' पुतीन यांचे संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक पाउल: भारत यातून बरंच काही शिकू शकतो

पुतीन यांचे संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक पाउल: भारत यातून बरंच काही शिकू शकतो

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी परत निवडणूक जिंकत आपली सत्ता राखली. सोविएट रशियाच्या सुरवातीपासून ते पतनापर्यंत रशियन जनतेला नेहमीच काहीसे अबोल असणारे, राजकीय पटलावर मुत्सद्दी असणारे राजकारणी आवडले आहेत. रशियाचा राजकीय इतिहास बघता ही गोष्ट नक्कीच जाणवेल. पुतीन यांचा राजकीय प्रवास हा असाच काही दिसतो. त्यांच्या नेतृत्व शैलीला जणू आता झळाळीच आली आहे.

सोविएत रशियाच्या पतनानंतर जन्लामा आलेल्या रशिअन संघराज्य कमजोर असल्यामुळे पश्चिमी राष्ट्रांच्या राजकीय दबावाखाली दाबले गेले. आर्थिक बाजू कमकुवत होती, लष्करी ताकत अख्ख्या पूर्व युरोप आणि मध्य आशियामध्ये विखुरली गेली होती.

हीच गोष्ट पुतीन यांना खुपली आणि राष्ट्राध्यक्ष बनताच त्यांनी बदलाला सुरवात केली. नवे लष्करी धोरण आखण्यात आले आणि त्याचा परिपाक राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थापन केंद्राच्या उदघाटनाने झाला. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या कणखर व्यक्तिमत्वाची ही एक झलक आहे. तर, चला जाणून घेऊ राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थापन केंद्र आहे तरी काय?

 

vladimir-putin-inmarathi
newstatesman.com

रशियन लष्कराचा मज्जातंतू म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थापन केंद्र! हे अवाढव्य केंद्र दोन वर्षाच्या आत बनवलं गेलं. मस्क्वा नदीच्या किनारी असणार्या संरक्षण मंत्रालयाच्या इमारतीमध्ये हे बांधण्यात आले. या केंद्राच्या खाली बोगद्यांचे एक जाळे आहे. तीन Helipad आहेत, त्यातलं एक तरंगत आहे.

मे २०१३ मध्ये पुतीन यांनी, जर युद्ध झालेच तर त्या वातावरणात सरकारी कामकाज करण्यासाठी आणि लष्करी सज्जतेला आधुनिक, एकत्रित आणि विस्तृत करण्यासाठी अश्या केंद्राची निर्मिती करायचे ठरवले.

रशियाचे संरक्षण मंत्री सर्जी शोईगु यांच्या मते हे केंद्र म्हणजे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने, वेगवेगळी लष्करी माहिती एकाच पटलावर मिळण्याची जागा ! यामुळे, युद्धभूमी कितीजरी बदलत राहिली, तरी नेमक्या वेळी कोणती निर्णायक चाल करायची हे ठरवता येईल.

या केंद्राचा मध्यबिंदू म्हणजे १८०o असणारी अखंड high quality स्क्रीन ! याच्या सभोवताली आहेत लष्करी अधिकार्यांसाठी बनवलेले खास टेबल. प्रत्येक टेबलवर एक tablet आहे. या मोठ्या हॉलमध्ये टेबल तीन रांगेत आहेत. मधल्या रांगेत रशियाचे प्रतिक आणि मोठे अधिकारी यांची रांग.

इथे आहेत एक मोठा supercomputer, ज्याची क्षमता आहे १६ petaflop! अमेरिकेच्या pentagonपेक्षा तीन पट शक्तिशाली! इथे फक्त रशियन बनावटीचेच भाग वापरले गेले आहेत. कारण एकच, कोणालाही इथल्या हालचालीचा थांगपत्तासुद्धा लागला नाही पाहिजे!

 

russian-defence-inmarathi
sputniknews.com

आता तुम्ही म्हणाल, एवढ्या मोठ्या computerची गरज काय? युद्धभूमी व्यवस्थापन हा विषय लष्कराला नवीन नाही. यात बरीच आकडेमोड होते असते. किती विमाने कोणत्या दिशेने, किती जहाजे किती वेगात, इत्यादी. जे लष्कर इकडे प्रबळ, युद्धाचा निकाल त्याच्या बाजूने! त्याच्या साठीच हि खटपट!

पुतीन यांनी या केंद्राची सज्जता सिरीयाच्या मदतीच्या वेळेस बघितली.

रशियन वायू सेनेचे एक मोठे operation पुतीन यांनी स्वतः याची देही याची डोळा बघितले. तिथेच याची प्रायोगिक चाचणी झाली! येणाऱ्या काळात लष्कर आणि नौसेना यांची कार्यप्रणालीसुद्धा इथे बघितली जाणार आहे. काही दिवसांनी तिन्ही लष्करी अंग एकसोबत निर्णय घेऊ शकतील अशी रचना विकसित होणार आहे.

हे केंद्र रशियाच्या आण्विक फौजेचे व्यवस्थापन करते. राजकीय आणि लष्करी नियंत्रण असणार्या या फौजेची कारवाई या दोन नियंत्रकंच्या एकत्रित आदेशाने कशी पार पाडायची हे बघेल.

दुसरी गोष्ट म्हणजे हे केंद्र जागतिक लष्करी-राजकीय घडामोडीवर बारीक लक्ष ठेवते. अशा घडामोडींचा रशिया आणि रशियाच्या मित्र राष्ट्रांवर काही फरक पडतो का हे बघते. तिसरी गोष्ट म्हणजे हे केंद्र रशियाच्या लष्कराच्या दैनंदिन गोष्टीवर नियंत्रण आणि लक्ष ठेवते.

 

russian-inmarathi
sputniknews.com

भारतीय संरक्षण मंत्रालयाने एका समितीचे गठन केले होते. या समितीने याच प्रकारच्या एकत्रित व्यवस्थापन अथवा नियंत्रण केंद्राच्या निर्मितीची गरज दर्शवली. या केंद्राचे जे प्रमुख असतील, त्यांच्या अखत्यारीत वायू सेनेचे, लष्कराचे आणि नौसेनेचे सगळे संसाधने असतील.

ही संसाधने कुठे आणि कशी हलवायची हेसुद्धा या केंद्राचे प्रमुख ठरवतील. भविष्यात जर चीन आणि पाकिस्तान यांच्यासोबत एकाच वेळेस युद्ध झालेच तर लष्कराचे तिन्ही अंग एकसाथ लढू शकतील. याच्यावर विस्तृतपणे नक्की बोलूच.

तर, सांगा आपण सुद्धा असे केंद्र निर्माण करायला पाहिजे का?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “पुतीन यांचे संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक पाउल: भारत यातून बरंच काही शिकू शकतो

  • January 2, 2020 at 8:46 pm
    Permalink

    हो करायला हवं

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?