'ब्रिटिशांनी केलेल्या अमानवी अन्यायाच्या अज्ञात बाजू : छळछावण्या, लूट आणि मानवी व्यापार

ब्रिटिशांनी केलेल्या अमानवी अन्यायाच्या अज्ञात बाजू : छळछावण्या, लूट आणि मानवी व्यापार

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

“ब्रिटिशांच्या साम्राज्यात कधीही सूर्य मावळत नसे” असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत! आणि खरंच आहे म्हणा ते!  पण त्यांनी राज्य केलेल्या ठिकाणच्या लोकांसाठी सूर्य पुन्हा उगवलाच नाही त्याचं काय!?

हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे, त्यांनी केलेले अत्त्याचार हे well documented असूनही ब्रिटिशांचे noble empire किंवा divine grace वगैरे म्हणणारे महाभाग आहेतच आणि दुर्दैव म्हणजे त्यात खूप मोठी मोठी नावं आहेत! त्यांनी राज्य केलेल्या लोकांना दुष्काळ, concentration camps ( होय! कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स खरं तर ब्रिटिश invention आहे पण त्याचा जन्मदाता हे बिरुद उगाचच जर्मनी / हिटलरला चिकटवण्यात आलं आहे!) मधील जीवघेणी परिस्थिती, क्रूर नरसंहार ( उदा. जालियनवाला बाग) हे सगळं भोगावं लागलेलं आहे.

इतकच नव्हे तर transatlantic slave trade मध्येसुद्धा त्यांचा महत्त्वाचा वाटा होता!!! ह्यातल्या काही गोष्टी आपण ठळकपणे बघणार आहोत.

केनियातील gulag ( कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स ) :

पूर्व अफ्रिकेत १९व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिशांनी प्रवेश केला. १९२० साली केनियाला crown colony म्हणून घोषित करण्यात आलं. १९४० मध्ये किकुयू लोकांनी मौ मौ नावाची चळवळ सुरु केली. त्यांनी हळूहळू ब्रिटिश अधिकारी आणि त्यांचे केनियन सहायक ह्यांना मारायला सुरुवात केली. त्यामुळे ऑक्टोबर १९५२ मध्ये गव्हर्नर एव्हलीन बेरिंग ह्याने आणीबाणी घोषित केली जी १९६० पर्यंत सुरूच राहिली!

 

keniya-inmarathi
wikipedia

१९६४ साली ब्रिटिशांनी कॉन्सन्ट्रेशन कॅम्पसची सुरवात केली. इतिहासकार म्हणतात जवळजवळ १.५ लाख ते १५ लाख लोक ह्या गुलाग्स मध्ये अत्यंत भीषण परिस्थितीत राहिली. त्यांना systematically torture करण्यात आलं, त्यांच्यावर वेळप्रसंगी लैंगिक अत्त्याचार सुद्धा करण्यात आले. त्यांच्यापैकीच एक होते बराक ओबामांचे आजोबा हुसेन ओंयांगो ओबामा! त्यांच्या नखांमध्ये pins घुसवण्यात आल्या होत्या.

२०१३ साली ब्रिटिश गव्हर्नमेंटने मौ मौ केस हाय कोर्टात सतत हरल्यानंतर settle करण्याचं ठरवलं! ५००० survivorsना प्रत्येकी ३८०० युरो देण्याचं घोषित करण्यात आलं. foreign सेक्रेटेरी विल्यम हेग यांनी पीडितांची जाहीर माफी मागितली!!!

ऑस्ट्रेलियावरील आक्रमण :

ऑस्ट्रेलिया हा कुणाचीही मालकी नसलेला भूखंड आहे असे कारण देऊन ब्रिटिशांनी १७८८ साली ऑस्ट्रेलियावर कब्जा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी जवळजवळ ७,५०,००० Aboriginal आणि Torres Strait Islander लोक त्या संपूर्ण खंडात राहत होते. १७८८ मध्ये सिडनीत आल्यानंतर केवळ १५ महिन्यातच जवळजवळ ५०% Aboriginal लोक हे small poxने मरण पावले.

 

Australia-inmarathi
wikipedia

आता हा काय निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही! १९२० पर्यंत अनेक हत्याकांड ब्रिटिशांनी केले. आजसुद्धा ह्या लोंकाना खूप हिणवणारी वागणूक मिळते. आज हे लोक पूर्ण लोकसंख्येच्या फक्त २.५% असूनही कारागृहातल्या संख्येच्या २८% आहेत.

भारतातील लूट आणि अमानवीय अत्त्याचार :

१८५८ साली भारताला crown colony म्हणून घोषित करण्यात आलं. ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे आपली संपत्ती लुटून नेली. उत्तर पूर्व बंगालमध्ये “जगातलं सर्वात पाहिलं deindustrialisation” ब्रिटिशांनी केलं. ब्रिटिशांच्या राज्यात १२ अत्यंत भीषण दुष्काळ भारताने बघितले. त्यात १२ ते २९ मिलियन ( १ मिलियन म्हणजे १० लाख … करा हिशोब!) लोक मरण पावल्याची नोंद आहे.

आपली textile इंडस्ट्री उद्ध्वस्त करून अनेक स्थानिक लोकांना ब्रिटिशांनी शेती करण्यास भाग पाडलं. त्यावेळचे विद्वान अर्थतज्ज्ञ असही म्हणाले कि मार्केटमुळे संतुलन राखणं सोप्प होईल आणि वाजवीपेक्षा जास्त लोकसंख्या वाढली कि निसर्ग अशी शिक्षा देत असतो. तळपायाची आग मस्तकात गेली ना!?

जगभरातील अत्याचाराचे अजून काही नमुने :

दक्षिण अफ्रिकेतल्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पस मध्ये हजारो Boer लोकांना डांबण्यात आलं होतं. १८४० मध्ये आयरिश पोटॅटो दुष्काळ पडला (पाडला गेला) त्यात १० लाखांच्या वर लोक मरण पावले! १९६० मध्ये Aden ह्या ठिकाणी torture centres अस्तित्वात होते जेथे राष्ट्रवादी लोकांना नागडं करून refrigerator cells मध्ये ठेवण्यात यायचं.

 

british-inmarathi
wikipedia

Archives लपवण्याचा / जाळण्याचा केविलवाणा प्रकार :

Warwick विद्यापीठातील इतिहासकार डेव्हिड अँडरसन ह्यांनी २०१० साली ब्रिटिश हाय कोर्टात एक स्टेटमेंट दाखल केलं, त्यात १५०० फाइल्स गायब झाल्याचं नमूद करण्यात आलं होत. त्यात केनियातील कारनाम्यांचा record होता!
ब्रिटिश गव्हर्नमेंटने उत्तर लंडनमधील हाय security फॅसिलिटी येथे त्या फाइल्स लपवल्या होत्या.

 

atrocity-inmarathi
wikipedia

foreign office आणि commonwealth office यांनी जवळजवळ ६,००,००० फाइल्स लपवून ठेवल्या होत्या. जेव्हा केनियातील २ अत्यंत वृद्ध गृहस्थांनी ब्रिटिश वसाहतीत त्यांच्यावर अमानुष अत्त्याचार करण्यात आले अशी केस ब्रिटिश सरकारविरुद्ध केली तेव्हा वरील माहिती इतिहासकार अँडरसन यांनी कोर्टात उघड केली.

इतके सगळे documents उपलब्ध असताना ज्या लोकांना ब्रिटिशांनी आपल्या इथे येऊन आपल्यावर उपकारच केले असं वाटतं, आपल्याला रेल्वे, विज्ञान, मुक्ती दिली असं वाटतं ते लोक धन्य होत…..!
परमेश्वर अशा लोकांना ह्या जन्मातच सद्बुद्धी देवो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “ब्रिटिशांनी केलेल्या अमानवी अन्यायाच्या अज्ञात बाजू : छळछावण्या, लूट आणि मानवी व्यापार

 • March 25, 2018 at 1:51 pm
  Permalink

  काय मुर्ख पणाचा लेख आहे हा!.. एकतर हा लेखक मुर्ख आहे किंवा तो वाचकांना मूर्ख समजतो….प्रस्तुत लेखात म्हटल्या प्रमाणे ब्रिटीशांनी concentration camp चाशोध १९६४ मध्ये लावला तर दुसरे महायुध्द ७०-७५ च्या काळात झाले होते काय….काहीतरी अभ्यास करून लिहत चला….फेबु(कू) गिरी सोडा.

  Reply
  • March 26, 2018 at 11:10 am
   Permalink

   केनियातला camp 1964 साली सुरु केला असं ते वाक्य आहे!
   ब्रिटीशांनी 1900 ते 1902 साली campsचा उपयोग केलेल्याचे records आहेत!

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?