ही आहेत भारतातली सर्वात जलद इंटरनेट असलेली शहरे : तुमचे शहर कितव्या स्थानावर? जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आजकाल फोन आणि इंटरनेट ही माणसाची जणू एक मुलभूत गरजच बनलेली आहे. इंटरनेटशिवाय जगण्याचा ते आता विचार देखील करू शकत नाही. तरुण पिढीमध्ये याची क्रेज जरा जास्तच आहे. इंटरनेटमुळे आज आपण जगाशी जोडले गेलेले आहोत.

इंटरनेटमुळे घरबसल्या आपण दूरवर असलेल्या आपल्या नातेवाईकांशी किंवा आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधू शकतो, तसेच त्यांच्याशी व्हिडीओ कॉलिंगद्वारे फेस टू फेस चॅट करू शकतो.

इंटरनेटवर आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती सहज उपलब्ध होते.

 

Internet speed of India.Inmarathi
addons.click

इंटरनेट आता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे, असे म्हटले तर त्यात काहीच चुकीचे नाही. प्रत्येकजण आपपल्या गरजेनुसार या इंटरनेटचा वापर करत असतो. काहीजण कमी प्रमाणात इंटरनेटचा वापर करतात, तर काहीजण खूप मोठ्या प्रमाणावर इंटरनेट वापरतात.

पण कधी – कधी आपल्या हे लक्षात येते की, काही ठिकाणी आपल्या इंटरनेटला चांगली स्पीड मिळते, तर काही ठिकाणी खूप खराब स्पीड मिळते.

वाय – फायच्या बाबतीत देखील असेच काहीसे होते असल्याचे आपल्याला दिसून येते. आपला भारत देश आजच्या क्षणाला खूप मोठ्या डिजिटल क्रांतीतून जात आहे. इंटरनेट वापरकर्त्यांची प्रचंड संख्या असलेला आपला भारत जगातील सर्वात जास्त इंटरनेट वापरणाऱ्या देशांपैकी एक देश आहे.

त्यामुळे एवढ्या जास्त इंटरनेट वापरकर्त्यांना इंटरनेटची उत्तम गती मिळवून देणे सोपे नसले, तरी देखील भारताने यामध्ये एक मोठी प्रगती करून दाखवली आहे.

 

Internet speed of India.Inmarathi1
gadgetsnow.com

इंटरनेटची स्पीड टेस्ट करणाऱ्या ओकलानुसार, भारताचा इंटरनेटच्या स्पीडच्या बाबतीत जगामध्ये इतर देशांच्या तुलनेत ६७ वा क्रमांक लागतो. फेब्रुवारीच्या फिक्सड ब्रॉडबॅन्ड स्पीडच्या सहाय्याने हा आकडा काढण्यात आला.

एका महिन्यामध्ये भारत हा इंटरनेट स्पीडच्या बाबतीत दोन स्थानांनी वाढली आहे. तसेच, दुसरीकडे मोबाइल डेटाच्या बाबतीत एका महिन्यात भारताने ३ स्थानांनी वाढ दर्शवली आहे आणि सध्या भारत मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत १०९ व्या स्थानावर आहे.

भारतातील सरासरी फिक्सड ब्रॉडबॅन्ड डाउनलोड स्पीड ही २०.२७ एमबीपीएस (एमबी/प्रती सेकंद) आहे आणि मोबाईलच्या इंटरनेटची स्पीड ९.०१ एमबी/ प्रतिसेकंद एवढी आहे.

या अग्रगण्य स्पीड टेस्ट कंपनीने भारतातील राज्य आणि शहरांनुसार त्यांच्या इंटरनेट स्पीडचा डेटा देखील जाहीर केला आहे. जर आपण संपूर्ण भारतातील फिक्सड ब्रॉडबॅन्ड स्पीडबद्दल विचार केला तर आपल्या हे लक्षात येईल की, यामध्ये भारताचे दक्षिणी राज्ये आघाडीवर आहेत.

 

Internet speed of India.Inmarathi2
rvcj.com

ओकला कंपनीच्या रिपोर्टनुसार, चेन्नईमध्ये इतर राज्यांपेक्षा सरासरी सर्वात जास्त डाउनलोडिंग स्पीड आहे.

चेन्नईमध्ये ३२.६७ एमबी/ प्रती सेकंद एवढी स्पीड आहे, तर पटनामध्ये सर्वात कमी म्हणजेच ७.८० एमबी/ प्रतिसेकंद एवढी स्पीड आहे. तर मुंबईमध्ये १७.१ एमबी / प्रतिसेकंद एवढी स्पीड आहे.

इंटरनेटच्या स्पीडच्या बाबतीत दक्षिणेकडील बंगळुरू हे शहर दुसऱ्या तर हैदराबाद हे शहर तिसऱ्या स्थानावर आहे.

तसेच, दिल्लीचा या बाबतीत पाचवा क्रमांक लागतो. यामध्ये टॉप पाचपैकी चार शहर दक्षिण भारतातील आहेत, तर फक्त एक शहर उत्तर भारतातील आहे. मुंबईला या यादीमध्ये टॉप पाचमध्ये स्थान मिळत नाही.

 

Internet-speed-of-India.Inmarathi3
fonearena.com

इंटरनेट स्पीडच्या या यादीमध्ये मुंबईचा आठवा क्रमांक लागतो. तर पंजाबला ओकलाने जाहीर केलेल्या या वीस शहरांच्या यादीमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. यावरून आता तुम्हाला समजलेच असेल की, आपल्या मुंबईमध्ये कितीच्या स्पीडने इंटरनेट सुविधा पुरवली जाते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?