' साला मैं तो ‘President’ बन गया: Donald Trump च्या निवडणुक विजयाचा प्रवास – InMarathi

साला मैं तो ‘President’ बन गया: Donald Trump च्या निवडणुक विजयाचा प्रवास

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचा गाडा आता कोण हाकणार या प्रश्नाच उत्तर अखेर जाहीर झालंय… ज्या निवडणुकीकडे अवघ्या जागाच लक्ष लागलेलं होत त्या निवडणुकीची अनपेक्षित निकालाने सांगता झाली असे म्हटले तर वावगे ठरू नये.

america-election-2016-marathipizza01

स्रोत

ही निवडणूक फक्त हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प या दोन राजकारण्यांमधील नव्हती तर ही निवडणूक होती संपूर्णत: विरोधी मतप्रवाह असलेल्या गटांची…आणि त्यात बाजी मारली जहाल विचारधारेने अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांनी..

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी २७० जागांची मॅजीक फिगर गाठणे आवश्यक आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ५,८१,५३,७९१ मतांसह २७६ जागांवर विजय मिळवत अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान पटकावला तर हिलरी क्लिंटन यांना ५,७६,९४,३३७ मतांसह फक्त २१८ जागांवरच विजय मिळवता आला.

रिपब्लिकन पार्टीच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वीच “आपला भरघोस मतांनी विजय होणार” हे जाहीरच करून टाकले होते. तरी मध्यंतरी त्यांच्या विरोधात काही वादळे उठल्यामुळे त्यांना हा फाजील आत्मविश्वास नडतो की काय असे वाटत होते, पण त्यावरही मात करत अमेरिकन जनतेच्या साथीने ते अध्यक्षपदावर विराजमान झालेच!

america-election-2016-marathipizza02

स्रोत

फ्लोरिडा, ओहियो, इओवा, नॉर्थ कॅरीलोना आणि विसकॉन्सीन या राज्यांमध्ये प्रचंड बहुमताने विजयश्री ट्रम्प यांच्या गळ्यात पडली. तसेच मिशिगन आणि न्यू हॅम्पशायर या राज्यांमध्ये देखील त्यांनी क्लिंटन यांना पिछाडीवर टाकले. दोन्ही उमेदवारांनी त्यांच्या पाठीशी असणाऱ्या राज्यांमध्ये अपेक्षित विजय मिळवला.

साउथ आणि मिडवेस्ट अमेरिकेतील राज्यांमध्ये ट्रम्प याचं तर इस्ट कोस्ट आणि मिडवेस्ट मधील इलीनॉयज या महत्वपूर्ण राज्यामध्ये हिलरी क्लिंटन याचं वर्चस्व दिसून आलं. या निर्णायक लढाईत हिलरी क्लिंटन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना कांटे कि टक्कर दिली खरी, पण ट्रम्प यांना मॅजीक फिगर गाठण्यापासून मात्र त्या रोखू शकल्या नाहीत.

untitled-bmp

 स्रोत

डोनाल्ड ट्रम्प सुरुवातीपासूनच आघाडीवर आहेत हे पाहताच ट्रम्प समर्थकांनी तर निकालापूर्वीच विजयाचा जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली होती. वॉशिंग्टन डी.सी. मधील ट्रम्प यांच्या नवीन हॉटेल बाहेरचा सगळा परिसर LOCK HER UP (ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारातील एक घोषवाक्य) आणि USA..USA..USA.. च्या घोषणांनी अक्षरश: निनादून गेला होता.

Supporters of Republican presidential candidate Donald Trump cheer as they watch election returns during an election night rally, Tuesday, Nov. 8, 2016, in New York. (AP Photo/ Evan Vucci)

स्रोत

अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये डोनाल्ड ट्रम्प नामक अमेरिकन बिझनेसमॅनच्या विजयामुळे सावळा गोंधळ उडाला आहे. हा व्यक्ती जिंकल्याने अमेरिकेच्या अर्थकारणावर अनिश्चिततेचं सावट निर्माण होईल अस जाणकारांच मत आहे.

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यास ती अमेरिकेसाठी सर्वात दुर्दैवी घटना ठरेल असे मत अनेकांनी व्यक्त केले होते, ज्याला कारण होते ट्रम्प यांची जहाल आणि कट्टर विचारसरणी.

आता ट्रम्प याच विचारसरणीने कारभार चालविणार की फक्त विजयासाठी त्यांनी वापरलेली ते ‘ट्रम्प’ कार्ड होते किंवा सरकार चालवण्यासाठी अजून नव्या कोणत्या युक्त्या ते लढवतील या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 36 posts and counting.See all posts by vishal

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?