' तेव्हा त्यांच्याकडे घरभाडे देण्यासाठी पैसे नव्हते; आणि आज आहेत अब्जावधींचे मालक...

तेव्हा त्यांच्याकडे घरभाडे देण्यासाठी पैसे नव्हते; आणि आज आहेत अब्जावधींचे मालक…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

व्यवसाय करणे काही प्रत्येकालाच जमत नाही, व्यवसाय करण्यासाठी आत्मविश्वास, जिद्द, भांडवल यांच्याबरोबरच काही प्रमाणात नशिबाची साथ असणे देखील गरजेचे असते.

व्यवसाय करणे वाटते तितके सोपे नसते, व्यवसायात प्रत्येकवेळी नफाच होईल असे काही नसते. कधी – कधी मोठ्या तोट्याला किंवा व्यवसायामधील नवीन अडचणींना सामोरे जावे लागते.

पण तरीही त्या संकटाना सामोरे जाऊन यशस्वी होणे खूप गरजेचे असते. आपल्या भारतात देखील अशा कितीतरी कंपन्या आहेत, ज्या खूप कमी वेळामध्ये चांगल्याप्रकारे यशस्वी झालेल्या आहेत.

 

Airbnb Business Success.Inmarathi
businessnewsdaily.com

 

भारतातील बहुतेक यशस्वी स्टार्टअप कंपन्या कितीतरी विदेशी कंपनींच्या बिजनेस मॉडेलवर आधारित आहे. जसे, ओला कॅब्स अमेरिकन कॅब सर्व्हिस उबेरच्या मॉडेलवर आणि ओयो रूम्स हे Airbnb पासून प्रेरित आहे.

आज आपण ओयो प्रेरित असलेल्या याच एअरबीएनबी कंपनीच्या यशाबद्दल जाणून घेणार आहोत.

एअरबीएनबी या कंपनीचे फाऊंडर जो गेबिया आणि ब्रायन चेस्के यांची मैत्री ऱ्हॉड आयलँड स्कूल ऑफ डिझाइनमध्ये एकत्रित शिक्षण घेताना झाली. २००७ मध्ये हे दोघे न्यूयॉर्कमधून सॅन फ्रान्सिस्कोला शिफ्ट झाले होते.

नोकरी नसल्यामुळे हे दोघे ज्या ठिकाणी राहत होते, त्या तेथील फ्लॅटचे भाडे देखील देऊ शकत नव्हते. हे दोन्ही मित्र कोणत्याही प्रकारे फ्लॅटच्या भाड्याचे पैसे जमवण्याच्या प्रयत्नात होते.

 

Airbnb Business Success.Inmarathi1
forbes.com

 

त्या दिवसांमध्ये सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एक मोठ्या डिझाईन कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. या कॉन्फरन्समुळे शहरातील सर्व हॉटेल्स पूर्णपणे भरलेली होती. त्यावेळी जो गेबिया आणि ब्रायन चेस्के यांना यातूनच एक कल्पना सुचली.

त्यांच्या फ्लॅटमधील लिव्हिंग रूम खालीच राहत असे, तर त्यांनी विचार केला की, आपण त्याला भाड्याने फ्लॅट दिला तर आपलाच फायदा होईल. त्यानंतर शेवटी त्यांनी पटकन Airbed & breakfast.com नावाची एक वेबसाईट तयार केली आणि काही गाद्या खरेदी केल्या.

वेबसाईटवर त्यांनी लिहिले की, आम्ही रात्र घालवण्यासाठी जागा आणि सकाळी घरात बनवलेला नाश्ता देऊ. फक्त यात एवढेच एक आहे की, येथे गादी बेडवर नाहीतर जमिनीवर टाकलेली असेल आणि या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त ८० डॉलर खर्च करावे लागतील.

 

Airbnb Business Success.Inmarathi2
businessinsider.com

हे ही वाचा –

===

 

ही त्याची कल्पना चांगलीच चालली आणि त्याचे पहिले तीन ग्राहक संध्याकाळी फ्लॅटवर पोहोचले. ३० वर्षाचा एक भारतीय, ३५ वर्षीय बोस्टनची एक स्त्री आणि युटामधून एक ४५ वर्षाचा माणूस हे तीन त्यांचे पहिले ग्राहक बनले.

दुसऱ्यादिवशी सकाळी जेव्हा ते भाडे देऊन तिथून निघून गेले, तेव्हा या दोन्ही मित्रांच्या हे लक्षात आले की, या कल्पनेमध्ये नक्कीच दम आहे. पण त्यानंतर काही दिवसांपर्यंत कोणतीही खास प्रगती झाली नाही.

जो गेबिया आणि ब्रायन चेस्के यांनी आपला तिसरा मित्र आणि रूम पार्टनर नॅथन ब्लेचार्चजीकला या योजनेविषयी सांगितले. नॅथन ब्लेचार्चजीक हा एक जबरदस्त सोफ्टवेअर प्रोग्रामर होता आणि त्यांनी Airbnb.com नावाची एक नवीन वेबसाईट बनवली.

अशाप्रकारे जो गेबिया, ब्रायन चेस्के आणि नॅथन ब्लेचार्चजीकला हे तिघे एअरबीएनबीचे फाऊंडर बनले.

 

Airbnb Business Success.Inmarathi3
entrepreneur.com

 

त्यांनी अमेरिकेमध्ये होणारे मोठे उत्सव, कॉन्फरन्स, सेमिनार यांना टार्गेट केले आणि लोकल लोकांच्या खाली फ्लॅटस आणि प्रॉपर्टी यांची बुकिंग केली, ज्या ते या पर्यटकांना देऊ शकतील.

एअरबीएनबीसाठी एक मोठी संधी २००८ च्या उन्हाळ्याच्या काळामध्ये आली. डेन्व्हर शहरामध्ये Democratic National Convention होणार होता, ज्यामध्ये ८०००० लोक येण्याची शक्यता होती.

त्यांचे नशीब चांगले म्हणून दोन आठवड्यापूर्वीच त्यांची वेबसाईट बनून तयार झाली होती.

त्यांना माहित होते की, एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या माणसांसाठी हॉटेलमधील रूम्स कमी पडतील आणि नेमके तसेच झाले. एका आठवड्यामध्येच त्यांना ८०० पेक्षा जास्त लोकांची बुकिंग मिळाली.

पण Airbnb.com प्रसिद्ध तर होत होती, पण अजूनही हवा तेवढा नफा मिळत नव्हता. ही कंपनी चालवण्यासाठी ४०,००० डॉलर्सची गरज होती. एवढा पैसा कुठून जमा करावा, हीच मोठी समस्या त्यांच्या समोर आता होती.

 

Airbnb Business Success.Inmarathi4
hackernoon.com

 

त्यावेळी ब्रायन चेस्केला एक कल्पना सुचली. त्याने १ टन ब्रेकफास्ट सेरेल खरेदी केले आणि त्याला ५०० ग्रॅमच्या डब्यांमध्ये पॅक केले. त्या निवडणुकीच्या काळामध्ये त्याने Obama’s O’s आणि Cap’n McCain ब्रॅन्डच्या नावाने ४० डॉलर किंमतीने ते विकायला सुरुवात केली.

त्यांनी कितीतरी पत्रकारांना मोफत सेरेल पॅक पाठवले, ज्यांनी मिडियामध्ये या मजेदार प्रोडक्टविषयी चर्चा केली. ही त्याची कल्पना चांगले काम करून गेली आणि त्यांनी जवळपास ३०,००० डॉलर किंमतीचे ब्रेकफास्ट सेरेल विकले.

त्यानंतर एअरबीएनबी कंपनीचा खरा प्रवास सुरु झाला. २००९ मध्ये त्यांना एंजल इन्व्हेस्टर पॉल ग्रहमकडून २०००० डॉलरची पहिली फंडिंग मिळाली. पॉलमुळेच त्यांना पुढे ६००००० डॉलरची फंडिंग व्हेन्चर कॅपिटलिस्टकडून मिळाली.

त्यानंतर एअरबीएनबी खूप जलद गतीने पसरू लागली होती, पण अजूनही त्यांची खास कमाई होत नव्हती. आतापर्यंत एअरबीएनबी फक्त बुकिंगचे काम करत होती, पण आता त्यांनी भाड्यातील १५ टक्के चार्ज करायला सुरुवात केली. यामुळे एअरबीएनबी प्रॉफिटमध्ये आली.

 

Airbnb Business Success.Inmarathi5
qz.com

 

नोव्हेंबर २०१० मध्ये एअरबीएनबीमध्ये एका वेन्चर कॅपिटलिस्टने ७.२ मिलियन डॉलर्सची फंडिंग केली. हॉलीवूड अभिनेता अॅश्टन कुचरने देखील एअरबीएनबी चांगली मोठी रक्कम गुंतवली.

जुलै २०११ मध्ये वेन्चर फंडिंगने एअरबीएनबीने ११२ मिलियन फंडिंग एकत्रित केली. याच्यामुळे एअरबीएनबीची व्हॅल्यू १ बिलियन डॉलरपर्यंत पोहोचली.

आज Airbnb.com वर १९१ देशांच्या ६५,००० शहरांची ३०,००,००० पेक्षा जास्त प्रॉपर्टीची बुकिंग होते. २० कोटींपेक्षा जास्त लोकांनी एअरबीएनबीचीच्या सुविधेचा लाभ घेतला आहे.

एअरबीएनबीची आज एकूण व्हॅल्यू ३० बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास १९३६३५ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. कधी काळी ज्यांना स्वत: राहत असलेल्या फ्लॅटचे भाडे देणे देखील शक्य नव्हते, ते आज एवढी मोठी कंपनी चालवत आहेत आणि कितीतरी लोकांना भाड्याने जागा मिळवून देत आहेत.

 

हे ही वाचा –

===

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?