' अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा निर्दयी व्यावहारिक चेहरा : हेन्री किसिंजर – InMarathi

अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा निर्दयी व्यावहारिक चेहरा : हेन्री किसिंजर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक: पुष्कर देशमुख

===

एखाद्या व्यक्तीच्या सौँदर्याची भुरळ पडण्याचे दाखले आपल्याला इतिहासात बऱ्याचदा पहायला मिळतात पण बुद्दीमत्तेची भुरळ पडणे ह्याला वेगळेपण असावं लागतं असं माझं वैयक्तीक मत आहे.

१९२३ साली जर्मनी मधे ज्यू समाजात जन्माला आलेल्या ह्या व्यक्तीचे कुटुंब नाझी सरकारच्या अन्यायापासून स्वतःचा बचाव करण्याकरता जर्मनी सोडून पळून गेले.

आणि त्यानंतर १९७३ साली ह्या व्यक्तीला विएतनाम युद्ध रोखण्यात बजावलेल्या भूमिकेबद्दल शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला, हेन्री किसिंजर त्याच नाव.

स्वतःचा जन्म ज्या देशात झाला त्याच देशाने आपल्या समाजावर इतका अन्याय करावा हे कुणाच्याही मनात तेढ निर्माण करणारंच आहे, आणि तसं पाहता ज्यू लोकांवर झालेल्या अन्यायाच्या बऱ्याच कथा आजही वाचायला मिळतात.

गरीबी मुळे घराला हातभार लावण्याकरिता हेन्री एका कारखान्यात कामाला लागला आणी त्याच वेळी George Washington High School मधे त्याने नोंदणी केली होती. १९४० साली पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर हेन्रीने Accountant होण्याची तयारी सुरू केली आणी त्यावेळी दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं.

१९४३ साली अमेरिकेचं नागरिकत्व प्राप्त होताच त्याला अमेरिकन सैन्याकडून जर्मन सैन्या विरुद्ध लढण्यासाठी सहभागी करून घेण्यात आले.

ज्यांच्या अन्यायापासून बचाव करण्यासाठी जर्मनी सोडले होते आज त्याच जुलमी सरकार विरुद्ध लढण्यासाठी हेन्री उभा राहिला होता. फ्रांस मधे असताना युद्धात राइफलमनची भूमिका त्याने पार पाडली आणि जर्मनी मधे इंटेलिजेन्स अधिकारी म्हणून त्याने काम पाहिले.

 

henry-kissinger-inmarathi
thetimes.co.uk

 

युद्धाच्या ह्या काळात Accountant बनण्याचा विचार एव्हाना हेन्रीने डोक्यातून काढून टाकला होता आणि आता त्याने राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा तोच निर्णय अमेरिकन राजकारणात परराष्ट्र धोरणाबाबतचा एक नवा आयाम ठरला.

१९५० साली राज्यशस्त्राचा शिक्षण पूर्ण झाल्यावर Harward मधेच राहून शासन विभागात Ph.D करण्याचा निर्णय हेन्री ने घेतला. त्याच्या Ph.D च्या शोध प्रबंधाचं नाव होतं A World Restored: Metternich, Castlereagh and the Problems of Peace, 1812-1822.

किसिंजरच्या धोरणात ऑस्ट्रियाच्या क्लेमेँस वॉन मेटरनीच आणि जर्मनीचा पाहिला चान्सेलर ऑट्टो वॉन बिस्मार्क चा प्रभाव दिसून येत असे.

१९५४ साली शिक्षण पूर्ण झाल्यावर Harward विद्यापीठाच्या शासन विभागात नोकरी करण्याचा पर्याय किसिंजरने स्वीकारला आणि त्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात येण्याची पहिली संधी त्याला मिळली. १९५७ साली लिहिलेल्या ऐइसेनहोवरच्या सोविएत यूनियन विरुध्दच्या धोरणाला विरोध करणाऱ्या ज्याचं नाव होतं Nuclear Weapons And Foreign Policy.

Harward विद्यापीठात कार्यरत असताना किसिंजर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष John F. kennedy आणी Lyndon B. Johnson चा परराष्ट्रीय धोरणात सल्लागार म्हणून पण काम करत असे.

१९६९ साली Richard Nixon राष्ट्राध्यक्ष झाल्यावर हेन्री किसिंजरची अमेरिकेचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आणि १९७५ साली त्याने राज्याचा सचिव म्हणून देखील काम पाहिलं ज्याला अमेरिकेत Secretary of State असा संबोधतात.

 

Henry-Kissinger-Senate-Hearing-inmarathi
pictures.zimbio.com

 

आपल्या बुद्दीमत्तेच्या आणि मुत्सद्दीपणाच्या जोरावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारच्या कारकिर्दीत त्याने जगाला त्याची दखल घ्यायला लावली. त्यावेळी अमेरिका विएतनाम युद्धात गुंतलेली होती. अमेरिकेचा विएतनाम युद्धातला सहभाग अत्यंत क्लिष्ट मुद्दा आहे.

Communist धार्जिणे उत्तरी विएतनामच्या ताब्यात दक्षिण विएतनाम जाऊ नये ह्या हेतूने अमेरिका युद्धात उतरले हा दावा त्यातल्या त्यात खरा वाटतो, ज्यासाठी परराष्ट्र संबंधात वापरल्या जाणाऱ्या Domino Theory चा संदर्भ दिला जातो.

पण त्याचवेळी Gulf of Tonkin नावाची घटना ही अमेरिकेला युद्धात उतरायला कारणीभूत ठरली अस म्हंटलं
गेलं. तो युद्धात सामील होण्यासाठी रचलेला खोटा प्रकार होता असे म्हणतात. व्हिएतनाम युद्ध ही किसिंजरच्या राष्ट्रीय धोरणाची खरी परीक्षा होती कारण त्यावेळी युद्धाचं स्वरूप हे प्रचंड भीषण झालं होतं.

सन्मानासह शांतता ज्याला “Peace with Honor” असं ज्याला म्हणतात ते प्राप्त करण्यासाठी किसिंजरने बऱ्याच मार्गांचा अवलम्ब केला ज्यामुळे ह्या युद्धात २२००० अमेरिकी सैनिकांना आपला जीव गमवावा लागला.

Defense Casualty Analysis System च्या The Vietnam Extract Data File नुसार मृत अमेरिकन सैनिकांची संख्या ५८,२२० आहे आणि विएतनामी लोकांची मृतसंख्या तर अगणित सांगितली जाते.

अखेर १९७३ साली उत्तर विएतनामच्या Le Duc Tho आणि किसिंजरमधे युद्धबंदीचा करार झाला ज्यासाठी त्या दोघांना त्यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. पण विएतनामच्या Duc ने त्याचा संपूर्ण हक्क्दार किसिंजरला सांगत तो नाकारला.

नोबेल मिळाला असला तरी किसिंजरची विएतनाम युद्धातली भूमिका ही प्रचंड वादग्रस्त ठरली. त्याला कारण होतं त्याचा “Peace with Honor” चा आग्रह, ज्यासाठी तब्बल ४ वर्ष कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला.

त्यानंतर त्याने कंबोडिया देशात Communist Party of Kampuchea चा नेता Khmer Rouge ची राजवट आणण्यासाठी गुप्तपणे बॉम्बफेकीचा कार्यक्रम राबवला ज्याच स्वरूप प्रचंड विध्वंसक होता.

१९७१ च्या काळात हेन्रीने Nixon च्या भेटीपूर्वी दोन वेळा चीनचा गुप्त दौरा केला. चीन आणी अमेरिका संबंधात सुधार आणण्यातही त्याची भूमिका फार महत्वाची बोलली जाते.

शीतयुद्धाच्या काळात झालेल्या Strategic Arms Limitation Treaty आणी Anti-Ballistic Missile Treaty ह्या दोन्ही वाटाघाटीचे श्रेय हेन्री किसिंजरला जातं ज्यामुळे त्यावेळच्या दोन महासत्तेमधला तणाव थोडाफार कमी व्हायला मदत झाली.

 

anti-ballystic-inmarathi
amedia.britannica.com

 

ऑक्टोबर १९७३ मध्ये ईस्राइल आणि ईजिप्त दरम्यान होऊ घातलेल्या Yom Kippur युद्ध रोखण्यात हेन्रीचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा होता.

१९७१ साली बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढल्या गेलेल्या युद्धात भारताचा सहभाग अमेरिकेला पटला नव्हता आणि त्यावेळी किसिंजरने पंतप्रधान इंदिरा गाँधी बद्दल अत्यंत वाईट शब्दाचा वापर केला होता. त्यांच्या रागाचं कारण भारत आणि कम्यूनिस्ट विचारसरणीच्या सोविएत रशिया मधली त्यावेळची वाढती जवळीक होती.

हुशार माणसा भोवती बऱ्याच वेळी वादाचं वलय असतं. ह्याची उदाहरणे जगाच्या इतिहास आणि राजकारणात खूप पहायला मिळतात आणी त्यातच हेन्रीचं नाव समाविष्ट होतं.

चिली मधे झालेल्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकी मधे Chilean Socialist Party चा Salvador Allende ह्याची निवड ही अमेरिकेला न झेपणारी होती. कारण होतं त्याचा Cuba च्या राजकारणाप्रति असलेला झुकतं माप, आणी त्यानंतर सत्तेत येताच चिली मधील अमेरिकन उद्योगाचं त्याने केलेलं राष्ट्रीयकरण.

अमेरिकेने Allende ची सत्ता उलटवण्याचे बरेच प्रयत्न केले. त्यासाठी सैन्याच्या उठावासाठी त्यांनी Central Intelligence Agency चा चिली मधे वापर केला आणी अशाच एका उठावा दरम्यान १९७३ साली Allende चा म्रुत्यू झाला.

त्यानंतर तो राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्तेवर आला. Augusto Pinochet जो त्या उठावावेळी चिली चा Army Commander-in-Chief होता.

त्यानंतर २००० साली CIA ने जारी केलेल्या CIA Activities in Chilie ह्या कागदपत्रावरून १९७३ साली झालेल्या सैन्य उठावात अमेरिकेने CIA च्या माध्यमातून पाठींबा दिल्याचं स्पष्ट झालं.

आरोपांची सुई किसिंजर वर आली. नंतर च्या काही वर्षात म्हणजे १९७६ साली Pinnochet चा राजकीय विरोधक असलेल्या Orlando Letelier ची Washington D. C. ची एक कार बॉम्बस्फोटात हत्या झाली. ह्या घटने मधे Pinochet आणी किसिंजरचा सहभाग असल्याचे आरोप झाले.

 

Henry Kissinger And Charlie Rose Mark The 70th Anniversary Of VE Day
s-i.huffpost.com

 

तसा पाहता हा अत्यंत व्यापक विषय आहे. Christopher Hitchens ह्यांनी The Trial of Henry Kissinger नावाने ह्यावर लिखाण केलं आहे आणि ह्याच नावाने माहितीपट देखील उपलब्ध आहे. १९७७ साली Gerald Ford राष्ट्राध्यक्ष असताना किसिंजर Secretary of State ह्या पदाहून खाली उतरला तरी नंतरच्या काळात अमेरिकन परराष्ट्र धोरणात झालेल्या घडामोडीत किसिंजरचा सहभाग हा कायम राहिला.

अतिशय मुत्सद्दी स्वभावाचा ह्या माणसाने निर्दयी व्यवहारिक धोरणाचा वापर करत परराष्ट्र धोरणात एक वेगळा आयाम रचला.

ज्यासाठी त्याला बरेच सन्मान मिळाले आणी बऱ्याचदा टीकांना सामोरे जावे लागले. भविष्यात जेव्हा कधी परराष्ट्र धोरण आणि अंतरराष्ट्रीय राजकारण हा विषय अभ्यासला जाईल त्यावेळी कदाचितच कुणी HENRY KISSINGER ह्या माणसाला डावलण्याची चूक करेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?