या भारतीय प्राध्यापकाने कोंबडीच्या पंखापासून केली इंधनाची निर्मिती !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

इंधन ही आजकाल एक खूप महत्त्वाची गोष्ट बनलेली आहे. सध्या भारतामध्ये इंधनाच्या कमतरतेमुळे त्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ही सगळ्यांसाठीच एक मोठी समस्या बनलेली आहे आणि लोक यामुळे त्रस्त आहेत. पण आता इंधन वाचवण्यासाठी एक वेगळ्या प्रकारच्या इंधनाचा शोध एका अमेरिकेतील प्रोफेसरने लावला आहे. जो आपल्या भारतीय वंशाचा आहे. तुम्हाला ऐकताना थोडे विचित्र वाटेल, पण त्याने चक्क कोंबड्याच्या पंखाचा आणि कॉफीच्या दाण्यांचा वापर करून बायोडिझेल तयार केलेले आहे. या हटके शोधामुळे खूप देशांची इंधनाची असलेली समस्या काही प्रमाणात दूर होऊ शकते.

 

Professor manoranjan mishra, Bio-Diesel.Inmarathi
wp.com

अमेरीकेतील भारतीय वंशाच्या एका प्रोफेसरने, ज्याचे नाव मनोरंजन म्हणजेच ‘मनो’ मिश्रा आहे. त्याने एक अद्भुत शोध लावला आहे. खरेतर त्याने कोंबड्याचे पंख आणि कॉफीच्या दाण्यांना एकत्रित करून एक नवीन इंधन बनवण्यात यश प्राप्त केले आहे. या अशा अद्भुत शोधासाठी त्यांना सन्मानित देखील करण्यात आले आहे.

प्रोफेसर मिश्रा यांना नेवादा सिस्टम ऑफ हायर एज्युकेशन बोर्ड ऑफ रिजेंट्सने ‘रिजेंट्स रिसर्चर’ या उपाधीने सन्मानित केले आहे. प्रोफेसर मनो मिश्रा हे नेवादा विश्व विद्यापीठामध्ये रेनो रिन्युअल एनर्जी सेंटरच्या संचालक पदावर सध्या कार्यरत आहेत.

प्रोफेसर मिश्रा यांनी या कार्यानंतर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्धी मिळवली आहे. आतापर्यंत प्रोफेसर मनो मिश्रा यांच्या नावावर आतापर्यंत जवळपास १० वेगवेगळ्या प्रकारची पेटंट आणि शोध कार्य नोंदवलेले आहेत, त्यांच्या ह्या कामगिरीमुळे संपूर्ण भारत देशाला त्यांचा हेवा वाटतो.

 

Professor manoranjan mishra, Bio-Diesel.Inmarathi1
bbend.net

एवढेच नाही तर त्यांना या आपल्या शोधकार्यासाठी २.५ कोटींपेक्षा जास्त रक्कम अनुदान म्हणून मिळाली आहे. याव्यतिरिक्त प्रोफेसर मनो मिश्रा यांनी पिण्याच्या पाण्यापासून आर्सेनिक अवयव हटवण्यामध्ये देखील यश प्राप्त केलेले आहे. यावेळी प्रोफेसर मनो मिश्रा हे कोंबड्याचे पंख आणि कॉफीच्या दाण्यांच्या मदतीने बायोडिझेल बनवून संपूर्ण जगामध्ये लोकप्रिय होत आहेत.

प्रोफेसर मनोरंजन मिश्रा हे नेवादा विश्व विद्यापीठामध्ये रसायन आणि धातू अभियांत्रिकी विभागामध्ये १९९३ पासून प्रोफेसरच्या पदावर काम करत आहेत. याच बरोबर ते सहा वर्षापर्यंत धातू अभियांत्रिकी विभागाचे विभागाध्यक्ष देखील राहिलेले आहेत.

 

Professor manoranjan mishra, Bio-Diesel.Inmarathi2
newshunt.com

प्रोफेसर मनो मिश्रा हे सध्या विश्व विद्यालयाच्या विद्याशाखेचे सदस्य होण्याबरोबरच ‘सेंटर फॉर मिनरल बायोप्रोसेसिंग अॅन्ड रिमेडिएशन’ विभाग आणि पर्यावरण विज्ञान विभागाच्या संचालक पदावर देखील काम करत आहेत. अशाप्रकारे प्रोफेसर मनो मिश्रा यांनी बनवलेल्या बायोडिझेलच्या माध्यमाने भारतामध्ये असलेल्या उर्जेच्या समस्या दूर करता येऊ शकतील.

असा हा शोध खूपच महत्त्वाचा शोध म्हणून जगासमोर आलेला आहे आणि त्यांच्या या शोधामुळे सर्वांनाच चांगल्याप्रकारे त्याचा फायदा मिळू शकतो. असेच, अजून काही चांगले शोध प्रोफेसर मनो मिश्रा हे लावतील अशी आशा आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?