हेडिंग खाली vlog द वायर ने प्रसारीत केलेत.

विनोद दुवांनी त्यांच्या vlog मधे “निर्ल्लज मेन स्ट्रीम मिडीया”, “माध्यमांचा पक्षपातीपणा”, “सत्ताधारी उजव्यांकडून माध्यमांचा गैरवापर” आणी “उजव्यांकडुन facts ची मोडतोड ” अशा विषयी शेकड्याने उदाहरणं दिलीत.

ज्या the wire साठी ते बोलतात, त्यांच्या या खोटारडेपणा बद्दल विनोद दुआ एखादा vlog करतील ???

किंवा निषेधाच्या किमान २/४ ओळी खरडतील ?

की उजव्यांचा प्रोपोगंडा, आणी the wire वाल्यांच्या विचारसरणीचं सर्वकाही ब्राह्मसत्य ?

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?