' पुरेसं पाणी मिळालं नाही तर शरीर देत असलेल्या या संकेतांकडे दुर्लक्ष केलंत तर कल्पनेपलिकडील नुकसान होईल!

पुरेसं पाणी मिळालं नाही तर शरीर देत असलेल्या या संकेतांकडे दुर्लक्ष केलंत तर कल्पनेपलिकडील नुकसान होईल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

हे तर आपल्या सर्वांना माहित आहे अन्नाविना मनुष्य जवळपास २० दिवस जगू शकतो. पण पाण्याविना जास्तीत जास्त दोन ते तीन दिवस राहू शकतो. तर अमेरिकेच्या एका विद्यापीठातील बायोलॉजीचे प्राध्यापक रेंडल के पॅकर ह्यांच्या मते, उन्हाळ्याच्या दिवसांत एका बंद कारमध्ये असलेलं लहान मुल किंवा उन्हात खेळत असलेला एखादा अॅथलीट ह्यांना जर पाणी मिळाले नाही तर काही तासांत देखील त्यांचा जीव जाऊ शकतो.

sports person InMarathi

आणि ह्याचं कारण म्हणजे डी-हायड्रेशन. म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता होणे.

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्विसनुसार डी-हायड्रेशन ही एक अशी अवस्था आहे, जेव्हा आपल्या शरीराला पाण्याची जेव्हढी गरज असते तेवढे त्याला मिळत नाही. लहान मुलं आणि वृद्ध लोकांना डी-हायड्रेशन चा सर्वात जास्त धोका असतो.

dehydration InMarathi

आता जाणून घेऊ शरीरात पाण्याची कमी झाल्यावर शरीर कश्याप्रकारे कार्य करते…

 • शरीरात पाण्याची कमतरता झाली म्हणजे सर्वात आधी तोंड सुकू लागते, तहान लागायला लागते. हे आहे डी-हायड्रेशनचे पहिले लक्षण.dehydration 1 InMarathi
 • ह्यानंतरचे लक्षण म्हणजे लघवीचा रंग गडद होणे, त्याला दुर्गंधी येणे. डॉक्टरांनुसार असे ह्यामुळे होते, कारण शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तातील साखर आणि मीठ ह्यांचातील संतुलन बिघडते.Salt-Vs-Sugar InMarathi
 • पाणी पिले नाही तर काही तासांनी तुम्हाला थकवा जाणवू लागतो. आणि जर अश्या स्थितीत असलेलं एखादं मुलं रडलं तर त्याच्या डोळ्यातून पाणी येणं देखील थांबत.
 • त्यानंतरच्या काही तासांत लघवी येण्याची मात्रा अगदीच कमी होऊन जाते. काही लोकांना तर चक्कर येणे आणि डोळ्यांना थकवा जाणवणे अश्या समस्या उद्भवतात.dehydration 2 InMarathi
 • दुसऱ्या दिवशी शरीर तोंडात अधिक थुंकी बनविण्याचा प्रयत्न करू लागतं. ओठं सुकायला लागतात आणि डोळे देखील दुखायला लागतात.
 • खूप जास्त झोप येते. शरीर कुठल्याही परिस्थितीत शरीरातील पाणी वाचविण्याचा प्रयत्न करत असते.
 • मधुमेह किंवा ज्यांना हृदयासंबंधित आजार असतात त्यांच्यात ही लक्षण जास्त लवकर दिसून येतात. तसेच मद्यपान करणाऱ्या आणि ३८ डिग्री हून अधिक तापमानात काम करणाऱ्या लोकांना देखील ह्या समस्या जाणवतात.dehydration 3 InMarathi
 • पाण्याविना दुसऱ्या दिवसाच्या शेवटपर्यंत लघवीत जवळपास ८ तासांचे अंतर होऊन जाते. पल्सरेट वाढून जातो. त्वचेवरील पाण्याची कमतरता दिसायला लागते. नीट दिसत नाही.
 • अशक्तपणा एवढा वाढतो की, सरळ उभं राहणे देखील अवघड होते. हात-पाय थंड पडतात.
 • ही स्थिती अतिशय धोकादायक असते. ह्यामुळे कुणाचा जीव देखील जाऊ शकतो. त्या व्यक्तीला जरी उपचार उपलब्ध झाला तरी देखील त्या व्यक्तीला वाचवणे डॉक्टरांसाठी एवढ सोप्पे नसते.dehydration 4 InMarathi

त्यामुळे पाणी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर देखील सांगतात की, शरीराला पाण्याची नितांत गरज असते त्यामुळे खूप पाणी प्या.

 

Dehydration-inmarathi
s3.india.com

त्याचप्रमाणे जेवढी गरज आपल्याला पाणी पिण्याची आहे तेवढीच गरज पाणी वाचविण्याची देखील आहे. काही दिवसांआधी अश्या ११ शहरांचीची यादी जाहीर करण्यात आली होती ज्यांच्याकडे पाणी अतिशय कमी प्रमाणात शिल्लक आहे. ह्यात दक्षिण भारतातील बंगळूरू शहराचे देखील नावं होते.

तर यूएनच्या एका अंदाजानुसार वर्ष २०३० पर्यंत पाण्याची डिमांड ही ४० टक्क्यांनी वाढणार आहे. पुरेसं पाणी जेव्हा शरीराला मिळत नाही तेव्हा काय परिस्थिती उद्भवते हे जाणून घेतले तरी लक्षात येईल की पाण्याचं नियोजित व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे.

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “पुरेसं पाणी मिळालं नाही तर शरीर देत असलेल्या या संकेतांकडे दुर्लक्ष केलंत तर कल्पनेपलिकडील नुकसान होईल!

 • March 25, 2018 at 3:24 pm
  Permalink

  किमान पाणी पिण्याची जेव्हढी गरज आहे तेव्हढीच गरज पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होण्याची सुध्दा आहे . कुणी आरो च पाणी प्यावे म्हणतात . कुणी ते घातक आहे असे म्हणतात . कित्येक देशात आरो वर बंदी आहे असे ही म्हणतात . कुणालाही नाव न ठेवता खरे काय हे किमान आरोग्य विभागाने तरी प्रबोधन करावे पण नाहि . कारण शुद्ध पाणी कसे उपलब्ध करून द्यावे यावर त्यांचे विचारमंथन चालु आहे असे म्हणे !

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?