' केसांना कलर करताय? मग आठवणीने या गोष्टींची काळजी घ्या. नाही तर… – InMarathi

केसांना कलर करताय? मग आठवणीने या गोष्टींची काळजी घ्या. नाही तर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजकाल स्टायलिश राहण्याकडे सगळ्यांचाच कल असतो. तरुण वर्गामध्ये तर आपण इतरांपेक्षा उठावदार कसे दिसू, यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न चालू असतात. त्यात मग वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांची फॅशन असो किंवा उठावदार दिसण्यासाठी केसांना कलर करणे असो. सर्वच उपाय ही तरुण मंडळी करून पाहतात.

काही वय सरत आलेली माणसे देखील केस कलर करतात आणि तरुण दिसण्याचा प्रयत्न करतात. तरुण मंडळी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांनी आपले केस रंगवतात. पण कधीही केसाला कलर करताना काही गोष्टी लक्षात ठेवून, योग्य ती काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

 

Hair Colour Damage Hair.Inmarathi
metro.co.uk

 

केस कलर करताना जर तुम्ही योग्य ती काळजी घेतली नाहीत, तर त्यामुळे तुमच्या केसांना हानी पोहोचू शकते, कारण केस कलर करण्यासाठी बनवल्या गेलेल्या डायमध्ये रासायनिक घटकांचा वापर केलेला असतो. जे घटक तुमच्या केसांना नुकसान पोहोचवू शकतात. जर या डायमध्ये रासायनिक घटकांचा वापर न केल्यास तुम्ही केसांना लावलेला रंग पुढच्या वेळेस तुम्ही शाम्पूने केस धुतल्यावर निघून जाईल.

“वारंवार केसांवर वेगवेगळ्या रासायनिक घटकांचा वापर करणे हानिकारक असते. यामुळे विशेषतः केसांची चमक आणि केसांची लवचिकता प्रभावित होते.” असे नताशा सारा या म्हणाल्या, ज्या हकीम अलीम या सलूनमध्ये काम करतात, जे मुंबईमधील एक खूप लोकप्रिय सलून आहे.

 

Hair Colour Damage Hair.Inmarathi1
thediabetesoc.com

 

एका चांगल्या कंडीशनरचा वापर करून तुम्ही केसांना ड्राय ठेवू शकता. केसांना कलर करताना योग्य ती काळजी जर आपण घेतली तर त्याच्या रासायनिक तत्वांपासून केसांची होणारी हानी आपण टाळू शकतो.

रसायनांमुळे केसांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. ज्यामुळे केसांचा कोरडेपणा आणि चमक कमी होते. काहीवेळा हे केसांचे पोत देखील प्रभावित करते आणि सरळ असलेले केस हे नागमोडी आणि कुरळे होतात.

 

कलर करतेवेळी घ्याव्या लागणाऱ्या काळजीसाठी काही टिप्स :

केस कलरमुळे नुकसान झालेल्या केसांसाठी हेअर स्पामध्ये काही केसांसाठी ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. मसाजिंग, स्टीमिंग इत्यादींचा यामध्ये समावेश आहे. खराब झालेल्या केसांमध्ये चकाकी आणण्यासाठी आणि वाढवण्यासाठी याचा वापर होतो. जर तुम्हाला मेंहदी लावण्याची सवय असेल, तर केस कलर करण्यामध्ये आणि मेहंदी लावण्यामध्ये चार ते पाच महिन्यांचा काळ असणे, आवश्यक असते.

जर तुम्ही रासायनिक कलरचा वापर करण्याचा विचार करत असाल, तर मेहंदी लावण्याचा विचार करू नका. मेहंदी तुमच्या केसांना ड्राय ठेवत नाही, त्यामुळे कलरमध्ये असलेले रासायनिक घटक तुमच्या केसांना प्रभावित करतात.

 

hair-stylist-inmarathi

 

पॅच चाचणी करणे आवश्यक आहे. खासकरून जर तुम्ही तुमचे केस घरामध्ये रंगवणार असाल. रंगाची त्वचेवर आणि केसांवर होणारी नकारात्मक प्रतिक्रिया पॅच चाचणी घेतली जाते. ही चाचणी करणे खूपच सोपे आहे. \

यासाठी आपल्या कोपराच्या आतील बाजूस काही रंग लावा आणि १५ ते २० मिनिटे ठेवा. त्यानंतर तो धुवून टाका. जर त्यात कोणत्याही प्रकारचा नकारात्मक परिणाम त्वचेवर झाला तर असा रंग वापरणे टाळा. दुसऱ्या कंपनीचे उत्पादन वापरून पहा किंवा त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

आपला टाळू नाजूक असल्यास आपण त्याबद्दल स्टायलिशला कल्पना द्या. आपल्या टाळूला जखम झालेली असल्यास ती बरी होईपर्यंत प्रतीक्षा करा. ती जखम बरी झाल्यानंतरच तुम्ही आपल्या केसांना कलर करा.

केसांना कलर केल्यानंतर चांगला शाम्पू वापरा आणि तो वापरण्याच्या आधी हे निश्चित करून घ्या की, त्याच्या वापराने आपला कलर लवकर जाणार नाही. हेअर स्टायलिस्ट अशावेळी हार्ड शाम्पू वापरणे टाळण्याचा सल्ला देतात. जसे अॅन्टी डॅन्ड्रफ शाम्पू वापरणे टाळावे.

 

Hair Colour Damage Hair.Inmarathi3
garnierusa.com

 

केसांना कलर केल्यानंतर चांगल्या कंडीशनरचा वापर करणे तेवढेच गरजेचे आहे. कंडीशनर हे केसांचा पोत राखण्यासाठी आणि जीवनसत्त्वे देण्यासाठी योग्य ती मदत करतात. नियमित आपले केस रंगवणे टाळा.

तुमचे राखाडी झालेले केस लपवण्यासाठी जर तुम्ही केस रंगवत असाल, तर ते फक्त महिन्यातून एकदाच करा. तरुणांनी केस हे कमीत कमी तीन ते सहा महिन्यांच्या अंतरानीच रंगवा, कारण जर तुम्ही सारखे आपले केस रंगवलेत तर त्याचा तुमच्या केसांवर विपरीत परिमाण होतो.

ह्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या केसांवर कलरमुळे होणारे विपरीत परिणाम टाळू शकता.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?