' पाण्यात बाळाला जन्म देण्याची सुरक्षित आणि फायदेशीर पद्धत : वाॅटर बर्थ – InMarathi

पाण्यात बाळाला जन्म देण्याची सुरक्षित आणि फायदेशीर पद्धत : वाॅटर बर्थ

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

काहीच दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर काही फोटोज खूप वायरल झाले होते. ह्या फोटोमध्ये एक वृद्ध व्यक्ती समुद्रातून एका नवजात बाळाला घेऊन येते आहे आणि दुसरी व्यक्ती त्याची मदत करत आहे, तर दुसऱ्या फोटो मध्ये एक महिला त्या समुद्राच्या पाण्यातून बाहेर येताना दिसते.

हे फोटोज रेड सी म्हणजेच लाल समुद्राचे होते. एका रशियन महिलेने आपल्या डॉक्टर पतीच्या मदतीने ह्या समुद्रात आपल्या बाळाला जन्म दिला. तुम्ही याआधी देखील पाण्यात बाळांना जन्म देतानाच्या आईंचे व्हिडिओ आणि फोटोज सोशल मिडीयावर बघितले असतील. विदेशात सध्या हे Water Birth म्हणजेच पाण्यात बाळाला जन्म देणे आणि त्याचप्रमाणे Sea birth म्हणजेच समुद्रात बाळाला जन्म देण्याचा ट्रेंड वाढतो आहे.

 

water-birth-inmarathi
nypost.com

पण भारतात तुम्ही कधीही असं काही ऐकलं नसेल. म्हणूनच अनेकांना ह्याबद्दल काही कल्पना देखील नसेल. आणि असेल तरी ती आपली संस्कृती नाही म्हणून आपण त्याकडे पाठ फिरवतो.

 

water-birth-inmarathi04
netnews.vn

पण तुम्हाला माहित आहे का की, पाण्यात बाळाला जन्म देण्याचा हा ट्रेंड विदेशात लोकप्रिय तर आहेच पण त्यासोबतच तो आई आणि बाळासाठी अधिक चांगला असल्याचं डॉक्टर मानतात.

आता भारतात असे का नाही होतं? तर ह्याची काही कारणे आहेत. आपल्या शास्त्रांनुसार नवजात बाळ आणि आई पाण्याजवळ जाऊ शकत नाही.

 

water-birth-inmarathi02
birthwithoutfearblog.com

गरुड पुराणानुसार आपण सुतक मानतो. ज्यामध्ये जन्मानंतर १० दिवस त्या संपूर्ण कुटुंबाला ते सुतक पाळावे लागते तर ४५ दिवसांपर्यंत आईला ते सुतक पाळावे लागते. ह्यादरम्यान आई आणि बाळाला एकाच खोलीत राहावं लागतं तसेच ४५ दिवसांपर्यंत बाहेरच्या लोकांपासून दूर राहावे लागते.

ह्याचा संबंध जन्मावेळी होणाऱ्या अशुद्धीशी असतो. ह्याची देखील दोन कारणे असतात. पहिले म्हणजे जन्मानंतर जी नाळ कापली जाते तसेच जन्मावेळी होणाऱ्या प्रक्रिया ज्या एका प्रकारे हिंसक असतात, त्यातून लागणाऱ्या दोषाचे प्रायश्चित म्हणून सुतक पाळले जाते. आणि दुसरं म्हणजे जन्मानंतर स्त्रीच्या शरीरातून जे द्रव्य बाहेर पडते त्याला अशुद्ध असे मानले जाते. तसेच बाळाला जन्म दिल्यानंतर अनेक दिवस स्त्रीला पाळी जाते आणि म्हणूनच ती ह्यादरम्यान कुठल्याही प्रार्थनास्थळी जाऊ शकत नाही.

 

water-birth-inmarathi06
changemakers.com

आपल्याकडे पाण्याला अतिशय पवित्र मानले जाते. आपल्या देशात समुद्र आणि नद्या ह्यांना पूजले जाते. मग अश्यात बाळाला जन्म दिलेल्या स्त्रीला सुतक असताना पाण्यात जायला देखील मनाई असते.

सुतक मागे एक शास्त्रीय कारण देखील आहे. नुकतच जन्मलेलं बाळ हे खूप नाजूक असतं. त्याची रोगप्रतिकारक क्षमता ही देखील खूप कमी असते मग अश्यात जर त्याला जास्त काळ बाहेरच्या वातावरणात किंवा जास्त लोकांच्या सहवासात ठेवलं तर त्याचा त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, त्याला इन्फेक्शन होऊ शकते. तसेच जन्मदात्या आईला देखील आरामाची गरज असते. म्हणून हे ४५ दिवसांचे सुतक पाळले जाते.

ह्यासर्व कारणांमुळे आपल्या देशात Water Birth शक्य नाही. किंवा जोवर त्याची पूर्ण माहिती भारतीयांपर्यंत पोहोचत नाही, त्यांच्यात ह्याबाबत जागरूकता निर्माण होत नाही तोपर्यंत तरी हे शक्य नाही. आपल्या कडील आरोग्य विभागाच्या लोकांना देखील ह्याकरिता कुठली ट्रेनींग दिली जात नाही. कारण आपल्याकडे बाळाला जन्म देण्याची ही पद्धत तेवढी प्रचलित नाही. पण असं देखील नाही की भारत Water Birth झालेलं नाही. तर Water Birthची अनेक प्रकरणे आपल्याकडे देखील झालेली आहेत. ह्यापैकी पहिलं Water Birth Baby हा २००७ साली दिल्ली येथे जन्माला आला होता.

 

water-birth-inmarathi05
azbirthnest.com

ह्याबाबत डॉक्टर मानतात की, कुठल्याही ऑपरेशनच्या तुलनेत Water Birth हे कधीही चांगले आहे. ह्यामुळे लेबर पेन कमी होते, तसेच बाळाला पाण्यात आईच्या गर्भाचा सहवास मिळतो. तसेच पाण्यामुळे शरीरातील रक्ताचा प्रवाह देखील सुरळीत होऊन जातो.

Water Birth चे खुप फायदे असतात. ह्यामुळे तणाव कमी होतो, तसेच बाळाला जन्म देताना आईला जो त्रास होतो तो देखील कमी होतो. हे आई आणि बाळ दोघांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले असते.

 

water-birth-inmarathi01
annerley.com.hk

जर हे आरोग्याच्या दृष्टीने खरच चांगले आहे आणि ह्यामुळे जन्म देताना आईला कमी त्रास होत असेल तर नक्कीच भारतातही ह्याची सुरवात व्हायला हवी. आपण नदी किंवा समुद्रात नाही पण आर्टिफीशियल पूलमध्ये बाळाला जन्माला घालूच शकतो. ह्यामुळे ऑपरेशन करून डिलिव्हरी होण्याचे प्रमाण देखील कमी होऊ शकते. एका बाळाला जन्म देताना आईला अतोनात वेदना सोसाव्या लागतात, जर ह्यामुळे त्या काही प्रमाणात देखील कमी होत असेल तर खर्च ही पद्धती आपण आत्मसात करायला काहीही हरकत असायला नको.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?