'पृथ्वीवर ऑक्सिजनची निर्मिती कधीपासून होऊ लागली? जाणून घ्या...

पृथ्वीवर ऑक्सिजनची निर्मिती कधीपासून होऊ लागली? जाणून घ्या…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

पृथ्वीवर ऑक्सिजन कधी बनायला सुरवात झाली असेलं. ह्यावर कित्येक वर्षांपासून वैज्ञानिकांत मतभेद सुरु आहेत. ह्याबाबतच आता एक आणखी माहिती समोर आली आहे. जी इतर सर्व दाव्यांना चूक ठरवू शकते. लंडन येथे झालेल्या एका नव्या रिसर्च मध्ये असे समोर आले आहे की, जवळपास ३.६ अरब वर्षांआधी प्रकाश संस्लेषणमुळे अनेक सूक्ष्म जीवाणूंनी ऑक्सिजनची निर्मिती करण्यास सुरवात केली. पृथ्वीवरील जीवनाशी निगडीत ही माहिती अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे.

 

oxygen-inmarathi

ब्रिटन येथील इम्पिरिअल कॉलेज, लंडन येथील शोधकर्त्यांनी एक नवीन शोध लावला आहे, ज्यानुसार हा दावा करण्यात आला आहे की, आजपासून जवळपास ३.६ अरब वर्षांपूर्वी पासून पृथ्वीवर ऑक्सिजन बनण्याची प्रक्रिया सुरु झाली.

आतापर्यंत वैज्ञानिक असे मानत आले होते की, सायनोबॅक्टेरिया हे ऑक्सिजनचा निर्माण करणारे पहिले सूक्ष्मजीव होते. पण ह्या नव्या शोधानुसार हे सायनोबॅक्टेरिया यायच्या जवळपास १ अरब वर्षाआधीपासूनच आपल्या पृथ्वीवर ऑक्सिजनची निर्मिती सुरु झाली होती.

 

oxygen-inmarathi02
energyeducation.ca

म्हणूनच अरबो वर्षांपासून ह्या सूक्ष्मजीवांच्या एवढ्या प्रजाती निरंतर विकसित होत राहिल्या. हेलीयम जर्नल मध्ये छापण्यात आलेल्या ह्या रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी सांगितले की, पृथ्वीवर जेव्हापासून जीवनाची सुरवात झाली तेव्हापासूनच कदाचित ऑक्सिजनची निर्मिती होण्यास सुरवात झाली असावी. ह्या शोधानंतर ओक्सिजनच्या निर्मितीशी निगडीत सर्व विवाद थांबण्याची शक्यता आहे.

पृथ्वीवर ऑक्सिजनचा एकमात्र स्त्रोत म्हणजे प्रकाश संश्लेषण आहे. जो दोन प्रकाराने होतो. एक म्हणजे जेव्हा ऑक्सिजेनिक आणि दुसरं म्हणजे अनऑक्सिजेनिक. ऑक्सिजेनिक प्रक्रियेत प्रकश उर्जेच्या मदतीने पाण्याच्या अणुंना वेगळे केल्या जाते. ज्यातून ऑक्सिजनची निर्मिती होते.

 

oxygen-inmarathi01
earth-chronicles.com

अनऑक्सिजेनिक प्रक्रियेत पाण्याच्या जागी हायड्रोजन सल्फाईड, आयरन इत्यादीचा वापर केला जातो. ह्या प्रक्रियेत ऑक्सिजनचे उत्सर्जन होत नाही. वैज्ञानिक असे मानायचे की, सर्वात आधी अनऑक्सिजेनिक प्रकाश संश्लेषणाची सुरवात झाली.

दोन्ही प्रक्रियेत फोटोसिस्टीम १ नावाच्या एन्जाइमचा वापर होतो. पण हा एन्जाइम दोन्ही प्रक्रियेत वेगवेगळा दिसतो. ह्या रिसर्च दरम्यान वैज्ञानिकांना हे जाणून घ्यायचे होते की, कुठल्या वेळी ह्या सूक्ष्मजीवांच्या जीन्स मध्ये बदल होण्यास सुरवात झाली.

तर अश्या प्रकारे आपला प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन ह्याची निर्मिती होण्यास सुरवात झाली.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?