'वाय-फाय पेक्षा शंभर पट वेगवान असलेले तंत्रज्ञान 'लाय-फाय' नक्की काय आहे? जाणून घ्या..

वाय-फाय पेक्षा शंभर पट वेगवान असलेले तंत्रज्ञान ‘लाय-फाय’ नक्की काय आहे? जाणून घ्या..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

स्मार्टफोन आणि इंटरनेट आजकाल माणसाच्या जीवनाचा एक भाग बनलेला आहे. इंटरनेटने आज संपूर्ण जग एकमेकांशी जोडले गेलेले आहे. त्यामुळे हाय – स्पीड इंटरनेट वापरणे सर्वच लोकांना पसंत असते. पहिल्यांदा फक्त इंटरनेटची २ जी स्पीड मोबाईल नेटवर्क्स लोकांना देत होते. पण काही काळाने त्यात अजून बदल झाले आणि त्यानंतर ३ जी आणि आता सध्या ४ जी आले आहे.

 

Internet-speed-of-India.Inmarathi3
fonearena.com

पण तरीही नेटवर्कच्या समस्येमुळे मोबाईल कंपन्या ह्या तेवढा इंटरनेटच स्पीड देण्यास असमर्थ ठरतात, जेवढ्या इंटरनेट स्पीडची अपेक्षा लोकांना नेटवर्ककडून असते. त्यामुळे आजकाल सगळीकडेच वाय – फाय सुविधा देण्यात आलेली आहे. घरामध्ये – ऑफिसमध्ये, आता तर रेल्वे स्टेशनवर देखील आपल्याला वाय – फाय सुविधा मिळते.

वाय – फायची इंटरनेट स्पीड ही मोबाईल डेटाच्या इंटरनेटपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. त्यामुळे वाय – फायची सुविधा लोकांना खूप पसंत असते. फक्त त्यामध्ये एकच समस्या असते की, प्रत्येक ठिकाणी वाय – फायची सुविधा आपल्या मिळेलच याची काही खात्री नसते.

पण आता वाय – फायपेक्षा देखील जास्त स्पीड देणारी सुविधा आपल्या भेटीला येणार आहे. जी वाय – फायपेक्षा १०० पटीने आपल्याला जलद इंटरनेट सुविधा पुरवेल. या सुविधेला लाय – फाय असे म्हटले जाते आहे.

 

LiFi Technology.Inmarathi
circuitdigest.com

लाइट फिडेलिटी किंवा लाय – फाय एक व्हिजिबल लाईट कम्युनिकेशन्स (VLC) प्रणाली आहे. जी अत्यंत उच्च गतीवर प्रवास करणारे वायरलेस संप्रेषण चालवते. लाय – फाय सामान्य घरगुती एलईडी (प्रकाश उत्सर्जन डायोड ) बल्बचा वापर करते, ज्याच्या मदतीने डेटा ट्रान्सफर करणे शक्य होते. ज्याच्यामुळे प्रतिसेकंद २२४ गेगाबाईट्सने वेग वाढू शकतो.

२०११ मध्ये स्कॉटलंडमधील एडिनबर्ग युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ हेरॉल्ड हास यांनी लाय – फायचे संशोधन केले आहे. वायरपेक्षा एलईडी प्रकाशाच्या माध्यमातून नेटवर्कचा वेग हा जास्त असतो, हे त्यांना आढळून आले. लाय – फाय या तंत्रज्ञानाचा खरा शोध हा २०११ पूर्वीच लागला होता. पण त्यावेळी अपेक्षित वेग साध्य करता आला नाही.

 

LiFi Technology.Inmarathi1
innovationandtech.ae

लाय – फाय हे कसे काम करते ?

जसे सर्व इंटरनेट डिव्हाइस काम करतात, तसेच लाय – फाय देखील काम करतो. या लाय – फायमध्ये मुख्य रुपात तीन कम्पोनंट्सचा वापर केला जातो.

१. लॅम्प ड्रायव्हर

२. एलईडी लॅम्प

३. फोटो डिटेक्टर

या तिन्ही कम्पोनंट्स बरोबरच तुम्हाला अजून एक कनेक्शन पाहिजे, ज्याला आपण इंटरनेट म्हणतो. हे आपण पहिलेच आहे की, हे लाईट्सच्या माध्यमातून डेटा ट्रान्समिशन करते. एलईडी बल्बचे काही वैशिष्ट्ये आहेत. एलईडी बल्बमध्ये प्रकाश उत्सर्जित करणारा डायोड आणि स्वयंप्रकाशी घटक असल्याकारणाने लाय – फायसाठी हे एकदम योग्य घटक आहेत. लाय – फायसाठी हाय – स्पीड डेटा रेटची आवश्यकता असते आणि एलईडी बल्बमध्ये डेटा लाईटच्या स्पीडने ट्रान्समिट होतात. या एलईडी बल्बमध्ये लाईट इंटेनसिटी खूप जलद गतीने बदलते. लाईट कधी चालू होते तर कधी बंद होते.

 

LiFi Technology.Inmarathi2
whsgoldenarrow.com

माणसांचे डोळे या लाईटच्या ऑन आणि ऑफला कधीही पाहू शकत नाहीत. पण फोटो डिक्टेटरला हे सर्व दिसते. या सर्व कारणांमुळे एलईडी बल्ब हे सर्वात चांगले आहेत. त्यामुळे आपल्याला अजून जलद गतीने हे सुविधा पुरवू शकते. लाय – फाय या तंत्रज्ञानाचा सध्या रशिया, फ्रान्स, इंग्लंड या देशांमध्ये केला जातो. मेक इन इंडियाची संकल्पना लक्षात घेता, भारतात हे तंत्रज्ञान वापरण्यावर भर देण्यात येत आहे.

या लाय – फायच्या माध्यमातून तुम्ही विचार देखील केला नसेल, एवढ्या वेगाने माहिती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवता येते आणि इंटरनेट सुविधा वापरता येते.

अशी ही लाय – फाय सुविधा वाय – फायला मागे टाकून इंटरनेट जगतामध्ये एक मोठा बदल घडवून आणू शकते आणि लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे इंटरनेट स्पीडचा लाभ घेता येऊ शकतो. हे तंत्र लवकरच भारतात येईल, अशी आपण आशा करूया.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?